Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

ब्रेस्ट लिकिंग (गळते स्तन) कारणे आणि उपाय

      मातृत्व ही खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. मातृत्वाचा आनंद घेत असतानाच अनेक आव्हानांचाही सामना करावा लागतो. त्यापैकी स्तनापान ही एक महत्त्वाची आव्हानात्मक जबाबदारी जबाबदारी आहे. तुमचं बाळ त्याच्या पोषमासाठी पुर्णपणे तुमच्या दुधावर असतं.पण स्तनपान करताना अनेक अडचणींना आणि अनपेक्षित परिस्थितीला तोंड द्यावे लागते. बाळा स्तनपान करण्याची योग्य पोझिशन कोणती हा आईला पडलेला नेहमीचा प्रश्न असतो पण त्यासोबतच गळत्या स्तनांचा प्रश्नही  आईसाठी खूप महत्त्वाचा असतो. लिकिंग ब्रेस्ट म्हणजे भरपूर प्रमाणात दूध असण्याचा चिन्ह आहे. त्यामुळे बाळाला पुरेस दूध मिळू शकतो. पण कधी -कधी ते खूप लाजिरवाणं वाटतं.

 ही समस्या कशी निर्माण होते ?

- आईला सहसा हा त्रास सकाळी किंवा रात्री उशीरा जाणवतो. स्तन ग्रंथी मध्ये दूध जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे ही समस्या जाणवते. तसेच ऑक्सिटोसिन हार्मोन्समुळे स्तनातील स्नायुपेशी ताठर होतात. त्यामुळेही स्तनांतून दूध बाहेर पडते. उष्ण हवामानाच्या प्रदेशात असताना ही समस्या जास्त प्रमाणात जाणवते.

तुम्ही तुमच्या बाळाला एका स्तनाने पाजत असताना दुसर्या स्तानातून दूध बाहेर पडू शकते. तसेच तुमचं बाळ रडत असतानाही तसं होऊ शकतं. प्रसुतीनंतर सुरूवातीच्या काही आठवड्यांत ब्रेस्ट लिकेज ही खूप सामान्य बाब आहे. त्यानंतर तुमचं शरीर बाळाच्या स्तनापानाच्या वेळेनुसार अॅडजस्ट होतं.

 ब्रेस्ट लिकिंगच्या वेळी अशी काळजी घ्या !
१. ब्रेस्ट पॅड्स 

तुमच्या ब्राच्या आतमध्ये ब्रेस्ट पॅड वापरा. त्यामुळे बाहेर आलेले दूध त्यात शोषले जाईल. तसेच तुमच्या निप्पल्सला त्रास होऊ नये यासाठी काही वेळानंतर ते बदला.

२. योग्य ते कपडे घाला

 घराबाहेर जाताना दूधाचे डाग दिसमार नाहीत असे योग्य ते कपडे घाला. तसेच सोबत जास्तीचा ब्रा आणि टॉप ठेवा.

३.छातीवर हलकेच दाब द्या.

 जर दूध बाहेर येईल असं तुम्हाला वाटलं. तर हळूहळू आपल्या हाताचे तळवे आपल्या छातींवर दाबा.जास्त दाब देऊ नका 

४. जॅकेट आणि स्वेटर 

 बऱ्याच वेळा पिरेड्सच्या काळात डाग लपवम्यासाठी तुम्ही कमरेला जॅकेट बांधता. अगदी तसाच या काळात दुधाचे डाग लपवण्यासाठी स्वेटर आणि जॅकेट्सचा वापर करा.

महत्वाचे 

ब्रेस्ट लिकेज हे जास्त दूध असण्याचं चिन्हं आहे. त्यामुले बाळाला पुरेशा प्रमाणात दूध पिवी घाला. तसेच अतिरिक्त दुधाचा योग्य प्रकारे निचरा होऊ द्या. त्यामुळे तुमच्या स्तनांमधील ताण कमी होईल. ब्रेस्ट फिडींग ही एक खूप सामान्य नैसर्गिक बाब आहे. तो तुमच्या जीवनाचा खूप छोटा भाग आहे. त्यामुळे त्यात लाज वाटण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे काळजी करू नका. आनंदी राहा.      

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon