Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

दुसऱ्या गर्भारपणात कोणत्या अपेक्षा ठेवाव्यात


प्रत्येक व्यक्ती वेगळी तसेच प्रत्येक गर्भारपण वेगळे असते. पहिल्या गर्भारपणात सगळे जण आपल्या अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, वाढत्या गर्भाला आवश्यक असणारे पोषक वातावरण कौशल्याने पुरवले जाते. गर्भवती असताना आपला आहार योग्य असावा आणि स्वतःचे शक्य तितके लाड पुरवावे यासाठी आपल्याला प्रोत्साहन दिले जाते. मात्र दुसऱ्या गर्भारपणातही आपली स्थिती नाजूक बाहुलीसारखी असली तरीही आपल्याला अनुभवी सैनिकासारखे वाटत असते. दुसऱ्यावेळी गर्भवती असताना मात्र पहिल्या वेळेपेक्षा एकदम निराळा अनुभव येऊ शकतो. अगदी वजन वाढणे, पोट दिसणे, थकवा येणे इथपासून ते अगदी प्रसुतीकळांचा कमी कालावधीपर्यंत सर्व गोष्टींमध्ये बदल होतो. पुन्हा एकदा गर्भवती राहणे म्हणजे कसा अनुभव असतो हे कळावे यासाठी दुसऱ्या वेळी गर्भवती असताना कोणत्या गोष्टींची अपेक्षा करू शकता ते पाहूया.

१) पोट लवकर दिसते 

पहिल्या गर्भारपणामुळे शरीरात अनेक बदल झालेले असतात. त्यातील एक म्हणजे स्नायू आणि स्नायूबंध म्हणजेच लिगामेंटस हे शिथिल होतात. पहिल्या गर्भारपणानंतर गर्भाशय पुन्हा मूळ आकारात येत नाही. त्यामुळे दुसऱ्या वेळी गर्भवती राहिल्यानंतर सुरुवातीपासूनच थोडे पोट दिसते आणि पहिल्या गर्भारपणाच्या तुलनेत गर्भवती असल्याचे वाढत्या पोटामुळे लगेच कळते.

२) जास्त दुखणे आणि वेदना

पहिले मूल सांभाळायचे आणि त्याचवेळी गर्भवती असणे अवघड आहे. सतत इकडे तिकडे धावणे, उचलणे, वाकणे, मुलासमवेत खेळणे आणि पहिल्याची काळजी घेणे, रिलॅक्सिन नावाच्या हार्मोन्सची परिणामकारकता आणि सांध्यांना मिळणार आराम यांच्यामुळे शरीरावय लवकर दुखणे आणि वेदना होणे असा अनुभव दुसऱ्या आणि त्यानंतरच्या गर्भारपणात येतोच. पहिल्या गर्भारपणात गर्भाशय ताणले गेल्याने दुसऱ्या वेळी गर्भ ओटीपोटाच्या खालच्या बाजुला राहू शकतो. त्यामुळे पाठदुखी, शिथिल नितंब किंवा राऊंड लिगामेंटमध्ये वेदना होतात.

३) जास्त थकवा

गर्भवती असताना पहिल्या बाळाची काळजी घेणे हे नक्कीच दमवणारे असते. त्यामुळे झोपही कमी वेळ मिळते किंवा आरामात बसणे किंवा झोपणे अशक्य असते. पण दुसèयांदा गर्भवती राहिल्यानंतर शारिरीक थकवा येण्यास एवढे एकच कारण नाही. दुसèयांदा गर्भवती राहिलेल्या स्त्रिया बहुतांश वेळा पूरक औषधे घेण्यास विसरतात त्यामुळे त्यांची शरीरउर्जा पातळी कमी होते आणि त्यांचा थकवा सतत वाढत असतो.

४) गर्भाच्या हालचालींची लवकर जाणीव

गर्भाची वाढ खूप झपाट्याने होते म्हणून असे होते का तर नाही. मात्र आता आईपणाच्या ताज्या अनुभवानंतर बाळाच्या हालचालींची जाणीव आपल्याला होते. पोटातील काही हालचाली किंवा स्पंदने किंवा तरंग जे पहिल्या गर्भारपणात पोटातील वायू म्हणून दुर्लक्ष केले होते त्या बाळाच्या हालचाली म्हणून आता तुम्हाला ओळखता येतात.

५) ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन 

पहिल्या गर्भारपणात ब्रॅक्स्टन हिक्स कॉन्ट्रॅक्शन म्हणजे प्रसुतीपूर्व पोटात येणाऱ्या कळांकडे कदाचित दुर्लक्ष झाले असेल किंवा ती गर्भातील बाळाची हालचाल असेल असाही विचार त्यावेळी केला असेल. पण दुसऱ्या किंवा त्यापुढील गर्भारपणामध्ये आपल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येते. कारण अनुभवामुळे पोटातील कळा किंवा आकुंचनाच्या जाणिवेविषयी आपण अधिक जागरुक असतो.

६) कमी प्रसुती कळा

गर्भाशय आणि योनीमार्ग एकदा या प्रक्रियेतून गेलेले असते आणि आपल्याला त्याचा पूर्वानुभव असल्याने प्रसुतीकळांचा लवकर येतात आणि दुसèयांदा आई होणाèयांसाठी त्या अल्पकालावधीच्या असतात. त्यामुळे आईलाही कमी जोर लावावा लागतो. एका अभ्यासानुसार, पहिल्या प्रसुतीच्या वेळी स्त्रिया सुमारे नऊ तास प्रसुतिकळा सहन करतात आणि एक तास त्यांना बाळ बाहेर येण्यासाठी जोर लावावा लागतो तर दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी आई सरासरी सहा प्रत्यक्ष प्रसुतिकळांमध्ये घालवते आणि अर्धा तास जोर लावते.

७) प्रसुतीनंतर तीव्र वेदना

गर्भाशय जेव्हा पुर्वीच्या आकारात आणि जागेवर येण्यासाठी जेव्हा आकुंचन पावते तेव्हा होणाऱ्या वेदनांना प्रसुतीनंतरच्या तीव्र वेदना म्हणतात. पहिलटकरीण म्हणजे पहिलीच वेळ असणाऱ्या स्त्रियांना या वेदना कमी तीव्रतेच्या आणि कमी कालावधीसाठी जाणवत असतील. कारण त्यांच्या गर्भाशयाचे स्नायू बऱ्यापैकी घट्ट असतात आणि ते आकुंचित राहू शकतात. मात्र दुसèयांदा गर्भवती असताना किंवा दुसèयांदा आई झाल्यानंतर मात्र गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायू घट्ट न राहिल्याने ते अधूनअधून शिथिल पडतात. त्यामुळे गर्भाशयाचे अस्वस्थ आकुंचन होते आणि प्रसुतीनंतरच्या वेदनांचे स्वरुप वाईट होते. बाळाला स्तनपान करताना प्रामुख्याने हे आकुंचन होते कारण दूध पाजताना ऑक्सिटोन हार्मोन्स स्रवतात त्यामुळे आकुंचन होण्यास कारण ठरतात. शरीराला पुन्हा त्याचा आकार मिळण्यासाठी खूप काळ लागतो त्यामुळे नंतरच्या बाळंतपणामध्ये गर्भाशयाचे आकुंचन पावण्याची स्थिती अधिक खराब होते आणि फक्त वजन कमी झाल्याने काहीच फरक पडत नाही. त्यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंचा घट्टपणा परत मिळवण्यासाठी खूप जास्त व्यायाम करावा लागणार.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon