Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

एका स्त्रीने पायी प्रवास केला काश्मीर ते कन्याकुमारी.......पण का ?

स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहून प्रत्येक समस्याला तोंड देऊन सक्षमपणे संसारात उभे रहावे. स्त्री ही डिलिव्हरीच्या वेळी सर्वात जास्त वेदना सहन करत असते. आणि तरीही तिला कमजोर समजले जाते. आणि स्त्रीने ज्या ज्या वेळी तिच्यावर संकट आलेय तिने स्वतःला सिद्ध (प्रोव्ह) केले आहे. तेव्हा अशीच एका स्त्रीची जिद्दीची कहाणी. ही बाई देशभर फिरतेय. महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या या सृष्टी बक्षी.  कन्याकुमारी ते काश्मीर अशी त्यांची सध्या पदयात्रा सुरू आहे. 3 हजार 800 किलोमीटरचा प्रवास त्या पायी करणार आहेत. १५ सप्टेंबरला कन्याकुमारीहून त्यांनी ही मोहीम सुरु केलीय. क्रॉसबो माईल्स नावाने सुरु असलेल्या 260 दिवसांच्या या मोहिमे अंतर्गत तिची पदयात्रा नुकतीच नागपूरला पोहोचली.

पदयात्रेच्या दरम्यान त्या विविध गावांत महिलांच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रं घेते. स्त्रियांनी सशक्त कसे व्हावे ह्याविषयी ती सांगत असते. त्याचबरोबर स्वसंरक्षणाचे धडेही त्या महिलांना देतात. महिला सक्षमीकरणाच्या संदेशाबरोबरच ती विविध शहरांमध्ये वॉल पेंटिंगही करते.

कोण आहे सृष्टी बक्षी?

 

 सृष्टी ही तुमच्या -माझ्या सारखीच स्त्री आहे. पण ती पुढे पाऊल टाकून काहीतरी करून दाखवण्याची उर्मी दाखवत आहे. आणि आपल्यालाही ती आत्मविश्वास देत आहे.  

सृष्टी बक्षी हॉगकाँगमध्ये एका मल्टी नॅशनल कंपनीत उच्चपदावर कार्यरत होत्या. यावेळी त्यांनी बुलंद शहराजवळ एका मुलीवर व तिच्या आईवर झालेल्या बलात्काराची घटना हायवे ९१ रेप केसबद्दल वाचलं. या घटनेची माहिती वाचल्यानंतर सृष्टी पुरत्या हादरल्या. त्यानंतर त्यांनी महिला सबलीकरणाचा ध्यासच घेतला. त्याअंतर्गतच त्यांनी क्रॉसबोमाईल्स या मोहिमे अंतर्गत ही पदयात्रा सुरू केलीय. 

तुमची स्वतःची अशीच प्रेरणादायी कथा असेल तर आम्हाला नक्कीच लिहा. आम्ही ती आमच्या वॉल वरून १ लाख ६० हजार मॉम्स/ स्त्रियांपर्यंत पोहोचवू. कारण तुमच्यातली प्रेरणा इतर मॉम्सनाही घेऊ द्या. तेव्हा नक्कीच लिहा. आणि प्रत्येक स्त्रीला तुमच्यातली प्रेरणा जाणून घ्यायची आहे.  

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon