Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

या दोन वर्षीय बाळाच्या मेंदूत प्लग अडकला!

चीनमधील गुआँगझॅऊ प्रांतातील बाळ एका तीन पिन असलेल्या प्लगवर कोसळले आणि तो प्लग सरळ त्याच्या मेंदूत घुसला. या दुर्घटनेची खबर चायनीज वृत्तवाहिन्यांपर्यंत पोहोचली आणि मग या भयाण प्रसंगाची छायाचित्रे सर्वांपर्यंत पोहोचली.

असे घडले की, लहानगा चेन चेन (बाळाची ओळख लपवण्याकरता वास्तविक नावापासून फारकत घेतलेली आहे) हा रात्री सुमारे अकरा वाजता त्याच्या बेडवर खेळत बसला होता. जेव्हा त्याने एका प्लास्टिकच्या चेंडूवर पाय ठेवला; तेव्हा त्याचा तोल गेला आणि तो बेडवरून खाली कोसळला. दुर्दैवाने जमिनीवर असलेल्या पॉवर प्लगवरच त्याचे डोके आपटले. पालकांनी त्वरित त्याला इस्पितळात भरती केले.

एक्स-रे छायाचित्रे ही थरकाप उडवणारी आहेत! डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या दोन वर्षीय बाळावर त्वरित उपचार करणे आणि आणखी नुकसान होण्याआधी प्लग बाहेर काढणे गरजेचे होते. तीन तासांच्या प्रदीर्घ शस्त्रक्रियेनंतर शेवटी मुलाच्या डोक्यातुन प्लग बाहेर काढायला डॉक्टरांना यश आले.

शस्त्रक्रियेच्या दोन आठवड्यानंतर चेन चेनची इस्पितळातून घरी रवानगी झाली. या घटनेमुळे बाळावर कोणताही सार्वकालिक परिणाम होणार नाही अशी डॉक्टरांना आशा आहे; पण खरोखर ही घटना सर्वांना हादरवून गेली.

बाळांच्या बाबतीत कुणीही पुर्णपणे निश्चिंत राहू शकत नाही; याची ही घटना एक परिपूर्ण उदाहरण आहे. तुमचे घर मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित असणे खूप महत्त्वाचे आहे (मोकळ्या वायर्स ठेवणे टाळा; टेबल, खुर्ची आणि बाकी फर्निचरची अणुकुचीदार टोके असू देऊ नका; विजेची सर्व उपकरणे बाळांपासून लांब ठेवा आणि बाकी बरेच काही). एका प्लगमुळे एवढी मोठी दुर्घटना होईल; याचा कुणी विचारही केला नसेल!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon