दुसऱ्या वेळेस गरोदर होण्याची लक्षणे कोणती. . . .
दुसऱ्या बाळाचा विचार करणे आपल्याकडे नवीन नाही. पण सध्या खूप पालक खूप विचार करून दुसऱ्या बाळाचा निर्णय घेतात. पण अजूनही काही भागात पहिली मुलगी झाली आणि त्यांना मुलगा पाहिजे. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून दुसऱ्या वेळेस बाळाचा विचार घ्यायला लावतात. तेव्हा ह्या ब्लॉगमधून आपण दुसऱ्यांदा गरोदर होताना काय अनुभव येतात आणि दुसऱ्या वेळी गरोदरपणाला कसे सामोरे जावे ह्याविषयी सांगणार आहोत.
# दुसऱ्या वेळेस गरोदर होताना काही प्रश्ने तुम्हाला पडत असतात त्याविषयी.

* मासिक पाळीत मी गरोदर होऊ शकते का ?
* खरंच मी गरोदर आहे का ? की, माझ्या मनाच्या सर्व कल्पना आहेत !
* माझी दुसरे बाळंतपण पहिल्यापेक्षा कसे वेगळे असेल ?
सामान्यपणे ह्या शंका आईला येणार आहेतच तिला बऱ्याच गोष्टीचा विचार करावा लागत असतो. तिची प्रकृती, कुटुंबातील काही समस्या, आणि तुम्ही कितपत ह्या बाबत तयार आहात.
१) स्तन नाजूक होणे
हे सगळ्यात महत्वाचे व लवकर दिसून येणारे लक्षण आहे. स्तनाचे कोमल होणे. तुम्हाला लक्षात आले असेलच की, तुमचे स्तन काही वेळा खूप नाजूक झाल्यावर ते तितकेच दुखायला लागतात. आणि निप्पल्स हे खूप गर्द काळे होऊन जात असतात.
२) थकवा येणे
लवकर थकवा येणे हे सुद्धा गरोदर असण्याचे लक्षण मानले जाते. आणि असे लक्षात आले आहे की, पहिल्या गरोदरपणापेक्षा दुसऱ्या वेळेस खूप थकवा येत असतो कारण दुसऱ्या वेळेस मासिक पाळीत आराम करायला वेळ मिळत नसतो. आणि ह्यामुळेच थकवा लवकर जाणवतो.
३) सकाळी होणारे मळमळ
हे लक्षण पहिल्या गरोदरपणासारखेच असते. सकाळी तुम्हाला मळमळ आणि काहीवेळा उलट्या सुद्धा होऊ शकतात. आणि काही स्त्रियांना डोकेदुखी सुद्धा जाणवते. काही स्त्रियांना ह्यावेळी काही सुचत नसते.
४) आणखी काही वेगळी लक्षणे

ह्या वेळी काही वेगळी लक्षणे दिसून येत असतात. खूप भूक लागणे, मलावरोध, पोटदुखी, आणि वारंवार लघवीला जावे लागणे आणि चेहऱ्यावर पुरळ उठणे.
ही लक्षणे तुम्हाला गरोदर झाल्यानंतर काही दिवसांत दिसू लागतील. आणि ह्यामध्ये आणखी काही लक्षणे आणि गोष्टी आहेत ते तुम्हाला ह्या लेखाच्या/ब्लॉगच्या दुसऱ्या भागात वाचता येईल.