Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

दुसऱ्या गर्भारपणाआधी टाळा या चुका

             किती त्रास दिला, अडचणीत टाकले तरीही मुलं आपल्या आयुष्यातील खरी मजा असतात. त्यामुळे एक मूल मोठे होत आले की आपण दुसऱ्या मुलाचा विचार सुरु करतो. दुसऱ्या वेळी गर्भवती असणे आणि आपल्या मुलासह पहिले सर्व अनुभवणे हा इतका सुंदर अद्भुत अनुभव आहे की ते पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटतात. अर्थात कुटुंबाचा विस्तार करणे हे फक्त मूल होण्यापेक्षा अधिक व्यापक गोष्ट आहे. दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी आपल्या जोडीदाराची तयारी असली तरी येणाऱ्या दुसऱ्या बाळासाठी घरातही काही तयारी असायला हवी विशेषतः आपल्या आई-बाबा यांचे प्रेम, माया काळजी, लक्ष यांच्या वाटणीसाठी पहिले बाळाची किंवा मुलाची तयारी आहे?

 

१) मोठ्या मुलाच्या प्रगतीचा वेग नाही

गर्भारपणात मोठ्या मुलाला सहभागी होऊ द्या. तो देखील याच मार्गाने या जगात आला होता हे त्याला माहिती होऊ द्या. आपल्या डॉक्टरकडील तपासण्यांच्यावेळी त्याला बरोबर न्या- आपल्या भावंडाच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू द्या. अल्ट्रा साऊड तपासण्यांच्या वेळी बाळ पाहू द्या. त्यामुळे आपल्या भावंडाशी त्याची नाळ जुळते असे वाटू लागते. मुलांबरोबर विविध गोष्टी कराव्यात जसे बाळासाठी बाजारहाट करणे, भावंडाचे नाव निवडणे, तसेच भावंडाने त्यांना काय म्हणावे हे त्यांना ठरवायला सांगावे जेणेकरून काही दिवसांनतर येणाऱ्या भावंडाशी जवळीक वाटेल आणि प्रेम वाटेल.

२) पहिल्या मुलाकडे पुरेसे लक्ष नसणे

आपल्याला आधीचे एक मूल असल्याने दुसरे बाळ सांभाळणे सहजशक्य आहे. अर्थात ह्यात थोडेफार तथ्य आहे कारण पुर्वीच्या अनुभवातून काही प्रसंग, परिस्थिती हाताळता येते. मात्र दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर आपल्याला नवजात बाळाकडे लक्ष द्यावे लागते, त्याची देखभाल करावी लागते, रडू सांभाळावे लागते त्याची शीशू पहावी लागतेच पण मोठे मूल स्वतःला दुर्लक्षित झाल्यासारखे समजू लागते त्यामुळे त्याचवेळी मोठ्या मुलाकडेही लक्ष द्यावे लागते. मोठ्या मुलांना असेही वाटू शकते पुर्वी प्रमाणे आईबाबांसमवेत वेळ घालवता येत नाही आणि आपल्याला ते जास्तवेळा जवळही घेत नाहीत. त्यामुळे पहिल्या छोट्या मुलालाही थोडा वेळ दिला पाहिजे. यासाठी जोडीदाराबरोबर वेळेचे नियोजन करून दोन्ही मुलांकडे लक्ष द्या.

३) मनाची तयारी पूर्ण झाल्यावरच नोकरीला जा

नोकरी करणारी स्त्री प्रसुतीची रजा घेते तेव्हा दोन तीन महिन्यांनी पुन्हा नोकरीवर रूजु होऊ असेच तिला वाटत असते. पहिल्या गर्भारपणात तेवढा काळ पुरेसाही असतो मात्र दुसèया प्रसुतीच्या काळात मात्र हा काळ अगदी डोळ्याची पापणी लवण्याच्या आतच संपून गेला असे वाटते. स्तनपान, खरेदी, स्वच्छता आणि दोन्ही मुलांचा प्रेमाने सांभाळ करणे ही नक्कीच कठीण गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बदलाला जुळवून घेण्यासाठी वेळ जावा लागतो. आपल्या मोठ्या बाळाला त्याच्या छोट्या भावंडाची काळजी कशी घ्यायची याचे थोडेफार प्रशिक्षण द्यायला हवे. प्रेमाने कुरवाळणे असो की लहानग्या भावंडाला बाटलीने दूध पाजणे असो ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे प्रशिक्षण त्याला द्यायला हवे. या सर्वांमुळे पुन्हा कामावर रुजु व्हायचे ठरवल्यावर तुमच्या मनाला शांतता आणि समाधान लाभेल.

४) हुशारीने करा खरेदी

पहिल्यावेळच्या गर्भारपणात कदाचित गरज नसतानाही भरमसाट खरेदी केली गेली असेल घरात बाळासाठी म्हणून अनेक वस्तूंचा भरणा झाला असेल. दुसऱ्यावेळी मात्र अशा अनेक निरुपयोगी वस्तू घेणे टाळायच्या असतील. त्यासाठी अगदी सुरुवातीला कोणत्या गोष्टींची गरज आहे त्या वस्तूंची निवडक यादी बनवा. बाळाचे कपडे खरेदी करण्याची घाई नको पहिल्या बाळाच्या वेळी आणलेल्या कपड्यांचा वापरही केला जाऊ शकतो. डायपर आणि बाळाच्या अंघोळीसाठी आवश्यक गोष्टी यादीत अग्रकमावर असल्या पाहिजेत परंतू पहिल्यांदा घरात आधीपासून या किती वस्तू आहेत का याचा अंदाज घ्या. पहिल्या बाळासाठीचे कपडे घेतानाच असे कपडे घ्या जे मुलगा किंवा मुलगी दोघांनाही वापरता येतील.

५) दोन हात किती पुरेसे?

 

 

 

­

 

 

घरात दोन मुले असली की अनेक कामे पूर्ण करायची राहून जातात जी करणे आवश्यक असते. स्वयंपाकर करणे, स्वच्छता आणि मोठ्या बाळाकडे लक्ष देणे ही सर्वच कामे करायची असतात. आपल्या एकट्याला हे सर्व उरकणार नाही किंवा काम संपणार नाही तर मदतीची अपेक्षा करण्यात काहीच चूक नाही. कुटुंबातील सदस्यांकडून किंवा जोडीदाराकडून आपल्याला मदत मिळू शकते. जर ही मदत पुरेशी वाटत नसेल तर घरातील इतर कामे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मदतीसाठी कामाला ठेवू शकता. अर्थात मुलांना सांभाळ्ण्याची जबाबदारी सर्वतोपरी आपण आणि आपला जोडीदारच निभावू यासाठी खात्रीने प्रयत्न करा. अगदीच जेव्हा शक्य नसेल तेव्हाच मुलांना सांभाळण्याबाबतीत दुसऱ्या कोणा व्यक्तीचा विचार करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon