Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

आईला घरात कंटाळा आला असेल तर ही गोष्ट करा


बाळाचा जन्म झाल्यावर आई घरीच असते. तिला घरी असताना बाळाचे संगोपन करणे, आणि घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडणे. ह्या गोष्टी असतात पण बऱ्याच आईंना घरात टेरेस गार्डन(छोटी बाग) फुलवायची आवड असते. आणि काही मॉम्सनी आम्हाला सांगितले की, एखादा लेख/ ब्लॉग बाल्कनी मध्ये बाग किंवा थोडे गार्डन सारखे काही करता येईल का? बाळाच्या संगोपनात तर बऱ्याच आईंना वेळ मिळत नसतोच. पण जर तुमच्या बाल्कनीत किंवा घरात किंवा टेरेस वर अशी जागा असेल तर तुम्ही अशी बाग नक्कीच तयार करू शकता. ह्यातून तुम्हाला थोडा विसावा मिळून मन शांत व प्रसन्न राहील आणि तुमचा वेळ टेलिव्हिजनवर लागण्यापेक्षा हे उत्तम राहील.

१) जर तुमच्या कडे बाल्कनीची जागा असेल, किंवा गच्ची असेल किंवा बाहेर थोडी मोकळी जागा असेल तरीही तुम्ही त्यावर छोटी बाग फुलवू शकता. आणि जर तुम्ही गावात राहत असाल तर तुमच्याकडे खूपच जागा असेल तर छानच.

२) सुरुवातीला काय कराल: अगोदर तुम्ही ठरवून घ्या की, तुम्हाला कोणत्या जागेवर बाग फुलवायची आहे.

* त्यानंतर गावाकडून काळी माती मागवून घ्या. आणि तो पर्याय नसेल तर कुंड्या च मातीसकट घेऊन टाका. कुंड्या घेताना ह्या प्लास्टिकच्या घेण्यापेक्षा मातीच्या घ्या. किंवा अर्ध्या प्लास्टिक अर्ध्या मातीच्या.

* आता तुम्ही त्या ठिकाणी चाफा, गुलाब, मोगरा, अनंत, जुई, शेवंती, किंवा आवडत असलेली फुल झाडे लावू शकता.

* ज्यावेळी तुम्ही वेलीची फुले लावणार तेव्हा त्याला अगोदरच दोरी बांधून घ्या जेणेकरून ते व्यवस्थित फुलेल.

* आणि जर तुम्हाला तुळस, कोथंबीर, कढीपत्ता, गवती चहा किंवा इतर लावायचे असेल तर उत्तमच. फक्त ह्यसाठी मोठ्या कुंड्या वापरा.

* ह्यात तुम्ही वेगवेगळ्या झाडांसाठी वेगवेगळी कुंड्या वापरू शकता. नाहीतर झाडाच्या आकारावरून ठरवून घ्यावे.

२) जर तुम्ही ह्यात नवीनच आहात तर छोट्या कुंड्या घेऊन काही फुले झाडे लावून पहा.

* ह्यांना दररोज थोडे - थोडे पाणी घालत जा.

* ह्यांच्यावर ऊन येईल अशी थोडी जागा असू द्या.

* जर तुमच्या घरात उंच येत नसेल तर तुम्ही ज्यांना उन्हाची आवश्यकता नसते ते प्लांट लावू शकता.

३) बियाणे किंवा रोपटे तुम्हाला बाजारातून मिळून जाईल आणि त्याच्याकडूनच खात वगैरे थोडेसे घेऊन घ्यावे.

४) पाणी खाली वाहणार नाही त्यासाठी त्याचा निचरा करण्याची सोया करून ठेवा. आणि ती करता येते.

५) गच्चीच्या एका कोपऱ्यात वाळलेली पाने आणि घरातील ओला कचरा कुजविण्यासाठी छोटी बंदिस्त जागा असावी. गांडूळ खत करू नये. कारण त्यामुळे पक्ष्यांचा त्रास वाढतो. मात्र त्यांची तहान भागवण्यासाठी एक छोटी पाण्याची थाळी जरूर असावी. गच्चीच्या कटय़ावर कुंडय़ा ठेवू नयेत. घरगुती समारंभामध्ये गच्चीवरच्या बागेचा सहभाग असेल तर आनंद द्विगुणित होतो. गप्पागोष्टी, वाचन, चिंतन आणि दैनंदिन बठे व्यायाम यामध्ये या बागेचा ऊर्जास्रोत म्हणून महत्त्वाचा सहभाग आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon