Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आणि दुर्मिळ तिहेरी योग

वर्षाच्या सुरवातीपासून तुम्ही यावर्षीच्या ग्रहणाबद्दल बरंच काही ऐकलं असेल वाचलं असेल पण यावर्षीच ३१ जानेवारी होणारं खग्रास चंद्रग्रहण हे आपल्या आयुष्यात एकदाच येणार आहे कारण हे चंद्रग्रहण हे १५१ वर्षांनी होणारे असे ग्रहण आहे. आणि महत्वाचे म्हणजे हे भारतातून दिसणार आहे.ततुम्हांला १५१ वर्षांनी येणाऱ्या ग्रहणाचेच नाही तर एकाच वेळी तीन अद्भुत घटनांचे साक्षीदार होता येणार आहे.

चंद्रग्रहण म्हणजे काय ?

जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते.या वर्षी १५१ वर्षांनी चंद्राच्या तीन प्रकारच्या चंद्राच्या अवस्था तुम्हांला एकाच वेळी दिसणारा आहेत ३१ जानेवारीला होत असलेले वर्षातले पहिले खग्रास चंद्रगहण विशेष महत्त्वाचे आहे जगभरातील संशोधक ३१ जानेवारीच्या ग्रहणाकडे नजर लावून बसले आहेत. कारण ब्ल्यू मून म्हणजे पृथ्वी सूर्याच्या जवळ व पृथ्वी व चंद्र यातील अंतर अगदी कमी असताना हे चंद्रग्रहण होत आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर सर्वात कमी असते त्या पौर्णिमेला सुपरमून किंवा ब्ल्यू मून म्हटले जाते. हा योग यंदा १५१ वर्षांनंतर आला असून या पूर्वी हा योग ३१ मार्च १८६६ ला आला होता.

सुपरमून,ब्लूमून आणि.म्हणजे काय ?

सुपरमून 

 

ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी त्याला ‘ सुपरमून ‘ म्हणतात. अशावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते.चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५९ हजार किलोमीटर अंतरावर येणार आहे. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसणार आहे.

ब्ल्यूमून 

एका इंग्रजी महिन्यात ज्यावेळी दोन पौर्णिमा येतात त्यावेळी दुसऱ्या पौर्णिमाच्या चंद्रास ‘ ब्ल्यूमून ‘ म्हणतात. या योगाला ब्लूमून म्हणत असले तरी असा योग आला की त्यावेळी चंद्र काही ‘ ब्ल्यू ‘ रंगाचा दिसत नाही. यावेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून ‘ म्हटलेले आहे.

ब्लड मून 

खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने पौर्णिमा असूनही चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगाचे दिसते. म्हणून त्याला ब्लड मून म्हणतात

हे ग्रहण भारतात कधी दिसणार आहे ?

१. बुधवारी ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. म्हणजे चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येण्यास सुरवात होईल.

२. सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस सुरवात होईल. परंतु त्यावेळी चंद्रबिंब आपल्या क्षितीजाच्या खाली असल्याने आपल्याला दिसणारा नाही. 

३. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रोदय होईल आणि साध्या डोळ्यांनी सुपर-ब्ल्यू-ब्लडमूनचे दर्शन होईल. 

 ४. खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी होईल आणि रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी ग्रहण सुटेल, चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर येईल .

मग चला तर या दुर्मिळ तिहेरी योगाचे साक्षीदार व्हायला तयार आहात ना ?

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon