Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

डोळ्यांवरील ताण आणि जळ-जळ यावर घरगुती उपाय

१. काकडी

 काकडीचे काप 3-4 मिनिटे डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळ आराम करा. डोळ्याची जळ-जळ कमी होऊन डोळ्यांवरचा ताण कमी होईल 

२. गुलाबपाणी

नैसर्गिकरित्या थंड प्रवृत्तीचे गुलाबपाणी डोळ्यांमधील जळजळ कमी करण्यास मदत करते. . गुलाबपाण्यात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांवर ठेवावा. 4-5 मिनिटांनी काढून चेहरा हलकसा पुसा.

३. मसाज

तुमच्या डोळ्यांभोवती दिवसातून 2-3 वेळेस किमान 20 सेकेंद हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होण्यासोबतच तेथील रक्तपुरवठा सुधारण्यासही मदत होते.

४. हाताच्या तळव्यांचा वापर 

हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा. नंतर हळूच त्याचा स्पर्श डोळ्यांवर करावा. 2-3 मिनिटांनंतर हात बाजूला करा. असे केल्याने प्रखर प्रकाशामुळे डोळ्याला होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.

५. थंड दूध

डोळ्यांवरचा ताण हलका करण्यासाठी त्यावर थंड दूधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवावेत. 4-5 मिनिटांनी तुम्हांला रिलॅक्स वाटेल. तुम्ही कामावर असाल तर थंड दुधाऐवजी पाण्याचा वापर करू शकता.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon