Link copied!
Sign in / Sign up
35
Shares

इतकीशी मोहरीचे फायदे अफाट : जाणून घ्या

मोहरी हा घटक स्वयंपाक घरातला खूप महत्व असलेला आहे. मोहरी नाही टाकली खूप पदार्थांना चव येत नसते. आणि खूप स्त्रियांना जेवण बनवताना मोहरी टाकण्याची सवय असते. आणि त्यांचे म्हणणे असे असते की, मोहरी टाकल्याशिवाय माझा स्वयंपाकच होतच नाही. पण तुम्हाला माहितीये का ? तुम्हाला इतकी आवडणारी मोहरीचे फायदे आणि उपयोग किती आहेत. आणि त्याचबरोबर ह्यातून मिळणे अप्रत्यक्ष फायदे तुम्ही जाणून घ्यायला हवेत. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आम्ही त्याविषयी माहिती देत आहोत.

 

१) आयुर्वेदानुसार मोहरी तेलकट असून कोरडा, कडू, तिखट, कफवातनाशक, पित्तवर्धक, वेदना दूर करणारे, गर्भाशय व हृदय यांना उत्तेजना देणारे तसंच कृमिनाशक असते.

२) मोहरीच्या तेलात मीठ टाकून दररोज दात घासल्याने दात चमकदार होतात आणि प्रयोग नियमित केल्यास दात खराब होत नाहीत.

३) कापूरमिश्रित मोहरी तेल केसांना लावल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत, तसंच ते घनदाट होतात. रोज मालीश केल्याने डोकं शांत राहतं आणि झोपही चांगली लागते.

४) ऐकण्याची शक्ती क्षीण असलेल्यांनी दिवसातून ४-६ वेळा दोन्ही कानांमध्ये मोहरीच्या तेलाचे एक किंवा दोन थेंब घालावेत. ऐकण्याची क्षमता सुधारते.

५) टॉन्सिल्स किंवा गळ्याच्या आजारावर मोहरीचा काढा घेतला जातो. दातदुखीवर मोहरीच्या काढ्याच्या गुळण्या कराव्यात.

६) शरीरावर आलेला एखादा फोड पिकत नसेल तर मोहरीचं चूर्ण तयार करून त्याचा लेप त्यावर लावल्याने लवकर आराम पडतो.

मोहरी उष्ण असल्याने वाताचं शमन करते, म्हणून संधीवातावर मोहरीचं तेल अत्यंत गुणकारी असतं.

७) लकवा, कंबरदुखी, चिकनगुनिया यांसारख्या आजारांत रुग्णांच्या हातापायांना मोहरीच्या तेलाने मालीश करावं.

कुष्ठरोग झाला असल्यास, अंगाला खाज येत असल्यास किंवा घाम येत नसेल तर मोहरीचं तेल लावावं.

८) बाळंतिणीलाही मोहरीच्या तेलाने मालीश करतात.

९) थंडीच्या दिवसांत लहान मुलांचं झोपण्यापूर्वी मालीश करावं. जेणेकरून शरीरात ऊब निर्माण होऊन सांधे आणि हाडं मजबूत होतात.

१०) दररोज फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारून पोटाचे विकार दूर होतात.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon