Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

डिस्लेक्सिया म्हणजे काय


"शिक्षण म्हणजे जगण्याची तयारी नाही तर शिक्षण म्हणजेच जगणे "

तारे जमीन पर या सिनेमाने बहुतांश लोकांना डिस्लेक्सिया म्हणजे काय याची माहिती मिळाली. आणि डिस्लेक्सिया सारखी काही व्याधी असते याची जाणीव बऱ्याच जणांना झाली. इतके दिवस आळशी हट्टी किंवा मुद्दामून करतो या कारणाखाली मुलांना ओरडणारे पालक या गोष्टींचा गांभीर्याने विचार करू लागले. आपल्या मुलाला डिस्लेक्सिया तर नाही ना ? याबाबत जागरूकता वाढाली आहे. उपचार पद्धती देखील उपलब्ध झाल्या आहेत. तर मग चला बघूया

डिस्लेक्सिया म्हणजे नक्की काय ?

डिस्लेक्सिया म्हणजे 'डिफिकल्टी विथ वर्ड्स'. ही मेंदूच्या संरचनेशी संबंधित व्याधी असून यामुळे लिहिणं, वाचणं आणि भाषेची समज यावर परिणाम होतो. योग्य वेळी व योग्य स्वरुपात मार्गदर्शन मिळाल्यास खूपच सुधारणा होऊ शकते- (सोर्स महाराष्ट्र डिस्लेक्सिक असोसिएशन)अल्बर्ट आईन्स्टाईन, पाब्लो पिकासो, टॉम क्रूझ या ख्यातनाम व्यक्तींना डिस्लेक्सिया होता. तरी देखील या व्यक्ती आयुष्यात यशस्वीच नाही तर आपल्या कामामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या. ही व्याधी कोणत्याही मुलाला असू शकते. योग्य मार्गदर्शन, धोरण आणि योग्य प्रयत्न यामुळे मुलांना या व्याधीतून बाहेर पडायला मदत होते.

साधारण लक्षणे

१) अक्षऱे ओळखता येत नाहीत. एकसारखी दिसणारी अक्षरे, आकडे यामधील गोंधळ बीच्या जागी डी आणि डीच्या जागी बी लिहणे किंवा 9 आणि 6 यांमध्ये गोंधळ होणे

२) मोठी वाक्‍ये जोडाक्षरे न कळणे,

३) साधी-साधी बेरीज वजाबाकी सारखी गणिते सोडवत न येणे

४) फळ्यावर लिहिलेले वहीत लिहून न घेता येणे.

५) नीट उच्चार न करता येणे, उशिरा बोलणे, शब्द नीट न बोलणे, रंग, अक्षऱे, आकडे या अगदी साध्या गोष्टी न ओळखता येणे.

६) खराब हस्ताक्षर, अक्षऱे उलटसुलट लिहिणे, उच्चारातील फरक न समजणे,

७) भाषा शिकण्यात अडचणी येणे.

८) दिशा न समजणे, डावे उजवे, वर खा

जरी वरील लक्षणे मुलांमध्ये मध्ये आढळून आल्यास डॉक्ट्रांशी सल्लामसलत केल्यानंतरच निर्णय पर्यंत पोहचावे.

डिस्लेक्सिक मुलांना शिकवताना वापरायच्या काही साधारण युक्त्या आणि टिप्स 
१. विविध संवेदनांच्या आधारे शिकवणे 

शिकणे हे डिस्लेक्सिक मुलांसाठी एक अवधड प्रक्रिया असते इतर सामान्य मुलांपेक्षा यांना शिकवताना कला-कलाने घ्यावे लागतेयांचा वापर करून मुलांना शिकवावे लागते. उदा. बघणे, ऐकणे बोलणे स्पर्श करून आकार समजावून घेणे इत्यादी आणि जमतील तितका वेगळे आणि मनोरंजक बनवणे गरजेचे असते.वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून संख्या मोजणे, आवाजाच्या आधारे उच्चर आणि संख्या शब्द यातील वेगळेपण जाणवून देणे, हावभावाद्वारे गोष्टी समजवून सांगणे.

२. सहाय्यक साधने आणि तंत्रज्ञान

आजकाल अशी साधने मिळतात जी डिस्लेक्सिक मुलांना शिकवताना उपयुक्त ठरतात

पॉकेट स्पेलचेकर - याचा उपयोग मुळाक्षरे आणि अकारविल्हे बाबतीतील गोंधळ कमी करण्यास होतो (alphabetic_

लाईन रीडर : यामुळे जे शब्द अवघड आणि गोंधळाचे आहे ते हायलाइट करतात आणि त्यामुळे डिस्लेक्सिक मुलांना तो भाग वाचायला सोप्प जातो. व इतर ठिकाणी लक्ष वेधले जात नाही.

तंत्रज्ञान : लिखाण आणि वाचनात मदत करणारी संपादनाची ऍप्लिकेशन (जसे झेंपेन.ओ.ओ.), भाषण ओळखणे तंत्रज्ञान,एक शब्दांची काही अक्षरे टाईप केल्यावर पुढील अक्षरं ओळखणारे ऍप्लिकेशन , शब्दलेखन तपासणी ऍप्लिकेशन, अश्या प्रकारचे तंत्रज्ञान वेळ वाचविण्याचा आणि डिस्लेक्सिच्या काही अडचणींवर मात करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी जीवन सोपे बनविण्यास उपयुक्त ठरतात

४. मुलांसाठी उपयुक्त अशी अभ्यासक्रमाची/धड्याची मांडणी

ज्यावेळी मुलांना एखादा धडा किंवा गणितातील आकडेमोड शिकवायला घ्याल त्यावेळी मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रती करा आणि त्या संदर्भात खेळ किंवा मुलाला आवडणाऱ्या गोष्टी किंवा कार्टूनचा आधार घेऊन त्यात धड्याचा मांडणी करावी. 

 धड्यातील महत्वाचा भाग किंवा गणित गुंफून मुलांकडून अभ्यास करून घ्यावा .सोप्पे आणि ओळखीचे शब्द वापरावे, विविध फलक आणि नकाशाद्वारे गोष्टी सांगाव्या.अभ्यासपूर्ण करायला भरपूर वेळ द्यावा तसेच मुलांच्या मार्कांपेक्षा त्यांचा प्रगतीला महत्व द्यावे. मुलाची बलस्थाने आणि कमतरता जाणून घेऊन त्यानुसार तत्या गोष्टी करण्यास उद्युक्त करावे.

५. शैक्षणिक खेळ

खेळा-खेळातून शिकवलेले प्रत्येक मुलाला आवडते, त्यामुळे मुलांना आवडत असलेल्या खेळता-खेळता मुलांना शिकवावे. जसं काही शब्दांचे उच्चार गाण्यामधून किंवा गमतीशीर कवितेमधून शिकवावे.किंवा फिरायला गेले असताना गप्पा मारता-मारता काही गोष्टी शिकवावे किंवा त्यांच्या मित्रांच्या मदतीने किंवा मित्राबरोबर खेळत असताना काही गोष्टी सांगाव्या. सोप्पी कोडी घालावी. शब्दांचे खेळ मिळतात ते आणावे त्याच्या आधारे शिकवावे.

६. पालक आणि शिक्षकांशी समन्वय साधणे

इतर डिस्लेक्सिक मुलांच्या पालकांना भेटा, शिक्षकांना भेटा त्यांच्या कडून शिकण्याचा काही नवीन पद्धती नवीन प्रकार जाणून घ्या. मुलाचा कल मुलाची आवड जाऊन घ्या त्यानुसार मुलांना शिकवताना त्या गोष्टींचा वापर करा

७. भावनिक आधार

डिस्लेक्सिक मुलांना शिकवताना त्यांच्या कला-कलाने शिकवावे.त्यांना भावनिक आधार द्यावा. प्रत्येक मुल वेगळे असते तसेच त्याचा समस्या देखील वेगळ्या असतात. आणि या मुलाच्या मार्कांपेक्षा त्यांना सज्ञान आणि गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. त्यांच्या शिक्षणाच्याबाबतीत सकरात्मक दृष्टिकोन ठेवावा. इतरमुलांशी तुलना करून Everyone who त्यांचे `खच्चीकरण करू नये. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon