Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

एका नुकत्याच आई बनलेल्या स्त्रीच्या आयुष्याची झलक !!


नुकतीच आई बनणे ही खरोखर एक अद्भुत भावना असते; आणि हा क्षण आयुष्यभरासाठी अविस्मरणीय असा असतो. तरीदेखील, जेव्हा एखाद्या स्त्रीच्या मातृत्वावस्थेतील पदार्पणाविषयी बोलायचे असेल, तर आपल्या मनात येणारा पहिला विचार म्हणजे: तिचा संघर्ष आणि तिच्यासमोरील आव्हाने! परंतु मातृत्व हे त्यापेक्षाही बरेच काही आहे. बाळ एका नव्यानवेल्या आईच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल आणि आनंद घेऊन येते. रोज सकाळी जागे होताना तान्हुल्याला शेजारीच निजलेले पाहणे यापेक्षा कोणताही अलौकिक अनुभव असू शकत नाही. तर चला, आपण एका नुकत्याच आई बनलेल्या स्त्रीच्या आयुष्याची झलक पाहुयात.

१) आई आणि तिच्या बाळावर अमर्याद प्रेम 

बाळाबरोबर असताना, पूर्ण परिवार आणि जवळच्या व्यक्ती त्यांच्या नेहमीच्या स्वभावाबाहेर जाऊन या नव्या आईचे लाड पुरवतात आणि तिला खास वागणूक देतात. आईला योग्य अशी विश्रांती मिळावी म्हणून बाळाला आलटूनपालटून सांभाळण्यापासून, ते तिच्या आहारविषयक पथ्याची काळजी घेण्यापर्यंत, तिला मिळणारी विशेष देखभाल आणि प्रेम हे खरोखर लक्षणीय असते.

२) बाळ स्वतःबरोबर भरपूर सकारात्मक ऊर्जा आणि आनंद घेऊन येते

काही अपवाद वगळता, शिशुचे आगमन हे नव्या माऊलीचे आयुष्य अमाप सकारात्मकतेने भारून टाकते. ते लहानगे मूल आपल्या आईला खिळवून ठेवते. ती आपल्या बाळातच एवढी गुंतलेली राहते की, तिच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या नकारात्मक वा निराशाजनक विचारांना तिच्या आयुष्यात थारा मिळत नाही.

३) आपले खरे सामर्थ्य जोखता येते

बाळाला सांभाळणे हे एका नव्या आईसाठी सोपे असेलच, असे नाही. तथापि, एक नवी आई ज्या आव्हानांचा आणि संघर्षाचा सामना करते, ते तिला भविष्यासाठी आणखी कणखर(विशेषतः मानसिकरित्या) आणि करारी बनवतात. काही महिलांसाठी हा काळ त्यांची स्वतःची खरी ओळख त्यांना जाणवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

४) बाळाबरोबरच आईदेखील पुनश्च एकदा तिचे बालपण अनुभवते

आपणा सर्वांमध्ये एक मूल दडलेले असते. दुर्दैवाने ते मूल आपल्या रोजच्या (वैयक्तिक वा व्यावसायिक) आयुष्यातील संघर्षात कुठेतरी हरवून जाते. बाळाच्या निरागस हालचालींकडे(जसे की झोपल्यानंतरचे बाळाच्या चेहऱ्यावरील भाव) नुसते पाहणेही नव्या आईच्या ताणतणावावर एक परिणामकारक टॉनिक ठरू शकते. ते तिच्यातील दीर्घकाळ दडपलेले लहान मूल मुक्त करते. मग ती आईदेखील तिच्या बाळाच्या ओठांवरचे अमूल्य हसू परत आणण्यासाठी वेडे चाळे करते.

५) स्तनपान हे आई आणि बाळ दोघांसाठी वरदान ठरले आहे

वेळोवेळी डॉक्टरांनी आणि आरोग्याच्या अभ्यासकांनी स्तनपानाचे फायदे ठासून सांगितले आहेत. बाळासाठी स्तनपानापेक्षा जास्त पौष्टिक कोणतीही गोष्ट असू शकत नाही. बाळाला अंगावर पाजणे हे नुकत्याच झालेल्या आईसाठी आरोग्यवर्धक असते. ते ऑक्सिटोसिन हॉर्मोनच्या निर्मितीसाठी उत्प्रेरकाचे कार्य करते. ऑक्सिटोसिन हे आईच्या दुधाची निर्मिती वाढवण्याबरोबरच, आईवर शांतीदायक परिणाम करते; ज्यामुळे तिला जास्त आराम मिळतो. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, अवघ्या काही महिन्यांचे स्तनपान हे आईची हाडे अधिक मजबूत बनवते. तसेच ते नुकत्याच झालेल्या आईमधील स्तन, अंडाशय वा गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका लक्षणीयपणे कमी करते.

बाळाला सांभाळणे हे एक पूर्णवेळ असलेले आणि बहुतेकदा उपेक्षित झालेले काम असू शकते; परंतु ते एका नुकत्याच बनलेल्या आईला तिच्या अस्तित्वातील सर्वोत्तम क्षणसुद्धा बहाल करते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon