Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

स्वयंपाक करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा

इसेन्शियल ऑईल चे अनेक उपयोग आहेत. त्यांचा वापर त्वचेवर वरून लावण्यासाठी किंवा वासासाठी खास करून केला जातो. आजकाल या आॅईल्सने स्वयंपाक करण्याची एक नवीन कल्पना चर्चेत आली आहे. अनेकजण याचा वापर स्वयंपाकात देखिल करू लागले आहेत. अन्न शिजवतांना हे इसेन्शियल ऑईल  स्वयंपाकात वापरले तर अन्नाची चव वाढते. हे ऑइल  कॉनसेंट्रेटेड असल्यामुळे याची थोडीशी मात्रा सुद्धा स्वयंपाकात पुरते. परंतु सगळेच इसेन्शियल ओईल हे स्वयंपाकात वापरण्यासाठी योग्य नसतात. याबाबतीत नीट माहित करून मगच याचा वापर करा.

इसेन्शियल ऑईल वापर आज जगण्यात अनेक गोष्टींसाठी लाभदायक आहे. संप्रेरकांचे असंतुलन ते त्वचेवरचे पिंपल इथपर्यंत अनेक उपचारांसाठी यांचा वापर केला जातो. यांचा आहारात समावेश करण्याबाबत अनेकजणांचे दुमत आहे. काही इसेन्शियल ऑईल हे आहारात वापरल्याने फायदा होतो तर काही आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. आम्ही इथे महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत ज्या या ओईल्स चा वापर स्वयंपाकात करण्यापूर्वी तुम्ही नक्की माहीत करून घ्या.

१. लेबल नीट तपासून घ्या.

इसेन्शियल आॅईलच्या बाटलीवरील सामग्रीत ‘१००% शुद्ध तेल’ लिहिलेले आहे याची खात्री करून घ्या. शुद्धातेसोबत यावर एक लेबल अजून असायला हवे ज्यात ‘फूड ग्रेड’ म्हणून या तेलाची श्रेणी नमूद केलेली असते. यावरून त्याचा स्वयंपाकात वापर केला जाणे योग्य आहे की नाही हे ठरवले जाते. अनेकदा ही श्रेणी जरी दिलेली असली तरीही अनेकदा असे तेल खाण्यात वापरण्यास योग्य नसते.

२. असुरक्षित इसेन्शियल ओईल टाळा.

अनेक दीर्घ संशोधनांमधून असे सिद्ध झाले आहे की काही इसेन्शियल आॅईल्सचा आहारात केला जाणारा वापर हा सरळ व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम करतो. म्हणायचे झाले तर, केवळ १ चमचा विंटरगार्डन इसेन्शियल आॅईल (wintergarden essential oil) किंवा युकलिप्टस इसेन्शियल आॅईल (eucalyptus essential oil ) आहारातून शरीरात जाणे लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. अजून एक असुरक्षित तेल म्हणजे पेनिराॅयल इसेन्शियल आॅईल (pennyroyal essential oil) . यात ८०% पुलोगोन (pulegone) असते जे मानवी मनावर भासात्मक गोष्टींद्वारे परिणाम करते.

अजून एक म्हणजे हॉर्सराॅडीश आॅईल. (horseradish essential oil) या इसेन्शियल आॅईलमध्ये अलोलाय आयसोथोसायनेट ( allyl isothiocyanate) असते जे पोटात गेल्याने त्वचा, डोळे, नाक आणि म्युकसला मोठ्या प्रमाणात जळजळ होते. तेंव्हा कोणतेही इसेन्शियल ओईल आहारात घेण्यापूर्वी त्याविषयी सखोल माहिती जाणून घ्या आणि मगच त्यांचा वापर करा.

३. स्टोअर करणे.

काही पदार्थ जसे मध, इसेन्शियल आॅईल यांची शेल्फ लाईफ खूप जास्त असते. असे पदार्थ लवकर खराब होत नाहीत. त्यांना योग्य जागेवर स्टोअर केल्यास ते दीर्घकाळ टिकतात. नेहेमी गडद रंगाच्या बाटलीतले इसेन्शियल आॅईल विकत घ्या. त्यांचा प्रभाव कमी होऊ नये म्हणून त्यांना थंड आणि कमी उजेडाच्या जागेत स्टोअर करुन ठेवावे लागते. सायट्रीक अॅसिड असणारे इसेन्शियल आॅईल जसे की लेमनग्रास इसेन्शियल आॅईल, ग्रेपफ्रुट इसेन्शियल आॅईल, किंवा टँगरीन इसेन्शियल आॅईल यांना फ्रीजमध्ये ठेवावे लागते अन्यथा त्यांचे ऑक्सिडेशन होऊन ते खराब होऊ शकतात.

४. गरम करणे.

पदार्थाला चव आणण्यासाठी किंवा त्याला सुगंध देण्यासाठी इसेन्शियल ओईलला गरम करणे हा पर्याय नसतो. हे तेल अतिशय कॉनसेंट्रेटेड असल्यामुळे २-३ थेंब देखील पुरतात. सजावट करतांना किंवा पदार्थ सुगंधित करण्यासाठी तुळशीचे इसेन्शियल आॅईल किंवा गवती चहाचे इसेन्शियल आॅईल तुमच्या नेहेमीच्या खाद्यतेलात टाकू शकता जसे की ओलिव्ह आॅईल, सूर्यफुलाचे किंवा नारळाचे तेल.

काही थंड पेयात जसे की कोल्ड टी किंवा स्मूदी मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या इसेन्शियल आॅईलचे २ थेंब टाकून फ्लेवर वाढवू शकता.

इसेन्शियल आॅईलमध्ये अनेक अस्थिर घटक असतात जे गरम केल्यास हवेत उडून जातात. यामुळे या आॅईलचा फ्लेवर आणि प्रभाव कमी होतो. तेंव्हा पदार्थ जास्त गरम नसतांना किंवा गॅस बंद केल्यावरच त्यात इसेन्शियल आॅईल मिसळा म्हणजे तुमच्या पदार्थाला छान फ्लेवर येईल. पदार्थाला वास देण्यासाठी केला जाणारा वापर सोडून या आॅईल्सचा आहारात समावेश केल्याने काही फारसे फायदे याद्वारे होत नाही. परंतु यांना विरळ करून त्वचेवर किंवा वाफेच्या स्वरुपात वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

गरोदर स्त्रिया किंवा बाळंतीण स्त्रियांनी इसेन्शियल आॅईल्सचा वापर करणे शक्यतो टाळावे. इसेन्शियल आॅईलच्या वापराबद्दल फारशी जागरूकता नसतांना त्यांचा अतिवापर किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने टॉक्सिन्सची निर्मिती होते. तुम्ही जर यांचा वापर करणार असाल तर त्यापूर्वी एखाद्या अरोमालॉजीस्ट किंवा हर्बालीस्टचा सल्ला जरूर घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon