Link copied!
Sign in / Sign up
20
Shares

डिलिव्हरीनंतर टाक्यांची अशी काळजी घ्या

            डिलिव्हरी झाल्यावर काही दिवस त्या आईला स्वतःला खूप जपावे लागते. आणि तुम्हाला माहितीये का ? डिलव्हरीच्या वेळी होणारा त्रास हा २० हाडे एकसाथ तुटणे ह्यासारखा असतो. आणि ह्यातच डिलिव्हरीनंतर स्त्री टाक्यांच्या त्रासामधून जाते. आणि काही महिने ह्या टाक्यांमुळे तिला हालचाल करता येत नाही. आणि ह्यावेळी तिला बाथरूम जायला, उठायला - बसायला खूप कष्टदायक असते. तेव्हा काही गोष्टी सांगणार आहोत त्यातून स्त्रीला टाक्यांमधुन आराम मिळेल.

१) वजन उचलू नका आणि खाली झुकू नका

ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, टाके असताना कोणतीच वजनदार वस्तू उचलू नका आणि खाली झुकू नका. कारण ह्यामुळे टाक्यांवर जोर पडून टाके निघू शकता तेव्हा अशी कोणतीही गोष्ट करू नका. की, त्याचा परिणाम टाक्यांवर होईल.

२) स्वच्छता करताना लक्ष ठेवावे

टाक्यांना स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे असते. कारण त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही. आणि टाक्यांना साफ करताना कोमट पाण्याचा आणि ते स्वच्छ असायला हवे. आणि ह्या व्यतिरिक्त दार वेळेला सॅनिटरी पॅड बदलत रहा. आणि लक्षात घ्या पॅड बदलण्या अगोदर हात स्वच्छ करून घ्या. आणि पुन्हा पॅड बदल्यावर हात धुवून घ्या.

३) अंघोळ

अंघोळ करण्यावेळी कोमट पाणी घ्यावे जेणेकरून त्या हलक्या गरम पाण्याने टाक्यांना आराम मिळेल. आणि चुकूनही त्या टाक्यांना रगडु किंवा खाजवू नका. आणि अंघोळ करताना पाण्यात अँटिसेप्टिक लिक्विड टाकून घ्या आणि ते डॉक्टरांना दिले असते. नाहीतर, त्यांच्याकडून घेऊन घ्या. ह्या लिक्विड मुळे जखम लवकर भरून निघते.

४) बसून अंघोळ करा

जास्त वेळ उभे राहिल्यामुळे तुमच्या टाक्यांवर जोर पडू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अंघोळीला वेळ लागत असेल तर बसून अंघोळ करा. आणि बसताना खूप व्यवस्थित बसा की, तुमच्या टाक्यांवर जोर पडणार नाही.

५) साबण वापरू नका

जर तुम्हाला वाटत असेल की, साबणाने टाके स्वच्छ करून घेता येते. तर खूप चुकीचे आहे. कारण साबण मध्ये खूप केमिकलचा वापर केलेला असतो. आणि त्यामुळे आग किंवा काहीही होऊ शकते. त्यामुळे साबण वापरू नका.

६) गरम पाण्याने शेकून घ्या

गरम किंवा कोमट पाण्याने शेकून घेत चला त्यामुळे खूप वेदनेपासून आराम मिळतो.

७) खूप तंग कपडे घालू नका

डिलिव्हरीनंतर खूप तंग कपडे घालू नका, काही स्त्रियांना सवय असल्याने किंवा जॉब असल्याने खूप तंग कपडे घालतात. आणि अंडरवियर सुद्धा खूप तंग घेऊ नका व घालू नका. यांच्या जोराने टाके निघू शकतात. म्हणून ढिले कपडे घाला त्यामुळे तुम्हाला स्तनपान करणेही सोयीचे होईल.

८) डॉक्टरांनी काही क्रीम दिले आहे का ?

जर डॉक्टरांनी तुम्हाला अँटिसेप्टिक क्रीम, औषध दिले असेल तर त्याचा वापर नियमित करा. आणि जर असे काहीच दिले नसेल तर डॉक्टरांना द्यायला सांगा. आणि जर त्या टाक्यांमध्ये काही वेदना आणि त्रास होत असेल तर त्याला दुर्लक्षित न करता डॉक्टरांची भेट घ्या. किंवा विचारून घ्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon