लहान मुलांना रोज काय भरवावं. या विचारात असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त आहे मुल १ वर्षाचे झाल्यावर साधरणतः सगळ्या प्रकारचे अन्न जे पचायला हलकं आणि गिळायला सोप्प असे सगळे पदार्थ खाऊ शकतात. फक्त मुलाला कोणत्या पदार्थाची ऍलर्जी नाही ना हे जाणून घ्या.
पातळ आणि पेजेसारखे पदार्थ कमी करून हळू-हळू सामान्य जेवणाची सवय बाळांना लावायची वेळ आली आहे. पण जर मुलांना अजून चावायला आणि गिळायला त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर मात्र त्याला जबरदस्ती करू नका
पुढील आहाराच्या वेळापत्रकाचा आधारे तुम्ही लहान मुलांना सर्व प्रकारची पोषणमूल्ययुक्त आहार देऊ शकता
सोमवार
सकाळी :स्तनपान / वरचे दूध
नाश्ता - तुम्ही जे घरात नाश्त्याला कराल त्यातले थोडेसे बिना तिखटाचे किंवा पातळसर किंवा बारीक करून बाळाला भरावा. जर उपमा किंवा सांज केला असेल तर बाळा फक्त कमी हळद आणि मीठ घालून उपमा,सांजा द्यावा,पोहे केले असल्यास तिखट नसलेले पोहे थोडेसे पोहे, घावन केले असल्यास घावन असे पदार्थ भरवावे पावाचे पदार्थ भरवणे टाळावे
जेवायच्या आधी आणि नाश्त्यानंतर थोड्या वेळाने : चिक्कू सारखे फळाच्या फोडी
दुपारचे जेवण : वरण किंवा कमी तिखट मुगाची आमटी आणि भात
रात्रीचे जेवण :एखादी भाजी पोळीचे बारीक तुकडे करून त्याबरोबर कमी मसालेदार भाजी-पोळी भरवावी
रात्री उशिरा : रात्री उशिरा खूप भूक लागल्यावर स्तनपान किंवा वरचे दूध पाजावे
मंगळवार
सकाळी : स्तनपान /वरचे दूध
नाश्ता : उपीट,घावन
जेवायच्या आधी आणि नाश्त्यानंतर थोड्या वेळाने : एका केळ्याचे तुकडे करून भरवावे
दुपारचे जेवण : एखाद्या पातळ भाजी बरोबर किंवा उसळीच्या रसाबरोबर भात
रात्रीचे जेवण : पोळीचा पराठा किंवा आंबोळी,भाजी पोळी
उशिरा रात्री :स्तनपान किंवा वरचे दूध
बुधवार
सकाळी : स्तनपान /वरचे दूध
नाश्ता : पौष्टिक डाळीचा किंवा धान्यांचा डोसा
नाश्त्यानंतर जेवनाच्याआधी : एखादं फळ
दुपारचे जेवण : कढी भात, किंवा आमटी भात
रात्रीचे जेवण : एक किंवा अर्धी पोळी पोळी -भाजी किंवा घावन किंवा डोसा
रात्री उशिरा : दूध
गुरुवार
सकाळी : दूध
नाश्ता : साबुदाण्याची कमी तिखट मीठ घालून केलेली खिचडी किंवा खीर
जेवायच्या आधी आणि नाश्त्यानंतर थोड्या वेळाने : सिझन नुसार फळ जेव्हढं जाईल तेव्हढं
दुपारचे जेवण : आज जर अदमोर कमी आंबट दही भात भरवावं
रात्रीचे जेवण : घरी केलेलं एखादं सूप आणि वर्ण भात
रात्री उशिरा : दूध
शुक्रवार
सकाळी : दूध
नाश्ता : एक उकडलेले अंड स्लाइस करून भरवाव
नाश्त्यानंतर दुपारच्या जेवण आधी : उकडलेल्या बटाट्याच्या छोट्या ३,४ फोडी
दुपारचे जेवण : एखादी उसळ आणि भात असे खाऊ घालावे
रात्रीचे जेवण : पोळी आणि फ्लॉवरची भाजी
रात्री उशिरा : दूध
शनिवार
सकाळी लवकर :दूध
नाश्ता : मुगाचे घावन
नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी : काकडीच्या ३,४ चकत्या भरावा
दुपारचे जेवण : पोळी आणि पालक भाजी
रात्रीचे जेवण : वरण किंवा आमटी भात
रात्री उशिरा : दूध
रविवार
सकाळी -दूध
नाश्ता :रव्याची किंवा गव्हाची खीर
नाश्त्या नंतर आणि दुपारच्या जेवणाच्या आधी : गाजराच्या चकत्या करून त्या भरवाव्या
दुपारचे जेवण : कमी तिखट आमटी आणि कमी आंबट रवा इडली
रात्रीचे जेवण :वरण/आमटी भात
असा दर आठवड्याला भाज्या उसळ आणि आमटी वेगवेगळी धान्यांची घावने यांचा आलटून पालटून आहारात समावेश करावा
रात्री जास्त जड अन्न देऊ नये मांसाहार करत असाल तर त्यातील रस सूप असे कमी तिखट पचायला हलके पदार्थ आहारात असावेत.
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा
