Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

एका वैवाहिक स्त्रीचे आयुष्य समागमामुळे उद्ध्वस्त झाले . . . सत्य कथा


 

कोणत्याही नात्यात लग्न ही एकच गोष्ट महत्वाची नसते. तर एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या मतांचा आदर करणे आणि विश्वास ठेवणे यावर नाते टिकून असते. दोघांमधली इंटेमसी(संबंधातला नाजूकपणा) ही केवळ नात्याच्या सुंदरतेला जोडलेला एक घटक असतो. असे असले तरी दोघांमधील शारीरिक नाते जर आनंदी नसेल तर खूप समस्या उद्भवू शकतात.

तुमचे कामजीवन पूर्णतः तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामधील नात्यावर अवलंबून असते. पण आम्ही तुम्हाला सांगितले की, या सेक्समुळे(समागमामुळे) एका विवाहित स्त्रीचे आयुष्य उध्वस्त झाले ? तुमचा जोडीदार जास्तीची शारीरिक मागणी करत असेल आणि तुम्हाला ती पूर्ण करायची इच्छा नसेल तर? हा एक प्रकारचा घरगुती हिंसाचार आहे. शारीरिक शोषणाचा हा प्रकार तुमच्या घरातही होऊ शकतो आणि तुमच्या लक्षात देखील येणार नाही की, तुम्ही या भयानक कृत्याच्या बळी ठरल्या आहात.!

इथे आम्ही एका मेरी नावाच्या विवाहित स्त्री ची कथा सांगणार आहोत. तिच्या नवऱ्याच्या वाढत्या शारीरिक भूकेपोटी तिचा संसार उध्वस्त झाला..

१) तिला तिच्या नवऱ्याबद्दल लग्नाआधी पूर्ण माहिती नव्हती की ?

तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल जाणून घ्यायला पुरेसा वेळच मिळाला नाही. लग्न ठरल्यानंतर २ महिन्यातच झाले. त्या दोघांना एकमेकांसोबत आयुष्य काढायचे असतांना २ महिन्याचा काळ एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा असतो असं तुम्हाला वाटत का?

लग्नाच्या रात्री त्या दोघांनी एकमेकांवर स्वखुशीने प्रेमाचा वर्षाव केला. एका अनोळखी माणसासोबत, ज्याला आपण फक्त २ महिन्यापूर्वी भेटलो आहोत त्याच्याशी शारीरिक समरूप होणे हे जणू काही तिचे कर्तव्यच होते असे समजून मेरीने ती रात्र त्याला समर्पित केली. आता तो तिचा नवरा होता आणि ती त्याची अर्धांगिनी.

२) त्याला काही असे करायचे होते..

जसा जसा काळ गेला तसं मेरीच्या लक्षात आलं की तिचा नवरा हा एक आसक्त पुरुष आहे. त्याच्यात कामभावनेची खूप आसक्ती आहे. त्या दोघांमध्ये लग्नाच्या सुरवातीच्या दिवसात खूप क्रेझी असा सेक्स घडत असे. कोणत्याही गोष्टी वरून दोघांचे प्रेम भरून येई. एके रात्री त्याने तिला BDSM करण्याविषयी त्याची इच्छा तिला बोलून दाखवली. मेरीला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला पण तिनेही यापूर्वी अनुभव नसल्यामुळे एकदा ट्राय करण्याचे ठरवले आणि होकार दिला !

३) त्याची वाढती शारीरिक मागणी

हळू हळू त्याची शरीराची मागणी वाढत गेली. तो कामवासनेच्या अधीन झाला. मेरी सांगते “ आम्ही एका रात्रीत एकदा सेक्स करायचो परंतु आता दिवसातून ३ वेळा हे घडत आहे ! सकाळी मी झोपेतून पूर्ण जागी पण होत नाही की तो सुरु व्हायचा”

या सर्व लैंगिक मागणीमुळे मेरीच्या लक्षात आले की तिचे शरीर नाजूक होत चालले आहे. मेरी म्हणते “मी त्याला म्हणाले, ‘बस झालं, थांब!’’ मेरीच्या या वागण्यातून तिला त्रास होत आहे हे त्याला कळले असावे असे तिला वाटले, पण त्यानंतर तिला समजून घेण्याऐवजी तो तिला म्हणाला “जा एखाद्या सेक्सोलॉजिस्ट ला दाखवून ये तुझा प्रॉब्लेम”

४) ती त्याच्या मागण्या पूर्ण करू शकली नाही

 

         लग्नाच्या एका वर्षानंतर मेरीला वाटू लागले की ती तिच्या नवऱ्याच्या शारीरिक मागण्या पूर्ण करू शकत नाही. तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास कमी वाटू लागला. तिला तिच्या नवऱ्यासमोर होणाऱ्या अवस्थेमुळे नैराश्य आले होते. मेरीला वाटे की ती कुठल्याच लायकीची नाही.

 ५) फोन समागम

मेरीने शेवटी धीर एकवटून तिच्या नवऱ्याला सेक्ससाठी विचारले. त्याने ते मान्य केले....परंतु त्याची अट होती की तिच्याशी तो ऑफिस मधून सेक्स करेल! मेरीला त्याचे हे बोलणे विचित्र वाटले, पण ती त्याला पुढे काहीच म्हणाली नाही.

६) नैराश्य आलेली मेरी 

मेरीच्या नवऱ्याने तिला केवळ फोन सेक्सवर नाही जाऊ दिले, तिला फोटो पाठवायला सांगितले, वेब कॅमेरा वापरून तिच्याशी तो ऑफिसमधून फोन सेक्स करत असे. तिने शांत राहून या सगळ्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर तो घरी आल्यावर त्यांच्यात ३ तासातच ३ वेळा सेक्स घडला.! त्याची कामवासना परत आसक्त झाली होती.

७) “ मी नाकारले, पण तो थांबला नाही”

तिच्या लवकरच लक्षात आले की सेक्स मुळे त्या दोघांचे नाते आणि शेवटी हे लग्न कसे मोडकळीस आले आहे. या एकाच गोष्टीमुळे ते दोघे मानसिकरीत्या एकमेकांपासून दुरावत आहेत. तिचा नवरा तिच्या बाबतीत एकदम असंवेदनशील झाला होता. तिच्या नाकारण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नसे. तिचा अर्धांगिनी म्हणून नव्हे तर एखाद्या सेक्स आॅब्जेक्ट सारखा वापर तो करू लागला होता.

८) त्याने कबुली दिली

पण एके दिवशी तिच्या नवऱ्याने तिला ऑफिस मधून फोन केला. “ आज मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे” असे म्हणाला. संध्याकाळी घरी लवकर येऊन त्याने तिच्यासमोर त्याच्या सगळ्या कृत्यांची कबुली देऊन माफी मागितली. त्याने त्याचा सगळा भूतकाळ तिला सांगितला. लग्नाआधीचे त्याचे आयुष्य तिला ऐकवले. त्याच्या या कामवासनेच्या आसक्तीचा त्याच्या जुन्या गर्लफ्रेण्ड्सला सुद्धा त्रास होता असे त्याने कबुल केले. त्याने मेरीची माफी मागितली. पण त्यानंतर तो जे म्हणाला ते मेरीसाठी धक्कादायक होते. तो म्हणाला “ मला माफ कर, मी माझी ही सवय कंट्रोल करू शकत नाही”

९) आयुष्याचे आता काय होऊन बसले....

“ आमच्या लग्नाला २ वर्षे झाली पण आम्ही दोघे एकाच घरात दोन अनोळखी माणसांसारखे राहतो. एके दिवशी मी धीर एकवटून हे नाते कायमचे तोडून टाकण्याचा निर्णय घेतला” त्या दिवशी मेरीला लक्षात आले होते की आयुष्यात हे नाते पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही. या विषारी नात्याचा तिला कंटाळा आला होता. तिला कळून चुकले होते की कोणतेही नाते टिकायला मानसिक आणि भावनिक जवळीक तर लागतेच पण शारीरिक पातळीवर पण दोघे एकमेकांशी कम्पॅटिबल असायलाच हवेत. तरच नाते टिकते.

मेरीने तिच्या नवऱ्याशी असलेले हे विषारी नाते तोडले.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon