Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

गर्भधारणा होण्यात येणाऱ्या अडचणी संबंधी काही गोष्टी . . . . . .


आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली पण आमच्या घरात अजूनही पाळणा हलला नाही. घरात सर्वजण बाळाची अपेक्षा करत आहेत. आम्ही बऱ्याच टेस्ट केल्या आहेत. पण काही त्याचा परिणाम दिसून येत नाहीये. अशी समस्या काही जोडीदाराची असते. आणि ह्यातच आणखी माझ्या बरोबर ह्याचे - तिचे लग्न झाले होते आणि त्यांना बाळ होऊन आता ते प्री स्कुल मध्ये जायला लागले. गावाकडचा राहिलाच तर त्याला गावात प्रत्येकजण विचारतो, ‘बाप कधी होशील.’’ मला नातू बघायचा आहे.’’ अशी वाक्य ऐकायला मिळत असतात. तेव्हा ह्याविषयी काही गोष्टी बघणार आहोत.

१) प्रजजनची क्रिया

प्रजननाची क्रिया समजावून घेतली तर असं लक्षात येतं की स्त्रीबीज वेळेवर तयार होणं, त्याचा सुयोग्य पुरुषबीजाशी संबंध येणं आणि ह्या दोघांच्या संयोगासाठी आवश्यक असलेला गर्भनलिकेचा मार्ग मोकळा असणं ह्या प्राथमिक गोष्टी व्यवस्थित असल्या तर गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये मोठा अडथळा येत नाही.

२) स्त्रीबीज

स्त्रीबीज तयार होते किंवा नाही हे पाहण्यासाठी. स्त्रीबीजाचा आकार कसा वाढतो ते पाहून, ते फुटण्याच्या काळात त्या जोडप्याचा शरीरसंबंध झाला पाहिजे.

३) गर्भधारणेच्या अडथळ्यात पुरुष आणि स्त्री किती दोषी

गर्भधारणेमध्ये अडथळा येत असतो अशा जोडप्यांच्या बाबतीत संख्याशास्त्र असं सांगतं की अशा जोडप्यांपैकी ४०% जोडप्यांमध्ये स्त्रीच्या निसर्गचक्रात अथवा शरीरात दोष आढळतो. ४० टक्के जोडप्यांमध्ये पुरुषांच्या बाबतीत काही दोष असतात आणि उरलेले २० टक्के दोघांच्याही प्रजनन संस्थेतील दोष त्यांच्या वंध्यत्वाला कारणीभूत असतात.

४) पुरुष कसा जबाबदार

बऱ्याच वेळी पुरुषांचे वीर्य तपासणे सुद्धा खूप महत्वाचे आहे. स्त्रीच्या कुठल्याही तपासण्या सुरू करण्यापूर्वी पुरुषाच्या वीर्यामधील शुक्रजंतूंची तपासणी करणे आवश्यक असते. कारण ह्यामधून बऱ्याच गोष्टी समजून उपचार करता येतात. कारण वीर्याच्या तपासणीत जर दोष आढळला तर सहसा दुसर्याा काही तपासण्या करण्याची गरज पडत नाही. त्यामध्ये दोष न आढळल्यास इतर तपासण्या कराव्या लागतात. याउलट स्त्रीच्या तपासणीमध्ये अनेक गोष्टी कराव्या लागतात.

५) स्त्रीबीजचे कार्य आणि काही चाचण्या

स्त्रीबीज व्यवस्थित तयार होते किंवा नाही हे पाहण्यासाठी सोनोग्राफी नवव्या दिवसापासून पुढे काही दिवस करावी लागते. रक्तातील संप्रेरकांची - हार्मोन्सची तपासणी करावी लागते. गर्भनलिका सुरळीत काम करतात - उघड्या आहेत हे पाहण्यासाठी

HSG - क्ष किरणांद्वारे तपासणी करावी लागते. गर्भाशयमुखाची तपासणी करण्यात येते. काही काळानंतर लॅपरोस्कोपी करून काही निष्कर्ष काढावे लागतात. लॅपरोस्कोपीद्वारे काही उपचार करावे लागतात. ह्या सर्व गोष्टींचा शरीरावर परिणाम होत असतो. मानसिक, आर्थिक तणाव आणि वेळ द्यावा लागणं हे तर वेगळंच. त्यातून मासिकपाळीच्या एका चक्रात अपेक्षित परिणाम मिळाला नाही तर पुन्हा त्या चक्रातून जावं लागतं.

६) संबंध ठेवण्याविषयी

‘त्या’ दिवसात संबंध ठेवतात आणि गर्भधारणा झाली नाही तर आपल्यात काहीतरी वैगुण्य असल्याचे गृहीत धरतात. मानवी शरीराची रचना सुसूत्र आहे. ते अतिशय नियमबद्ध आहे, तरी ते काही यंत्र नव्हे आणि प्रत्येक जोडप्याची शारीरिक, मानसिक सुसंबद्धता वेगळी असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon