Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

विविध प्रकारच्या डाएटचे दुष्परिणाम

 

वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे डाएट असा बऱ्याच जणांचा समज आहे. विविध प्रकारची डाएट येतात आणि ती क़रणारे लोकही काही कमी नाही. आताही पॅलिओलिथिक डाएट, मेडिटेरियन डाएट, किटो डाएट (The Paleolithic Diet,The Mediterranean Diet,kitto diet ही तीन प्रकारची डाएट लोकप्रिय आहेत. तंदुरुस्त होण्यासाठी वजन उंचीच्या प्रमाणात असावे लागते. अत्याधुनिक जीवनशैलीत वाढलेले वजन कमी करण्यासाठी डाएटची मदत घेतली जाते.

काही व्यक्ती पॅलोलिथिक डाएट तर बायोहॅकर्स आणि शास्त्रीय आहार संशोधनाला मानत असतील ते किटो डाएट करत असतील. आणि जे प्रसार माध्यमे पाहात असतील त्यांनी मेडिटेरियन डाएट विषयी ऐकले असेलच.

वजन कमी करण्यासाठी विविध डाएट केली जातात मात्र गेल्या वर्षांपासून हे लो कार्ब डाएट प्रकार वादग्रस्त ठरला आहे डाएट केल्यानंतर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. मुळात आरोग्यदायी आहार घेतल्यास आपली शारिरीक, मानसिक क्षमता चांगली राहते. मात्र वजन कमी करताना विविध प्रकारची डाएट करताना शरीरावर त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत का याकडे आपले लक्ष नसते. त्यामुळे हे डाएट करताना त्याचे योग्य प्रकारे पालन न केल्यामुळे किंवा आपल्या प्रकृतीला कोणत्या प्रकारचे डाएट योग्य आहे हे जाणून न घेतल्यामुळे किंवा डाएट चा अतिरेक केल्यामुळे शरीरावर काही दुष्परिणाम होतात ते कोणते ते आपण पाहणार आहोत. 

सध्या हे तीन डाएट प्रकार लोकप्रिय आहेत.

किटो डाएट 

हे सध्या चलतीतले डाएट आहे. हे डाएट केल्याने चरबी जळते, स्मरणशक्ती वाढते असे उपलब्ध माहितीआधारे सांगता येते. मात्र एखाद्या गोष्टीचे जसे फायदे असू शकतात तसे त्याचे तोटेही होऊ शकतात हे सांगितलेले दिसत नाही. किटो डाएटमुळे हायपोग्लायसेमिया(रक्तशर्करेचे प्रमाण कमी होणे), बद्धकोष्ठता, डायरिया, वारंवार मूत्रप्रवृत्ती, गुंगी येणे, चक्कर येणे, स्नायू आखडणे, गोड खावेसे वाटणे, हिवतापासारखी लक्षणे, झोपेच्या समस्या, हृदय धडधडणे, ताकद कमी होणे आदी दुष्परिणाम दिसून येतात.

सुरुवातीच्या काळात जेव्हा किटो डाएटला सुरुवात करतो तेव्हा शरीराला वर्षानुवर्ष साखरेची सवय झालेली असल्याने रक्तशर्करेची कमतरता जाणवल्याने चक्कर येणे, खूप भूक लागणे, नैराश्य येऊ शकते. सुरुवातीच्या काळात शरीराला बदलाची सवय नसल्याने हिवतापासारखी लक्षणे दिसू शकतात. थकवा येणे, सर्दी होणे, डोकेदुखी होऊ शकते. किटो डाएटच्या सुरुवातील काही लोकांना अतिभूक लागते. त्यातही साखरयुक्त म्हणजे गोड पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा होते इतकी की कदाचित डाएटचा विचार मनातून काढून टाकला जाईल.

कारण सर्वसाधारणपणे शरीराची कार्ये मेंदू नियंत्रित करतो त्यामुळे मेंदूला अधिक उर्जेची आवश्यकता असते. जेव्हा रक्तात साखरेची कमतरता भासते तेव्हा मेंदू साखर सेवन करण्याची आज्ञा देतो. त्यावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवावे लागते. चक्कर येणे किंवा गुंगी येणे हे देखील सुरुवातीच्या काळात शरीराने डाएट न स्वीकारल्याचा परिणाम असतो.

शरीराला उर्जेची कमतरता भासते. परिणामी ताकद कमी होते आणि त्याचा प्रभाव शारिरीक कृतीशीलतेवरही पडतो. तसेच शरीरातील तीन महत्त्वाच्या ग्रंथीच्या कार्यावरही परिणाम होतो. हायपोथलामस, पिटीट्युरी आणि अ‍ॅड्रेनल या ग्रंथी ताणाचे नियोजन करतात. पण रक्तशर्करा कमी झाल्याने मेंदूकडून भूक लागल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे अ‍ॅड्रेनल ग्रंथी कॉर्टिसोल स्रवतात आणि त्यामुळे शरीरातील साठवलेले ग्लुकोज प्रवाहित होऊन शरीराला त्वरीत उर्जा मिळते. पण त्यामुळे शरीरातील राखीव शर्करेचे ज्वलन झाल्याने पुन्हा रक्तशर्करा कमी होऊन ते चक्र सुरुच राहते. या ग्रंथीच्या असंतुलनामुळे अनिद्रा म्हणजेच झोपेच्या समस्या भेडसावतात.

तसेच डाएटच्या सुरुवातीच्या काळात एक गोष्ट जाणवते ती म्हणजे हृदयाची धडधड वाढते. तसेच शरीरातील खनिजांची कमतरता झाल्याने सतत मूत्रप्रवृत्तीचे प्रमाण वाढते, बद्धकोष्ठता, डायरिया होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याचे आणि खनिजांचे प्रमाण कमी झाल्याने स्नायूंमध्ये पेटके येण्याचे प्रमाण वाढते.

पॅलिओलिथिक डाएट-

पारंपरिक पथ्याहार किंवा डाएटच्या तुलनेत पॅलिओलिथिक डाएटचे काही नकारात्मक परिणाम होतात. काही लोकांना सुरुवातील डायरिया तसेच अतिथकवा आणि झोेपेच्या समस्या भेडसावातात. पॅलिओलिथिक डाएट मध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि धान्ये वगळली जातात कदाचित त्यामुळे काही दुष्परिणाम होत असावेत असे अभ्यासकांना वाटते. कारण धान्य हे तंतुमय पदार्थांनी युक्त असतात. पण धान्य वगळल्यास तंतुमय पदार्थांअभावी आतड्यातील मायक्रोबीस वर परिणाम होऊन पचनाच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे डायरिया होऊ शकतो.

तसेच दुग्धजन्य पदार्थात अमिनो अ‍ॅसिडअसते त्यामुळे झोपेशी निगडीत सेरेटोनिन आणि मेलाटोनिन हे दोन घटक असतात. त्यामुळे शांत नियमित झोप लागण्यास मदत होते. मात्र आहारातून दुग्धजन्य पदार्थ वगळल्याने त्याचे झोपेवर विपरित परिणाम होतात. आहारातून स्टार्च, धान्य आणि दाणेवर्गीय घटक वर्ज काही व्यक्तींना सुस्ती, थकवा जाणवतो तसेच चिडचिड, अस्वस्थता जाणवते. पॅलिओलिथिक डाएट मध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी असल्याने काही व्यक्ती ज्या अधिक काळ अशा प्रकारचे डाएट करतात त्यांना हायपोथायरॉईडझम ची लक्षणे जाणवू शकतात. जसे थकवा, जडपणा, सर्दी होणे. लो - कार्ब डाएटमुळे भूक की होते पण त्यामुळे शरीराचे कुपोषण होते.

काही वेळा खूप गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते तसेच डाएटमध्ये परवानगी नसलेले फ्रेंच फ्राईज, वेफर्स असे पदार्थ खाण्याची इच्छा सुरुवातीच्या काळात अधिक जाणवते. पॅलिओलिथिक डाएट मध्ये प्राणीज प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. मांस, शेलफिस, चिकन, अंडी आणि मासे यांचे सेवन या आहारात केले जाते.

पण मासे वगळता सर्वच मांसाहारात चरबीचे प्रमाण अधिक असते. सॅच्युरेटेड फॅटसचे आणणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. प्राणिज प्रथिनांचे अतिसेवन केल्याने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल ची पातळी वाढून चांगले एचडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते त्यामुळे हृदयविकार जडण्याचा संभव असतो. तसेच प्राणीज प्रथिनांचे प्रमाण वाढल्याने त्याचा ताण मूत्रqपडावर येतो. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी अधिक ताण येतो.

मेडिटेरियन डाएट

 हे विशेष करून भुमध्य सागरी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी तयार केले आहे. या डाएटचे काही दुष्परिणाम नुकतेच समोर आले आहेत. हे डाएट सर्वसाधारणपणे ग्रीस, इटली या देशांमध्ये लोकप्रिय आहे. या आहारात चरबीयुक्त पदार्थ आणि नैसर्गिक तेलाचा समावेश असतो.मुख्य म्हणजे या डाएटमध्ये ताजी फळे, मासे आणि भाज्या यांचाच वापर करावा लागतो. ते असल्यास डाएट यशस्वी होते. यातील बहुतेक पदार्थांमध्ये ऑलिव्ह तेलाचा वापर केलेला दिसतो.

इतर डाएटच्या तुलनेत याचे दुष्परिणाम कमी प्रमाणात होतात. मात्र प्रत्येक व्यक्तीला डाएट फायदेशीर ठरेल असे नाही. काही वेळा या डाएट मुळे हायपर सेन्सिटिव्ह सिस्टिम ची समस्या निर्माण होऊ शकते. यामध्ये आहार प्रणालीत बदल करून पोषक आहार घेतला जातो. त्यामुळे हे डाएट करत असताना व्यायाम करणे विसरून चालणार नाही. त्या

व्यतिरिक्त हे डाएट खिशाला चाट देणारे आहे. यामध्ये वापरल्या जाणाèया घटकांची किंमत खूप जास्त आहे. तसेच जगाच्या विविध ठिकाणी राहणाèया मेडिटेरियन डाएट करणाऱ्या व्यक्तींना भुमध्य सागर परिसरातील पारंपरिक पदार्थ उपलब्ध करणे शक्य नसते. तीच बाब फळांची आहे. काही विशिष्ट फळे ही विशिष्ट ऋतुतच येतात. या डाएटमध्ये चीज आणि दही या व्यतिरिक्त दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला जात नसल्याने शरीराची कॅल्शिअमची गरज या दोन पदार्थांच्या सेवनानेच भागवावी लागते. या डाएटमध्ये रेड वाईन चा समावेश असतो मात्र ते ही विशिष्ट प्रमाणातच. एका अभ्यासानुसार या डाएटमुळे हृदय रोग होण्याचा धोका जास्त असतो.

     थोडक्यात वजन नियंत्रणात ठेवून तंदुरुस्ती मिळवण्यासाठी डाएट करताना त्याचे शरीरावर अल्पकालीन किंवा दीर्घकालीन दुष्परिणाम होतात हे लक्षात ठेवावे. असे दुष्परिणाम होऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या मदतीने योग्य डाएट निवडावे तसेच दुष्परिणाम टाळण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपायही जाणून घ्यावेत.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon