Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

गर्भारपणाच्या काळात महिलांना या सहा गोष्टी बदलाव्या लागतात!

जरी तुम्ही गर्भारपणावरची कितीही पुस्तके आणि लेख वाचले असले; तरीही प्रसूतीकाळात अनुभवाव्या लागणाऱ्या भावनिक हेलकाव्यांसाठी आणि शारीरिक बदलांसाठी कोणीही तुम्हाला पूर्णपणे तयार करू शकत नाही. जेव्हा एका महिलेला ती गरोदर असल्याचे कळते; तेव्हा ती तिच्या बाळाला सुरक्षित आणि आरामदायी ठेवण्यासाठी तिच्यामध्ये आणि तिच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये हवे ते बदल करण्यासाठी तयार होते. यातीलच काही बदल पुढीलप्रमाणे:

ऍम्युझमेंट पार्कच्या सफरी पुरे झाल्या

गरोदरपणात ऍम्युझमेंट पार्कच्या सफरी का टाळाव्यात; त्याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही गरोदर नसता, तेव्हा त्या तुम्हाला रोमांचक वाटू शकतात; पण जेव्हा तुम्ही रोलरकोस्टर मध्ये असता, तेव्हा तुमचे गर्भारपणातील पोट हेलकावे घेत असल्याची कल्पना करून पाहा.

 मांजरापासून दूर राहा

जर तुमच्या घरी मांजर असेल; तर तुम्हाला माहितीच असेल की, तिच्या विष्ठेची सफाई करणे हे रोजच किती जिकीरीचे काम असते! मांजराच्या विष्ठेमध्ये 'टॉक्सोप्लाझ्मा गॉण्डि' नावाचे परजीवी असतात, जे गर्भवती महिलांच्या अशक्त झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्यांच्यात संसर्ग पसरवू शकतात.

तुम्ही काय खाता याची काळजी घ्या

मातांनो, प्रक्रिया केलेले अन्न आता बंद! त्यामध्ये भरपूर हानिकारक घटक असतात; त्यामुळे त्यात चविष्टपणापेक्षा धोका हा अधिक मोठा असतो. जर तुम्हाला एखादा मसालेदार पदार्थ खायची तीव्र इच्छा होत असेल, तरच खा. अन्यथा ते टाळणे बेहतर राहते. तसेच ताजी फळे आणि पालेभाज्या यांचे सेवन करा.

व्यायामाचे तास कमी करा

गर्भारकाळात व्यायाम करणे हे तुम्ही आणि तुमच्या बाळासाठी खरोखर चांगले असते. पण तुम्हाला तुमच्या मर्यादा जाणून घेणे गरजेचे आहे. जर तुम्हाला खूप व्यायाम करण्याची सवय जडली असेल; तर त्यापासून फारकत घेणेच अधिक शहाणपणाचे राहील. लक्षात ठेवा, गरोदरपणातले ध्येय हे आरोग्यदायी राहण्याचे आहे; वजन कमी करण्याचे नाही.

स्वच्छता काळजीपूर्वक करा

फरशा, काचा आणि शौचालयातील डाग मिटवण्यासाठी तुम्ही जी घरगुती द्रव्ये वापरता, ती पूर्णपणे रासायनिक असतात; जी तुम्हाला गरोदरपणात नुकसान पोहोचवू शकतात. भरपूर अभ्यासाअंती हे कळून आले आहे की, ही रसायने बाळाच्या जन्मामध्ये अनेक प्रकारे बाधा आणतात. म्हणून या विषारी द्रव्यांचा गंध घेणे किमान त्या नऊ महिन्यांसाठी टाळा.

तुमच्या सौंदर्यप्रसाधनांचा नित्यक्रम बदला

तुमच्या सौंदर्यप्रसाधनांमध्येसुद्धा खूप हानिकारक रासायनिक घटक भरलेले असतात. ते तुमच्या त्वचेत प्रवेश करू शकतात आणि बाळाला हानी पोहोचवू शकतात. एकतर पूर्णपणे नैसर्गिक पदार्थांचा वापर करा, वा सौंदर्यप्रसाधनांचा वापरच टाळा. तशाही तुम्ही अतिशय सुंदर दिसता! मग मेकअप करून तो चेहरा का लपवावा; बरोबर ना?

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon