Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

एक्टोपिक प्रेगन्सी म्हणजे काय ?

एक्टोपिक गर्भधारणा या संकल्पने विषयी तुम्ही वाचले असेल किंवा कदाचित ऐकले असेल. नसेल तर त्याविषयी नेमकी माहिती ठेवणे आवश्यक आहे. गर्भधारणेच्या प्रक्रियेपासून ते प्रसूतीपर्यंतच्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरात टप्प्याटप्प्याने आवश्यक बदल होत असतात. यातील एक टप्पा म्हणजे बीजांड गर्भाशयात फलित होण्यासाठी पोहोचते. एक्टोपिक प्रकारच्या गर्भावस्थेत फलित अंड गर्भाशयाशी संलग्न नसते त्याऐवजी ते फॅलोपिन नलिका,ओटीपोटातील पोकळीत किंवा गर्भाशयाच्या मुखाशी फलित झालेले जाते.

सोप्प्या भाषेत तुम्ही गर्भ गर्भाशयात फलित न होता गर्भशयाशी संलग्न अवयवमध्ये म्हणजेच ते फॅलोपिन नलिका,ओटीपोटातील पोकळीत किंवा गर्भाशयाच्या मुखाशी या अवयवात रुजणे आणि फलित होतो. जिथे त्याची वाढ होणे अशक्य किंवा गुंतागुंतीचे असते

बीजांड जर गर्भशयाशी संलग्न असेल तरच ते विकसित होऊ शकते,या प्रकारच्या गर्भधारणेत मोठी गुंतागुंत होऊ शकते. या प्रकारच्या गर्भधारणेची करणे आणि लक्षणे काय हे आपण पाहणार आहोत.

 

कारणे
१. पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीज (पी आय डी )

पेल्विक इंफ्लेमेटरी म्हणजे ओटीपोटाचा दाह होणे. हा एक प्रकारचा आजार आहे. हा आजार क्लॅमिडीया,गोनोरिया यांच्या संक्रमणाने होऊ शकतो. पीआयडीमुळे फॅलोपियन नळीमध्ये घट्ट उतींची निर्मिती करू शकते यामुळे गर्भाच्या योग्य जागी फलित होण्यास आणि विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो.

२. पूर्वी झालेल्या शस्त्रक्रिया

ओटीपोटाच्या भागाशी निगडीत आधी जर काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर ते आकुंचन पाऊन गर्भ चुकीच्या जागी रुजू शकतो. यासाठी तुम्ही अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाल्यास गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घ्यावेत.

३. अनियमित वाढ

स्त्रीच्या शरीराची कोणत्याही प्रकारची अनियमित वाढ किंवा जन्मताच असलेल्या काही विकृतीमुळे गर्भाचा प्रवास चुकीचा होऊन तोगर्भाशयात रुजण्याऐवजी दुसरीकडे रुजण्याची शक्यता असते. त्यामुळे एक्टोपिक गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

४. संप्रेरकीय घटक

या प्रकारच्या गर्भधारणेसाठी अनियमित संप्रेरकेसुद्धा तितकीच कारणीभूत असतात. फॅलोपिन नळीवर संप्रेरकांच्या अनियमिततेचा प्रभाव पडतो.आणि एक्टोपिक गर्भधारणा होते.

लक्षणे

१. ओटीपोटात, खांदा,मान यामध्ये तीव‘ वेदना होतात.

२. सतत चक्कर आल्यासारखे वाटते

३. योनीतून मध्यम किंवा तीव‘ रक्तस्राव होतो

४. ओटीपोटाच्या एकाच बाजूला तीव्र वेदना होतात

५. स्तनामध्ये वेदना वाढतात, आकारात बदल होतो आणि ते सैल किंवा नाजूक होतात.

६. लघवीचे प्रमाण वाढते आणि त्याच्या रंगात थोडा बदल होतो, ती येण्यापूर्वी खूप दाब येतो ज्याचे आपण स्पष्टीकरण देऊ शकत नाही.

यातील  काही लक्षणे ही सामान्य गर्भावस्थ्येसारखी आहेत परंतु तुम्हांला  काही अनियमित वेगळी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon