Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

आहारात तंतुमय (फायबर युक्त )पदार्थांचा समावेश केल्याने हे फायदे होतात

पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी आहारात तंतुमय पदार्थ असणे अत्यावश्यक असते.तंतुमय पदार्थाच्या कमतरतेमुळे पचनप्रक्रियेमध्ये अन्न पुढे साकारण्याचा कालावधी वाढतो परिणामी अन्न एका जागी जास्त वेळ पडून राहते. पचनविषयक अनेक तक्रारी सुरू होतात.

तंतूमय पदार्थ असणारे पदार्थ

१. कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये,

२. कोंड्यासकटचे धान्य

३. हिरव्या पालेभाज्या

४. राजमा

५. बदाम, गाजर

तंतूमय पदार्थ खाण्याचे फायदे

तंतूमय(फायबर युक्त) पदार्थाच्या सेवनाने आरोग्यविषयक अनेक फायदे होतात परंतू प्रामुख्याने होणारे चार फायदे पुढील प्रमाणे

१. रोज पोट साफ राहण्यास मदत होते.

२. वजन कमी राहण्यासाठी उपयोगी पडतात.

३. कोलेस्टरॉल कमी होते.

४. मधुमेही रुग्णांची साखर आटोक्यात राहते.

तंतूमय पदार्थ 

१. फायबरचे प्रमाण वाढावे याकरता उकडलेले किंवा मोड आलेले कडधान्य खावे.

२. हिरव्या पालेभाज्यांच्या आहारात समावेश करावा.

३. धान्याचे पदार्थ बनवताना त्या धन्याच्या कोंड्यासकट त्या धान्याचा वापर करावा. उदा. बाजरीची,ज्वारीची कोंड्यासकट भाकरी, गव्हाच्या कोंड्यासकट पोळी 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon