Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

डोळ्यांखाली सूज आलीये..या सोप्या उपायांनी होईल सुटका

 डोळे हा आपल्या शरीराचा अत्यन्त सुंदर आणि तितकाच नाजूक अवयव,हो ना..? तुम्ही किशोरवयीन असाल किंवा तुमच्या विशीत असाल किंवा उतारवायाकडे झुकत असाल,सर्वच वयातील स्त्रियाना भेडसावणारी समस्या म्हणजे डोळ्यांखाली येणारी सूज किंवा फुगीरपणा ज्यामुळे तुमचे वय आहे त्यापेक्षा जास्त दिसू लागते जे कुणालाच आवडत नाही.

तुमचे वय वाढू लागताच डोळ्यांखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांसोबतच हा भाग फुगलेला दिसायला लागतो,ज्याला सामान्यपणे 'अंडर आय बॅग्स ' असे म्हणतात. या समस्येचे कारण म्हणजे डोळयांभोवतीची त्वचेचे स्नायू कमकूवत होऊन सैलावतात ज्यामुळे या ठिकाणी द्रव पदार्थ साचून राहतात आणि हा भाग सूज आल्या सारखा वाटतो.

वातावरणातील बदलामुळे होणारी ऍलर्जी,एक्झिमा,पाणी त्वचेत साचून राहणे आणि चेहऱ्यावर झोपणे या कारणांमुळेही डोळ्यांखालची त्वचा फुगते.

बरेचदा,धूम्रपान,मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन अश्या सवयींमुळे हि समस्या तीव्रतेने जाणवते आणि आनुवंशिकतेचा हि यात असतो.

खाली दिलेल्या ६ उपायांनी तुम्ही या चिवट आणि निर्दयी अश्या डोळ्यांखाली दिसणाऱ्या फ़ुगीरपणा पासून कायमची सुटका मिळवू शकाल.

१. झोपण्याची स्थिती

तुमच्या डोळ्यांखाली फुगीरपणा येईल कि नाही हे तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये झोपता यावर ठरते. यासाठी,शक्यतो,पाठीवर झोपण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून,डोळ्यांच्या आसपासच्या भागात पाणी साचून राहणार नाही. गरज असल्यास अजून एक उशी डोक्याखाली घ्या पण तुम्ही आरामदायक स्थितीत आहात याची खात्री करून घ्या.

२. मीठाचा वापर प्रमाणात करा

मिठाच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाबासोबतच तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला पाणी साचून राहते ज्यामुळे हा भाग फुगलेला दिसतो.लक्षात ठेवा,मीठाचे सेवन प्रमाणात करा,खारट पदार्थ टाळा आणि शक्य असेल तेवढे ताज्या भाज्या खा.

३. व्यायाम

        पोषक आहारासोबतच धावणे किंवा बागेत वेगाने चालणे या गोष्टी नक्की करा. ताजी हवा घ्या आणि स्नायूंना ताण द्या. नियमित व्यायाम करण्याने तुमचे वय

वाढण्याची प्रक्रिया लांबते. चेहऱ्याचे विशेष व्यायाम करण्याने चेहऱ्याच्या स्नायू घट्ट होतात आणि त्यांचा पोत सुधारतो.

४. मेकअप वेळीच उतरवा

सकाळी तयार होणे मेकअप करणे सर्व स्त्रियांना प्रिय असते पण रात्री झोपतांना मेकअप नक्की उतरवा. कारण,डोळ्यांना केलेल्या मेकअप मुळे डोळे चुरचुरणे आणि त्वचेखाली पाणी साचून रहाणे यामुळे डोळे सुजलेले दिसतात.

५. मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर रहा

डोळ्यांखाली येणाऱ्या फुगीरपणा पासून सुटका हवी असल्यास धूम्रपान आणि मद्यपान या सारख्या घातक सवयी सोडून द्या किंवा निदान आटोक्यात ठेवा. मद्यपानामुळे तुमची त्वचा कोरडी आणि रुक्ष होऊन डोळ्यांभोवतीचा भाग काळा आणि खोलगट दिसायला लागतो तर सिगारेट ओढण्याने हि त्वचा कोरडी आणि कमकुवत होऊन डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा वेळेआधीच प्रौढ दिसायला लागते.

६. तुमच्या डोळ्यांची निगा राखा

सर्व काळजी आणि उपायानंतर हि तुम्हाला डोळ्यांखाली फुगीरपणा येण्याची समस्या जाणवत असेल तर डोळ्यांना थंडावा देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या डोळ्यांना स्पा हि मिळेल आणि डोळे सुजल्यासारखे हि दिसणार नाहीत. एक थेंब लॅव्हेंडर तेलासोबत काकडीच्या चकत्या किंवा थंड चमचा डोळ्यांवर ठेवा. याने तुमच्या डोळ्यांना नक्की आराम मिळेल आणि डोळ्यांखाली सूज हि दिसणार नाही.

हे सर्व उपाय करण्यासोबतच तणाव पासून दूर रहा आणि प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा. ताण आणि चिंता यांमुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात, म्हणून तणावमुक्त आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न नक्की करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon