Link copied!
Sign in / Sign up
113
Shares

बाळाच्या जन्मानंतर वाढलेले वजन असे कमी करा


बाळाच्या जन्मानंतर आनंदाच्या क्षणात कुटुंब डुंबत असते. स्त्री नंतर तुम्ही आता आईच्या जीवनात प्रवेश करत असतात. तुम्हाला आयष्यभरासाठीची शिदोरी मिळालेली असते. आणि ह्या सर्व आनंदाच्या क्षणात तुम्हाला एका गोष्टीची अडचण वाटत असते आणि ती म्हणजे तुमच्या गरोदरपणाच्या ह्या वेळी जे अवाजवी वजन वाढलेले असते त्याची. तेव्हा ह्या वाढलेल्या वजनावरती खाली दिलेल्या नैसर्गिक उपायांनी कमी करू शकता. आणि ह्यात तुमच्या आरोग्यावर आणि बाळाच्या विकसित होण्यावर परिणाम नाही.

१) खूप पाणी प्या

दिवसातून ४ ते ५ लिटर पाणी पिण्याचे प्रयत्न करा. ह्यामुळे तुमच्या शरीरातून विषारी घटक निघण्यास मदत होईल. त्याचबरोबर खूप पाणी पिण्याने तुमचे मेटाबॉलिज्म वाढेल आणि ह्या मेटाबॉलिज्म चा वजन घटवण्यात मोठा हात असतो. तुमच्या डायट मध्ये मिल्कशेक, ज्यूस आणि सूप ह्यांचे सेवन करत रहा. जेवणाअगोदर पाणी प्या.

२) डान्स

हो डान्स थोडा करायला हवा. ह्यात लाज बाळगण्याचे कारण नाही. आणि खूप जास्त डान्सही नको. शरीराची हालचाल थोडी शिस्तबद्ध होईल इतका डान्स व्हायला हवा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा डान्स करायला हवाच. आणि तुम्हाला जे संगीत आवडत असेल त्यावर डान्स करू शकता.

३) दही

ज्यावेळी तुम्हाला आईस्क्रीम खावीशी वाटेल त्यावेळी दही किंवा योगहर्ट खा. म्हणजे तितक्या कॅलरीज कमी होतील. योगर्ट सोबत काही फळ किंवा ज्यूस घेऊ शकता.

४) लवकर खाऊन घेत जा

रात्रीचे जेवण लवकर घेत जा. जसे की, संध्याकाळी ७ ते ७.३०च्या वेळी. आणि रात्री जगात असाल तर एक ग्लास दूध प्या. सकाळी लवकर नाश्ता करून घेत चला.

५) चॉकलेट आणि आईस्क्रीम

चॉकलेट तुम्हाला खूप आवडत असेल, तसेच आईस्क्रीम पण ह्यावेळी थोडा संयम ठेवून ही पदार्थ खाऊ नका. आणि कॉफी व चहा आणि अल्कोहोल तर घेऊच नका.

६) झोप

ह्यावेळी बाळ कधीही उठतो, रात्रभर झोपत नाही आणि झोपूही देत नाही. अशाही परिस्थितीत तुमची झोप पूर्ण व्हायला पाहिजे. कमीतकमी ७ तास तरी झोप घ्यायला हवीच. वाटल्यास ह्यावेळी तुमच्या नवऱ्याला किंवा सासूला बाळाची देखभाल करायला सांगा. आणि नवऱ्याला काही आवश्यक गोष्टी सांगून ठेवा.

७) काळजी

ह्या दिवसात खूप नैराश्य येत असते म्हणून त्या काळजीला चिंतेत परावर्तित करू नका. कारण ह्यामुळे तुमच्या व बाळाच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो. तसेच स्तनपानासाठी तुम्ही तुमचा आहार सकस ठेवा. आणि वरती दिलेल्या गोष्टी करा. म्हणजे वजन खूप वाढणार नाही. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon