Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

दुसऱ्या गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला या गोष्टींची भीती वाटते.

ज्यावेळी एखादी स्त्री दुसऱ्यांदा गरोदर होण्याचा विचार त्यावेळी त्यावेळी पहिल्या अनुभवावरून ती स्त्री सगळ्या बाबतीत खूप विचार करत असते. खूप विचार नंतर ज्यावेळी तिला खात्री पटते कि आपण आता ही जबाबदारी देखील पेलू शकतो त्यावेळी ती दुसऱ्या मुलाचा विचार करते. तिचा विचार पक्का झाला असला तरी तिला काही गोष्टींची भिती वाटत असते, या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. पहिल्या वेळा पेक्षा जास्त मोठं पोट दिसणे.

पहिल्या गरोदरपणामुळे शरीराला या बदलांची माहिती झालेली असते त्यामुळे दुसऱ्यांवेळी गर्भाची वाढ पहिल्या वेळ पेक्षा वेगाने होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या वेळी ज्यावेळी पोट दिसायला लागलेलं असतं,त्यापेक्षा काही दिवस आधी पोट दिसायला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी जास्त पोट दिसत आहे असे वाटण्याची शक्यता असते. ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत सारखी असेल असे नाही. काहीचे दुसरे गरोदरपण हे देखील पहिल्याच सारखे असण्याची शक्यता असते.

२. पहिल्या मुलावर या गरोदरपणातील त्रासाचा होणार परिणाम

या नऊ महिन्यात होणारे बदल आणि त्रास हे आपल्या पहिल्या मोठ्या मुलाने/ मुलीने पाहावे आणि त्यांना त्याची भीती किंवा त्रास हा आपल्या पहिल्या मुलाला तर होणार नाही ना? आणि यामुळे त्या नवीन येणाऱ्या बाळाबाबत त्याचा/तिच्या मनात अढी तर बसणार नाही ना ? याची भीती आईला वाटणे साहजिक आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांदा गरोदर होण्याचा निर्णय घेता त्यावेळ पासून तुम्ही मुलाच्या मनाची तयारी करायला सुरवात करा. त्यांच्या कडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. आपल्याला होणाऱ्या त्रासाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. तसेच आई आता काही दिवस जास्त खेळू शकणार नाही हे त्यांना समजवून सांगा.

३. पहिल्या मुलाला असूया तर वाटणार नाही ना ?

दुसरे मूल अगदी तान्हे असल्यामुळे तुम्हांला जास्त वेळ त्याच्याकडे लक्ष दयावे लागणार असल्याने यामुळे पहिल्या मुलाला कदाचित आई पलीकडे लक्ष देत नाही असे वाटून असूया तर वाटणार नाही ना ही काळजी दुसऱ्यांदा आई होणाऱ्या स्त्रीला नक्कीच वाटते. अश्यावेळी तुम्ही पहिल्या मुलाला सुरवाती पासून नवीन येणाऱ्या बाळाबद्दल सांगायला सुरवात करा. घरात नवीन येणारे बाळ तुझी लहान बहीण /भाऊ असणार आहे. त्याची काळजी घ्यायाची आहे त्याला त्रास नाही द्यायचा, तो आपल्या घरातला नवीन पाहुणा असणारा आहे आणि तो आपली बरोबर कायम राहणार आहे. अश्या गोष्टी प्रेमाने समजवून सांगून त्याच्या/ तिच्या मनाची तयारी केल्यास पहिल्या मुलाची उत्सुकता वाढेल, आणि नवीन बाळाबद्दल असूया वाटणार नाही.

४. प्रसूती कळांची भीती

अनेक स्त्रियांना पहिली बाळंपणाततील प्रसूती कळांमुळे दुसरे गरोदरपण नको असते. दुसऱ्यांदा तोच त्रास होणार याची त्यांना फार भीती वाटत असते. त्यामुळे त्या कदाचित सी-सेक्शनचा मार्ग स्विकारण्याचा विचार करतात. परंतु सी-सेक्शन हे आवश्यक असल्याशिवाय करणे योग्य ठरत नाही. वेदना नको म्हणून सी-सेक्शन स्वीकारणे म्हणजे स्वतःच्या हाताने नवीन समस्या निर्माण करणे. दुसऱ्या बाळंतपण देखील पहिल्या इतकाच त्रास होईल किंवा होणार नाही हे नक्की सांगता येत नाही. कदाचित पहिल्या पेक्षा हे बाळंतपण सोईस्कर असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सी-सेक्शनचा निर्णय घेऊ नका.

५. मुलांमधील अंतर काही समस्या तर निर्माण करणार नाही ना ?

असे म्हणतात ४ किंवा ५ वर्षापेक्षा जास्त अंतर असलेल्या मुलामध्ये बऱ्याच गोष्टी भिन्न असतात. नाही. आणि १ किंवा २ वर्षाचे अंतर असणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या असतात. आणि यामुळे कमी अंतर असणाऱ्या मुलांचे एकमेकांशी चांगले पटते परंतु याला ठोस शास्त्री पुरावा जुळ्या मुलांच्या बऱ्याच गोष्टी भिन्न असतात आणि त्याचे देखील पटत नाही त्यामुळे याबाबत काळजी करण्याची गरज नसते. तुम्ही मुलांना कसे वाढवता यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon