Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

दोन वेळा जन्म घेणारे दुर्मिळ बाळ

 तुमचा कदाचित पुढील गोष्टीवर विश्वास बसणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे. टेक्सासमधील एका बाळाने दोन वेळा जन्म घेतला. या बाळाला 23 व्या आठवड्यात आईच्या गर्भाशयातून बाहेर काढण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्या बाळाला पुन्हा आईच्या गर्भाशयात ठेवण्यात आले. त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर त्या बाळाने पुन्हा जन्म घेतला. विशेष म्हणजे ते बाळ पूर्णपणे तंदुरूस्त आणि आनंदी आहे.

मार्गारेट हॉकिन्स बोईमर यांना एका चाचणीत त्यांच्या गर्भाशयातील बाळाच्या मणक्यावरील मोठी गाठ असल्याचे आढळून आले. त्यावेळी ते बाळ 16 आठवड्यांचं होतं. त्या गाठीमुळे गर्भाच्या रक्तप्रवाहात बदल झाला. त्यामुळे बाळाचे हृदय बंद पडण्याचा धोका वाढला.

त्यावर डॉक्टरांनी त्या बाळाला वाचवण्यासाठी आईच्या गर्भातून बाहेर काढून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पण ही शस्त्रक्रिया खूप धोकादायक होती. तेव्हा गर्भातील बाळ 23 आठवड्यांचे होते. त्याचे वजन 0.53 किलो होते. या ऑपरेशन दरम्यान त्या बाळाचे हृदय पूर्णपणे बंद पडले होते. पण डॉक्टरांनी ती गाठ काढतानाच बाळाचे हृदयही बंद पडू दिले नाही.

जर ही गाठ काढण्यात अपयश आले असते, तर बाळाचा गर्भातच मृत्यू झाला असता. तसेच आईच्या जिवितालाही धोका निर्माण झाला असता. त्यामुळे ती गाठ काढून डॉक्टरांनी तुम्हा ते बाळ आईच्य गर्भात ठेवले. त्यानंतर पुन्हा बारा आठवड्यांनी त्या बाळाचा जन्म झाला. अशाप्रकारे त्या बाळाने दोन वेळा जन्म घेतला. त्यानंतर आठ दिवसांनी आणखी एक शस्त्रक्रिया करून राहिलेली गाठही हटवण्यात आली. लिलनी असं त्या बाळाच नाव असून ती आता पूर्णपणे तंदुरूस्त आहे.  

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon