Link copied!
Sign in / Sign up
159
Shares

नुकत्याच आई झालेल्या पत्नीने पतीस लिहलेलं हृदयस्पर्शी पत्र

       जो फक्त माझा वैवाहिक सोबतीच नव्हे, तर माझ्या आयुष्याचाच एक परिपूर्ण भाग आहे अशा जोडीदारास;

मला माहितीये, बाळाच्या जन्माचे नियोजन करण्याआधीपासूनच आपल्या दोघांनाही पालक होण्याची कल्पना खूपच भावली होती; आणि आपण आपल्या बाळावर निरातिषय प्रेमही करतो. आयुष्यातील या नव्या टप्प्यामुळे आपल्या आयुष्यात कस-कसा बदल होईल, याविषयी मी तुझ्याशी बोलायचे आणि आपण या स्थित्यंतराविषयी कसे साशंक असायचो; हे मला पक्के आठवतेय. आपण आर्थिकदृष्टया कुणावर अवलंबून नाही किंवा असे म्हणता येईल की,आपण सन्मानाने परिवारासाठी कमावतो आणि आपल्याला नेहमीच आयुष्यात हवी ती गोष्ट मिळालेली आहे. परंतु तुला हे मान्य करावेच लागेल की, बाळ आपल्या आयुष्यात येईपर्यंत आपण आपले आयुष्य गृहीतच धरुन चाललो होतो.

आपली एक व्यस्त अशी जीवनशैली होती, ज्यात शिस्तीचा अभाव होता. ते आयुष्य दीर्घ अशा ऑफिसच्या वेळा, अनियमित जेवण, शारीरिक तंदुरुस्तीसाठी अतिशय कमी वेळ वा वेळच नसणे अशा भरपूर प्रसंगांनी भरलेले होते. अर्थातच, आपण आपल्या वैवाहिक आयुष्याचा मनसोक्त आनंद घेतलेला आहे आणि जरी आपल्याला कधीकधी वाटत असेल की, कालानुरूप आपल्यामधील प्रेम कमी होतेय; पण वास्तवात तसे काहीच नाहीय! आपल्या दोघांनाही हे पुरेपूर माहितीय की, आपण एकमेकांकडे असलेल्या वेळाचे योग्य भान ठेवतो आणि एक दुसऱ्याच्या वेळाची आपण कदरही करतो. कारण, दर दिवशी पुष्कळ असा कामाचा व्याप आपल्यासमोर असतोच. तरीही यापेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, आपण एकमेकांविषयी असणारे प्रेम हे या तान्ह्या छकुल्याला वाढवताना व्यक्त करतो. हे बाळ आपल्या प्रेमाचेच तर प्रतीक आहे; नाही का?

मला माहितीय, तरुण आणि नव्या पालकांची एकाच वेळी हे सर्व सांभाळताना आणि पालकत्वाची जबाबदारी चोख पार पाडताना तारांबळ उडते. मला हेही माहितीये, तू याबाबत कधीही तक्रार केली नाहीय; पण कधीकधी आपण एकमेकांच्या डोळ्यांमध्ये ही त्रस्त आणि थकीत नजर पाहिलेली आहे. परंतु खरे सांगायचे झाले, तर आपल्या बाळाबरोबरची ही वर्षे आपल्याला परत कधीही अनुभवता येणार नाहीत; आणि आपल्या परिवारासह मौल्यवान आणि संस्मरणीय अशा आठवणींची निर्मिती करणे, यासाठी हीच योग्य वेळ आहे. तुला आठवतंय का; एकदा आपल्या सोबत आपले पालक होते आणि तेव्हा त्यांच्याकडे काही तासांसाठी बाळ ठेवून आपण 'स्पा' मध्ये एखादया सेशन चा आनंद लुटला असता; पण आपण ती योजना रद्द केली आणि त्याऐवजी आपण सर्वांना घेऊन बीच वर हिंडायला गेलो. आपण एकमताने ठरवलेला तो निर्णय आठवला की, आजही माझ्या मनात खुशीची लहर उमटते. पाहा! म्हणूनच जरी कधीकधी आपणात मतभेद उत्पन्न होत असले; तरी अशा महत्त्वाच्या प्रसंगांत विरुद्ध वागण्याचा विचारही आपल्याला शिवत नाही.

आता यावर बोलतच आहोत; तर फक्त इथवर बोलूनच थांबणार नाहीय आपण; होय ना? मला कळतंय, जेव्हा आपले बाळ पौगंडावस्थेत प्रवेश करेल, तेव्हाचा काळ आपल्यासाठी धाकधूकीचा ठरेल; पण त्याचबरोबर आपल्या दोघांनाही आपण आपल्या 'त्या' वयात ज्या चुका केल्या; त्या सुधारण्याची संधी मिळेल. तसेच ज्या गोष्टी आपल्याला नीट प्रकारे शिकवायला पाहिजे होत्या, त्या आपण नीट शिकवू शकतो. भूतकाळातील आपण अनुभवलेत, तसाच हाही एक सुंदर अध्याय असेल. तर या अद्भुत संधीचा आपण जास्तीत जास्त लाभ घेऊयात; आणि आयुष्याचा प्रत्येक टप्पा मोकळेपणाने स्वीकारुयात.

मी दुसऱ्या कुठेही असण्याचा निर्णय अजिबात घेतला नसता आणि मला माहितीय, आपण चुका करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यामधून शिकण्यासाठीही पुरेपूर तयार आहोत!

सर्वस्वी तुझीच,( आणि आता बाळाची )

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon