Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

डिलिव्हरी(बाळंतपण) दवाखान्यातच का करायला हवे ?

         बाळंतपण घरीच करायला हवे का ? किंवा दवाखान्यात करायला हवे का? तर अशी प्रश्ने पडतात. आज तर सर्वच प्रसूती ह्या दवाखान्यातच होत असतात पण आजही खूप ठिकाणी प्रसूती ह्या घरीच केल्या जातात. आणि त्या प्रसूती सुखरूप होत असतात. पण ज्या स्त्रिया बाळंतपण करत असतात त्यांना खूप अनुभव असतो. आणि काहीवेळा त्या डॉक्टरांपेक्षा चांगले बाळंतपण करत असतात. पण ह्या व्यतिरिक्त प्रसूती ही दवाखान्यातच का करावी त्याविषयी जाणून घेऊ.

१) दवाखान्यात बाळंतपण करणे केव्हा गरजेचे असते ?

कोणतेही बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले असते. पण गरोदरपणात ज्यांना विशेष काळजी घ्यायला सांगते अशी जोखमीची किंवा धोक्याची सारी बाळंतपणे मात्र दवाखान्यात केली पाहिजेत. म्हणजे मातेचा किंवा बाळाचा धोका टाळता येतो.

२) बाळंतपणासाठी दवाखान्यात कधी न्यावे ?

जवळपास दवाखाना असल्यास बाळंतपण दवाखान्यातच होणे चांगले. बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या की गरोदर स्त्रीला दवाखान्यात न्यावे. साधारणपणे बाळंतपणाच्या अगोदर १० ते १२ तास या बाळंतपणाच्या कळांना सुरुवात होते.

३) बाळंतपण कोणाकडून करून घ्यावे ?

बाळंतपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असे असले तरी काही वेळा त्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बाळंतपण हे घरातील किंवा शेजारचे कोणीही करू शकेल असे समजू नये. प्रशिक्षित दाई किंवा नर्स बाळंतणाचे वेळी हजर असली पाहिजे. त्यामुळे अडचणीच्या वेळी माता व बाळ यांची तब्येत सुरक्षित राहते. धनुर्वात किंवा इतर संसर्गही होत नाहीत. अवघड बाळंतपण मात्र दवाखान्यात व्हायला पाहिजे.

४) कोणते बाळंतपण दवाखान्यात होणे महत्त्वाचे आहे ?

खरे म्हणजे बाळंतपण हे दवाखान्यातच होणे अधिक चांगले असते. कारण तिथे सर्व प्रकारची व्यवस्था असते. बाळंतपण अवघड असेल तर ते बाळंतपण दवाखान्यातच झाले पाहिजे म्हणजे धोका टळू शकतो. पूर्वी सिझेरियन झालेले असेल/ पूर्वीच्या बाळंतपणात खूप रक्तस्राव झालेला असे, रक्तगट आर.एच. निगेटिव्ह असेल तर अशी बाळंतपणे दवाखान्यातच झाली पाहिजेत. याशिवाय गरोदर स्त्रीचे वय २० वर्षाच्या आत असेल किंवा ३० ते ३२ वर्षाच्या पुढे असेल, स्त्रीचे चौथे किंवा त्या पुढचे बाळंतपण असेल, उंची कमी असेल किंवा रक्तदाब, क्षय, कावीळ इ. गंभीर आजार असल्यासही सर्व बाळंतपणे अवघड जोखमीची समजली जातात. म्हणून ती दवाखान्यातच झाली म्हणजे धोका टळू शकतो. जवळच्या हॉस्पिटलची माहिती ( वेळ, फोन नंबर, डॉक्टरचे नाव, दवाखान्यामधील सोयीसुविधा) याबद्दलची माहिती आपल्याजवळ आधीच लिहिलेली असावी. वाहनाची सोय सुद्धा बघून ठेवावी.

५) बाळंतपणात कोणते संभाव्य धोके उद्भवू शकतात ?

वर पडायला उशीर लागणे, बाळंतपण होऊन अर्धातास झाला तरी वर बाहेर न पडणे, गर्भाशय बाहेर येणे, पोट दुखणे, एकदम रक्तस्राव होणे व तो न थांबणे, श्वास घेण्यास त्रास होणे, लघवी करताना त्रास होणे, ताप येणे, खालची जागा /मायांग फाटणे, अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांना दाखवणे आवश्यक असते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon