Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

घरातल्या फ्रिजवरती जर तुम्ही ह्या वस्तू ठेवत असाल तर...सांभाळा?

         तुमच्या फ्रिजवरती काही ना काही वस्तू ठेवल्या असतील. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून ते भांडीही ठेवायला बघायला मिळतील. तुम्हाला असे जाणवले असेलच की, फ्रिजची कुलिंग सिस्टम काही दिवसांनी कमी होऊन जाते. म्हणजे पहिल्यापेक्षा फ्रिज जास्त थंड राहत नाही. तेव्हा विचार केलाय की, ह्याचे कारण काय असू शकते. आणि नवं फ्रिज सुद्धा ह्याला बळी पडत असते. तेव्हा त्याविषयी जाणून घ्या. आणि तुम्ही ही गोष्ट करत असता की,  फ्रिजवर वस्तू लवकर सापडते म्हणून तुम्ही सोप्या जागी वस्तू ठेवून मोकळ्या होऊन जातात. पण ह्याचा परिणाम काय होत असतो.

 

* शहरात राहिल्यावर खुप समान घरात वाटतो आणि तो सामान दररोजच लागत असल्याने आपण अशा सोयीस्कर जागेवर ठेवून देतो की, तो कधी लागलाच तर सोपे होईल. म्हणून तुम्ही घरच्या फ्रिजवर ठेवून मोकळे होतात.

* अनेकांच्या घरात जागा कमी असल्याने ते फ्रिजवर टोस्टर, ओव्हन, मिक्सर, फूडप्रोसेसर आशा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवतात. मात्र त्यामुळे फ्रिजचे कूलिंग कमी होण्याची शक्यता असते.

*  जर फ्रिजमध्ये खूप वस्तू ठेवून दिल्यात आणि मावत नसतील तितक्या भाज्या ठेवल्याच तर त्यातील कूलिंग कमी होण्याची शक्यता असते. म्हणून खूप महत्वाच्या आणि आवश्यक वस्तूच फ्रिजमध्येच ठेवा.

*  फ्रिजमध्ये पदार्थ किंवा भाज्या, फळे हे ठेवताना त्या गोष्टींमध्ये पुरेशी जागा असेल असे बघा. एकदम गर्दीत वस्तू ठेवल्या की फ्रिजचे कूलिंग कमी होते. आणि आपल्याला सवय असते जे आले ते कोंबायची.

*  फ्रिजच्या मागच्या बाजूला डबे, पदार्थ टेकून राहणार नाहीत याची काळजी घ्या. मागच्या बाजूने कूलिंगची हवा येते. पण तुम्ही जर वस्तू मागे चिकटून ठेवल्यात तर ही कूलिंगची हवा योग्य पद्धतीने येत नाही आणि कूलिंग कमी होते. यामुळे फ्रिजमध्ये वास येतो.

*  फ्रिजचे दार उघडले तरी ते काम झाले की लगेचच बंद करा. काही जणांना फ्रिजचे दार उघडे ठेऊन एखादे काम करण्याची सवय असते. त्यामुळे फ्रिजमधील गार हवा बाहेर जाते आणि गारवा कमी होतो. आणि त्याचबरोबर फ्रिज जास्त वेळ उघडा राहिलाच तर त्याचा कॉम्प्रेसर खराब होण्याची खूप शक्यता असते.

*  फ्रिजच्या कूलिंग कमी-जास्त करण्यासाठी त्यामध्ये एक बटण दिलेले असते, त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. आठवड्यातून एकदा त्याला बंद करून पुसून घेत जा. म्हणजे त्यामधला वास निघून जाईल.

*  फ्रिज भिंतीला चिकटून ठेवू नये. भिंतीपासून काही अंतर ठेऊन फ्रिज ठेवावा. त्यामुळे कॉम्प्रेसरचा आवाज येतो आणि फ्रिज खराब होण्याची शक्यता असते. लहान मुलांच्या फ्रिज उघडल्यानंतर लक्ष द्यावे कारण ती दरवाजा लावायला विसरत असतात. आणि फ्रिज मध्ये वस्तू ठेवताना व्यवस्थित ठेवाव्यात नाहीतर मुलांच्या अंगावर पडतील. आणि फ्रिजचा कमी वापर करण्याचा प्रयत्न करावा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon