Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

गाजराच्या आहारातील समावेशामुळे आरोग्यविषयक हे फायदे होतात.

बऱ्याच वेळा आपल्याला कच्च्या भाज्या सॅलड खा त्यामध्ये गाजराचा नक्की समावेश करा ते आरोग्यसाठी चांगले असते असे सांगण्यात येते पण गाजराच्या सेवनाचे नक्की फायदे कोणते आणिगाजरचे कोणत्या स्वरूपातील सेवनाने आरोग्यविषयक फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत.

१. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी

फार पूर्वीपासून डोळ्यांच्या कमजोरी विषयक समस्या असतील त्या व्यक्तीला गाजर खाण्याचा सल्ला दिला जात असे, गाजरात मुबलक प्रमाणात अ जीवनसत्व असते. त्यामुळे गाजर नियमित खाल्ल्यास चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते आणि दृष्टी सुधारते.

२. मधुमेह

मधुमेहाच्या रोग्यांसाठी गाजर अमृत समान आहे. एक ग्लास गाजरच्या रसामध्ये एक कप कारल्याचा रस टाकून प्यायल्याने फायदा होतो. परंतु हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

३. अर्थराइटिसचे/गाऊट्स (संधीवात)

जर तुम्ही अर्थराइटिसचे पेशंट असाल किंवा तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढले आले आणि त्यामुळे गाऊट्सचा त्रास झाला असेल तर दररोज कमीत-कमी एक ग्लास गाजराचे ज्यूस नक्की प्यावे.

४. पचन शक्ती

गाजरामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.यासाठी ज्यूस ऐवजी गाजर चावून खाल्यास उत्तम

५. हृदयरोगावर उपयुक्त

गाजरात कॅल्शियम, फायबर,ब आणि क जीवनसत्व अशी शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. त्यामुळे हृदयरोग असणाऱ्या व्यक्तीने आहारात गाजराचा समावेश करावा. तसेच नियमित गाजर खाल्ल्यास हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते.

६. पुरुषांमधील अशक्तपणा

अशक्तपणामुळे त्रस्त असतात त्यांच्यासाठी गाजराचा ज्यूस खुप फायदेशीर असते. चिकित्सा अध्ययनांमध्ये सिध्द झाले आहे की, गाजर कँसरचा धोका कमी करते. गरोदर महिला आणि होणा-या बाळासाठी ज्यूस खुप फायदेशीर असते.

७. कॅन्सरला प्रतिबंधक

गाजरात असणारे बिटा कॅरोटिन कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.

कश्या स्वरूपात प्रकारे गाजर खाल्याने काय फायदे होतात

१. गाजराचा ज्यूस

आपल्या शरीरातून व्हिटॅमिन ए आणि ई ची कमतरता दूर करते. जर याची शरीरात कमतरता असेल तर त्वचेत कोरडेपणा, केस तुटणे, नखे खराब होते अशा समस्या होतात. व्हिटॅमिन ए आपल्या शरीराचे हाड आणि दातांसाठी देखील फायदेशीर आहे,

२. कच्चं गाजर

गाजरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. यामुळे गाजर चावून चावून खाल्ल्याने आतड्यांची स्वच्छता होते. यामुळे बध्दकोष्ठ आणि गॅस सारख्या समस्यापासुन आराम मिळतो.

३. इतर पदार्थाबरोबर

१. जर भूक लागत नसेल, खाण्याची इच्छा होत नसेल तर गाजरला लिंबू आणि मिठ लावून अदरक आणि पुदीन्यासोबत सेवन केल्याने भूक लागते.

२. गाजराचा रस आणि मध एकत्र करून त्याचे ज्यूस प्यावा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

टीप- मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने गाजर खाण्याचे प्रमाण जाणून घ्यावे. गाजराचे ज्यूस घरी केल्यास जास्त उत्तम,आणि या गाजराची गुणवत्ता तपासून मगच खरेदी करावी. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon