Link copied!
Sign in / Sign up
82
Shares

डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचे पहिल्या महिन्याचे पूर्ण मार्गदर्शन......


बऱ्याच आईंनी प्रश्न विचारला की, डिलिव्हरी झाल्यावर बाळाला कोण - कोणत्या गोष्टींची गरज भासते, पहिल्या महिन्यात त्याच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची ? काय - काय तयारी करून ठेवायची? बाळाला सर्दी किंवा खोकला होणार नाही त्यासाठी कोणती काळजी घ्यावी किंवा त्याला शी अली नाही तर काय करायचे ? असे कितीतरी प्रश्न आईंना पडत असतात. आणि एक आई म्हणून असे प्रश्न पडायला हवेतच. काही आईंनी त्यांच्या वाढीबाबत विचारले. तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे tinystep ह्या ब्लॉगमधून देईल.

१) बाळाचा पहिला महिना हा खूपच घाईगडबडीचा असतो. आईला काहीच समजत आणि सुचत नाही. झोपेतून उठल्या - उठल्या बाळ शी करते. त्याला स्वच्छ करावे तर लगेच बाळाला भूक लागते त्याला स्तनपान करायचे तितक्यातच बाळ झोपूनही गेलेला असतो. आता आईला वाटते थोडा आराम मिळेल. पण लगेच त्याला औषधी द्यायची असते. अशा बऱ्याच गोष्टींबाबत तिला तयारी करावी लागते.

२) ह्या महिन्यात बाळाला काहीही होऊ शकते. कारण त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे विकसित झालेली नसल्यामुळे त्याला लगेच सर्दी किंवा साधे साधे रोग होऊ शकतात. त्यासाठी बाळासाठी उबदार गोधडी वापरावी. त्यात त्याला थंडी किंवा खूप गरम होणार नाही. त्याच्या अंगावर कापड किंवा गोधडी टाकूनच ठेवायची. आणि इतकी काळजी घेतल्यावरही बाळाचे पोट फारच थंड आणि ग्राम वाटत असेल तर त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आईच्या स्तनपानाच्या दुधाची एक्सपायरी डेट असते ? ती कशी !!! https://www.tinystep.in/blog/aaichya-stanpanachya-dudhachee-exapayari-det-aste

३) बाळाला स्तनपान काही आई ह्या बाळ रडतो तेव्हा करत असतात. पण बऱ्याचदा बाळ रडत नाही पण त्याला भूक लागली असते. प्रत्येक बाळाचा दूध पिण्याचा पॅटर्न वेगवेगळा असतो. आणि पहिल्याच महिन्यात आईलाही बाळाचा भुकेचा पॅटर्न समजायला अडचण येते. म्हणून ६ ते ८ वेळा बाळाला दूध पाजा. रडायला लागले त्यावेळी दूध पाजा. बाळ जस जसे दूध पितो तस तसे तुमचे स्तन हे हलके व रिकामे वाटायला लागते. ह्यावरून सुद्धा समजू शकता की, बाळ दूध पीत आहे. ह्यावेळी बाळाला नैसर्गिकच दूध पिण्याची व चोखण्याची सवय असते. पण तरीही ह्यावरून खात्री करू शकता की, बाळ दूध पीत आहे की, नाही ? आणि ह्यावेळी बाळ स्तनपान घेत नसेल किंवा त्याला व्यवस्थित चोखता येत नसेल, तो सारखा रडत असेल आणि त्याचे रडणे हे खूपच तुम्हाला थोडे वेगळेच किंवा विचित्र वाटत असेल तर डॉक्टरांना किंवा अनुभवी बाईला भेटून घ्या.

४) बाळाला दूध पाजल्यावर बाळाचे डायपर किंवा लंगोट बघून घ्यावे. आणि जर बाळाची शी ही पिवळ्या रंगाची असेल आणि अशीच शी असेल तर समजून घ्यावे बाळाला काही समस्या नाही. आणि जस जसे दिवस जातील तस तसे बाळ जर दिवसातून एकदाच शी करत असेल किंवा आठवड्यातून तर काही समस्या नसते. पण डॉक्टरांना विचारून घ्यावे एकदा तरी.

तुमचे बाळ खरोखर निरोगी आहे का?https://www.tinystep.in/blog/tumche-bal-khrac-nirogi-ahe-ka

नवजात बालकाची काळजी घेताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यातhttps://www.tinystep.in/blog/navjat-balachi-kalji

५) बाळाला सहा महिन्यापर्यन्त पाणी पाजू नये. ह्यासंबंधी माहितीचा ब्लॉगच/ लेख tinystep मराठी मध्ये लिहला आहे तो तुम्ही वाचून घ्या. तर बाळाला दूधच द्या. बाळाने दिवसभरात ७ ये ८ डायपर किंवा लंगोट ओले करायला हवेत. ह्याबाबत बाळाने लंगोट ओले नाही केले की, चिंता आणि काळजी. आणि वाटते की, माझ्या बाळाने लंगोट ओले करायला हवे. आणि ज्यावेळी बाळ लंगोट ओले करायला लागतो तेव्हा बिचारी दमून जाते. आणि ह्यावर बाळही हसत असेल. महत्वाचे म्हणजे बाळाची लघवी ही पांढरट असली पाहिजे. त्या लघवीला वास यायला नको. आणि डायपर वरती नारंगी रंगाचे डाग दिसल्यास चिंता करू नका. बऱ्याचदा हे उष्ण वातावरणामुळे होऊ शकते. बाळाला स्तनपान देत राहा. आणि जर स्तनपानाचे दूध नसेल तर फॉर्मुला मिल्क विषयी वाचून घ्या. बाळाला एखाद्या दिवसापेक्षा अधिक काळ आणि दूध प्यायल्यानंतर उलटी होत असेल किंवा पोट सुजले असेल तर बालरोग तज्द्य ला दाखवा.

६) काही वेळेला ही लक्षणे जर बाळामध्ये दिसल्यावर

बाळ झोळीत असताना त्याला जर गुंगी आल्यासारखे वाटत असेल आणि त्याची हालचाल खूपच मंदावली असेल. आणि बाळाची त्वचा आणि नखे तुम्हाला जर निळसर वाटत असतील. बाळाला श्वास घ्यायला अडचण येत असेल त्याच्या छातीत जळजळ किंवा खूप वेगाने श्वास घेत असेल तर त्याला त्वरित डॉक्टरांना दाखवा. आणि अशी लक्षणे येत आहेत का बारीक लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला त्याची काळजी व्यवस्थित घेता येईल.

० ते ६ महिन्याच्या बाळाच्या आहाराविषयी काही गोष्टी पुढील प्रमाणे लिंक वर वाचू शकता - https://www.tinystep.in/blog/balachya-aaharavishyi-kahi-goshti-beby-tips-in-marathi

७) स्तनपान दिल्यानंतर तुम्हाला थोडं अशक्त झाल्यासारखे वाटत असेल किंवा खूपच भूक लागत असेल तर तुम्ही तुमचे जेवण हे सकस करायला हवे. आणि जेवण वाढवायला सुद्धा पाहिजे. त्यासाठी जेवणामध्ये खुप कॅलरी मिळतील आणि आरोग्यही निरोगी राहील असा आहार घ्या. आणखी महत्वाचे म्हणजे स्वच्छ व साफ पाणी प्यायला हवे. कारण ह्या दिवसात बाळ हे पूर्णपणे तुमच्या आरोग्यावर अवलंबून असते म्हणजे तुम्हाला काहीही झाले तर ते बाळाला होईल म्हणून पाणी स्वच्छच प्यावे. जेवण करण्याबाबत कंजुषी करू नये. बाळंतीण बाईने आहार मजबूतच(उत्तम) घ्यावा.

८) पहिल्या आठवड्यात बाळाला काही झाले तर तुम्ही डॉक्टरांकडे जाणारच पण जर काही नाही झाले तरी एकदा डॉक्टरांची भेट घ्या तुमची व बाळाचे तब्येत एकदा दाखवून द्या. आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सांगून द्या. आणि ह्यावेळी बाळाच्या व तुमच्या गोळ्या - औषधी सोबत घेऊन घ्या. त्या तुम्हाला डॉक्टरांना दाखवता येतील.

९) रात्री - अपरात्री बाळ अचानकपणे का रडते ?

बाळ रडणे ही खुप सामान्य गोष्ट आहे. लहान बाळ असल्याने त्यांना रडणाच्या हक्कही असतो पण काहीवेळा रात्री तो साऱ्या कुटुंबालाच झोपेतून उठवतो आणि त्याचे रडणे बघायला लावतो. पण त्याला काही त्रास होत असेल ते तो सांगतो ह्या द्वारे.

तान्ह्या ते ६ वर्षाच्या बाळांना होणारा … गोवरविषयी माहिती येथे बघू शकता - https://www.tinystep.in/blog/govar-hya-aajaravishyi-kahi-mahitee

 लच. आणि जर तो दूधच प्यायला नकार देत असेल तर त्याला थोडे मोकळ्या हवेत फिरवायचे पण थंड हवा नको. त्याचे लंगोट/डायपर ओले आहे का बघून घ्यावे. काही बाळांना ओली डायपर बिलकुल आवडत नाहीत. खूपच स्वछता प्रेमी असतात. ह्या सर्व गोष्टी करूनही बाळ रडत असेल तर तो आवाजाने घाबरला असेल म्हणून आईने त्याला कुशीत घ्यावे आणि मायेने थापटावे. आणि मोकळ्या हवेत उभ्या -उभ्या हे करावे. ह्यामुळे तो शांत झोपून जाईल. आणि ह्या उपायाने सुद्धा तो शांत होत नसेल तर झोळीत टाकून त्याला झोळी हलवावी. त्याचे पोट तपासावे. आणि ह्याबाबत डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. बाळाच्या नाळेच्या भोवतीचा भाग लालसर झालेला आहे का ? तिथून दुर्गंधी येतेय का ? हाही विचार करून घ्यावा.

१०) बाळाला स्तनपानाचे महत्व काय आहे ?

बाळाला पुरेसे दूध मिळत असेल आणि त्याचे पोट चांगले भरत असेल, तेव्हा त्याची त्वचाही घट्ट, तुकतुकीत, तजेलदार रंगाची असते जी हळूच गालगुच्चा घेतल्यावर पुन्हा घट्ट, तुकतुकीत होते. आणि खूपच मऊ व नेहमी त्या बाळाला धरावे असे वाटते.

हे असे बाळाचे फोटो घरी काढण्याचा प्रयन्त करू नका.... येथे बघा - https://www.tinystep.in/blog/ase-photo-ghri-kadhnyacha-baby-tips-in-marathi

तुमच्या बाळाला पुरेसे दूध मिळत नसल्यास तुम्हाला काळजी वाटत असेल, तर घरातल्या, गावातल्या, शेजारी कुणी अनुभवी स्त्री असेल तिला विचराउन घ्यावे. तुमचे बाळ निरोगी आहे का हे ती सांगेल. आणि ह्यातून तुम्हाला पुन्हा -पुन्हा डॉक्टरांची भेट घेण्याची गरज राहणार नाही आणि पैसेही वाचणार.

हिरव्या पालेभाज्या, आंबा, संत्री, केळी यासारखी भरपूर ताजी फळे व भाज्या खा. ही पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे मिळतील. भात, बटाटा, पोळी, दलिया व धान्ये यासारखे ऊर्जा देणारे अन्न खा. प्रथिने खा, जी अंडी, पनीर, डाळ, मासे, चिकन व मटण यामध्ये सापडतात. दूध, नारळाचे दूध, दही व कठीण कवचाची फळे व दाणे दररोज खाण्याचा प्रयत्न करा. विविध प्रकारचे खा, म्हणजे तुमच्या शरीराला तुमच्या बाळाचे व्यवस्थित पोषण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही मिळेल.

नियमितपणे ३ ते ४ वेळा जेवण्याचा प्रयत्न करा. आणि मध्ये मध्ये काहीतरी खात राहा. दिवसभर भरपूर अल्पोपहार घेत रहा, म्हणजे तुमची ऊर्जा टिकून राहील. सुका मेवा, कठीण कवचाची फळे, ताजी फळे व भाज्या व व दाणे. तुम्ही स्तनपान देत असताना तुमच्या लोह व कॅल्शियमच्या गोळ्या घेत राहा. जर डॉक्टरांनी सांगितले असेल तर. 

बाळाचा आहारविषयक माहिती येथे वाचू शकता  https://www.tinystep.in/blog/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-baby-diet-mahinynusar

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon