Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

गर्भनलिका आणि गर्भाशयाचे उपचार कसे करता येतील

प्रजनन होण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीराची जडणघडण, रचना इतर संप्रेरके व स्त्री संप्रेरकेही योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. तसेच, स्त्री प्रजनन संस्थेतील अवयवांची रचना (Anatormy)अनुकूल असली पाहिजे. तसेच या स्त्री-पुरुष यांचा संकर म्हणजे स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती असणे गरजेचे आहे.

१) Hormones (संप्रेरके) मानवी शरीरामध्ये लाळग्रंथी, अश्रूग्रंथी, जठरग्रंथी, स्थनग्रंथी अशा बाह्यप्रकारे स्राव करणार्‍या ग्रंथी आहेत; परंतु सरळ रक्‍तामध्ये आपला स्राव मिसळून इच्छित अवयव व संस्थेवर अपेक्षितपणे परिणाम घडविणार्‍या काही ग्रंथी आहेत. त्या मुख्यत्वे शरीरातील रक्‍ताभिसरणाद्वारे संपूर्ण शरीरातील अवयव व विविध संस्थांवर आपले नियंत्रण ठेवत असतात.

२) आपल्या शरीरातील बाह्य ग्रंथी या ज्या-त्या संस्थेपुरतेच काम करीत असतात. उदाहरणार्थ, लाळेचे काम हे अन्‍नात मिसळून तेथेच अन्‍नातील कर्बोदकाचे पचन करून त्याचे साखरेच विघटन करणे हे आपल्या मुखातच करणे, असे आहे. त्याचा विपरित रिणाम दूर असलेल्या कोणत्याच अवयवावर किंवा अवयवापर्यंत पोहोचणे अशक्य असते. ज्या-त्या विभागापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित असते; परंतु या आंत्रग्रंथीच्या (Endocrine) स्रवाचा हा परिणाम सर्वदूर सर्व संस्थांवर कमी-अधिक प्रमाणावर होत असतो.

३) आपल्याला माहिती असलेल्या अशा मुख्य ग्रंथी म्हणजे थायरॉईजमधील थायरॉईडचे संप्रेरके, स्वादूपिंड याचे इन्सुलिन संप्रेरके, तसेच अगदी पॅराथायरॉईड ग्रंथी, सुप्रारिनल ग्रंथी तसेच पिचुटरी ग्रंथी, स्त्री बिजांड कोश तसेच वृषण यातूनसुद्धा संप्रेरके तयार होतात. ते सरळ रक्‍ताभिसरणामध्ये मिसळली जातात व त्यांचे कार्य विशिष्ट अशा अवयवाप्रमाणे शरीरातील विशिष्ट अशा इतर संस्थांवर होताना आढळते. त्याच्यावर एक-दुसर्‍या ग्रंथीच्या कार्यामध्ये समन्वय असतो व त्याचा एकच मास्टर असतो, तो म्हणजे मोठा मेंदू.

४) मोठ्या मेेेंदूवरील ताण-तणाव, सुखद संवेदना यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या आंत्र संप्रेरक (Endocrine) ग्रंथीवर परिणाम होत असतो व त्याचेच फलित म्हणजे चयापचय (Metabolism) होय व या ग्रंथीचे सर्व कार्य म्हणजे, एक सूत्रबद्धपणे सुरू असलेला ऑर्केस्ट्राच असावा, असे असते. प्रत्यक्ष वाद्याचे व तालाचे एकानंतर एक, एकाबरोबर एक, अशी एक लयबद्ध अदाकारी सुरू असते.

५) एक वाद्य दुसर्‍या वाद्याला पूरक व त्यावर असलेले नियंत्रण, की ज्यामुळे संपूर्ण संगीत हे ऐकण्यास योग्य व्हावे, असे असते. तसेच काही हे हॉर्मोन्स (Endocrine) संप्रेरकांच्या बाबतीत तालमय, एक दुसर्‍यास समर्पक असा वाद्यवृदांच्या कार्यासारखा चालू असतो व त्यातून एक सुमधूरपणे एकसारखी धून अव्याहतपणे चालू राहते.

६) या संप्रेरकाबाबत लिहिताना अफाट मर्यादा आहेत. उदा. स्त्रीबीजातून निर्माण होणार्‍या Oestrogen या संप्रेरकाचे गर्भाशयाच्या उती (अस्तर) (Endometrium) वर, तर परिणाम होतच असतो; परंतु त्याच्या स्तरामुळे पिच्युरी व Hypothalamun वर पूरक व विरुद्ध परिणाम होत असतो. हे तर त्याचे सरळ परिणाम आहेतच; परंतु त्याचे अप्रत्यक्ष परिणाम ७) आपल्या हृदयापासून रक्‍तवाहिन्या व हाडाच्या रचनेपर्यंत होत असतात.

यांच्या सर्व गोष्टी इतक्या क्‍लिष्ट आहे की, त्या अशा लेखाद्वारे समजावून सांगण्याच्या पलीकडील आहेत. अगदी एमबीबीएसचा कोर्स साडेचार वर्षे झाल्यावरसुद्धा याचे आकलन होणे कठीण असते व त्याचा एक दुसर्‍याशी असलेला संबंध व समन्वय, तसेच कार्य समजून घेणे फारच अवघड आहे. तरीही मला जे इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर झालेले जे काही थोडेअधिक आकलन आहे, ते इथे मांडण्याचा हा एक प्रयत्न.

८) तर प्रजनन संस्थेवर प्रजननाच्या आंत्रग्रंथीबरोबरच इतर आंत्रग्रंथींच्या स्रावाचा म्हणजे Thyaroid pancrcare Suprarend ग्रंथीच्या स्रावाचा (संप्रेरकाचा) अप्रत्यक्षपणे परिणाम होतच असल्यामुळे त्याची तपासणी करून TSH T3, T4, Insuline, Prolaction level तसेच इतर ग्रंथींच्या संप्रेरकाचे रक्‍तातील प्रमाण योग्य आहे, हे पाहावे लागते व त्यात फरक आढळल्यास त्यावर योग्य तो उपाय करावा लागतो.

९) स्त्री संप्रेरकांच्या बाबतीत सांगायचेच झाले तर, इतर संप्रेरकांचा त्या संस्थेबरोबरच प्रजनन संस्थेवर परिणाम होत असतो व त्याचेच पर्यवसान हे योग्य ती स्त्रीबीज निर्माण होण्यामध्ये होते. गर्भाशयाच्या एक्स-रे म्हणजेच H.S.G.(Hustrosaphingo graphy) करता येते. यात केवळ निदान होते, उपचार करता येत नाही. सर्वसामान्य लोकांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, ते म्हणजे जीवनामध्ये सर्व गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत. उदा. लग्‍न ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वप्रथम पत्रिका पाहतो, त्या स्थळाची चौकशी करतो, नंतर फोटो पाहतो. चौकशी व पत्रिका म्हणजे वंधत्व निवारणाच्या प्रक्रियेतील इतिहास पडताळणी व रक्‍त तपासणीचा निष्कर्ष आहे, असे समजू या. आपण चौकशी व पत्रिका बघून लग्‍न करीत नाही, तर मग फोटो पाहतो. ते म्हणजे सोनोग्राफी, एक्स-रे व एमआर समजू या. फोटोत छान दिसणारी व्यक्‍ती प्रत्यक्षात वेगळी असू शकते. म्हणजेच फोटोला मर्यादा आहेत. तसेच काहीसे सोनोग्राफी व एक्स-रेमध्ये असते. म्हणून प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्यास जातो, तेव्हा काही तरी फोटोमध्ये न दिसलेले व्यंग आपल्या निदर्शनास येते. तसेच काहीसे प्रत्यक्ष पाहणी म्हणजे पोट उघडून पाहणे किंवा Hystrolaproscopy गर्भाशयाचे अंतरंग व पोटाचे आतला भाग तपासणी (दुर्बीण शस्त्रक्रिया) प्रत्यक्ष पाहणी किंवा अवलोकन करणे होय. तर या अवलोकनाद्वारे आपल्याला गर्भधारणेवर होणार्‍या अडथळ्यांचा अंदाज बांधता येतो.

दुर्बीण शस्त्रक्रियासुद्धा दोन प्रकारांमध्ये मोडते.

1) Dignostic Hysterolaproscopy म्हणजे परिस्थितीचे अवलोकन करणे.

2)Theraputy Hysterolaproscopy

१०) तर थोडक्यात प्रजनन होण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांच्याही शरीराची जडणघडण रचना इतर संप्रेरके व स्त्री संप्रेरके ही योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. तसेच स्त्री प्रजनन संस्थेतील अवयवांची रचना (Anatormy)अनुकूल असली पाहिजे. तसेच या स्त्री-पुरुष यांचा संकर म्हणजे स्त्रीबीज व शुक्राणूचे फलन होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती असणे गरजेचे आहे.

आपण इतर आंत्रग्रंथीचा उपयुक्‍त व विपरीत परिणाम कसा होऊ शकतो, हे पाहिले आहे. स्त्री संप्रेरकाबाबतची चर्चा ही सखोल करण्यासाठी ती पुढील लेखात पाहू. फक्‍त आता जनन मार्ग व प्रजनन संस्थेतील गर्भधारणा होण्यास मज्जाव करणारी कारणे पाहू या. शुक्राणूचे विर्यस्खलनादरम्यान स्त्रीच्या जननमार्गात विसर्जन झालेले असते. गर्भाशयाच्या पोकळीतून शुक्राणूंना गर्भनलिकेत प्रवेश करायचा असतो. हा मार्ग व्यवस्थित आहे का, हे पाहण्याची पद्धत दोन प्रकारे करता येते.

११) गर्भाशय व गर्भनलिकेमधील मार्ग व्यवस्थित आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी अर्थात अवलोकनामध्ये सापडलेल्या त्रुटींवर मात करण्यासाठी केलेले शस्त्रक्रियारूपी उपचार होत, तर या दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय, गर्भनलिका, बाजूचे अवयव हे गर्भधारणेस अनुकूल आहेत किंवा कसे हे पाहून गर्भनलिकेमध्ये एक सूक्ष्म वायर टाकून आतील बंद असलेली नलिका दुरुस्त करता येते. तसेच पूर्वीच्या ऑपरेशनमुळे गर्भाशय, गर्भनलिका व स्त्रीबिजांड चिकटली असल्यास दूर करता येते. काही वेळेला गर्भनलिकेवर T.B. ट्युबरक्युलॉसीसचा विकार जडलेला असतो. त्याचे निदान करता येते, तर गर्भनलिका व गर्भाशयाचे विविध विकार व त्यावर उपचार शस्त्रक्रियेने आज सुलभ केलेले आहेत.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon