Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

धूम्रपान (स्मोकिंग) तुमच्या वैवाहिक संबंधावर आणि समागमावर कसे परिणाम करते

स्मोकिंग ही आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. बरेज जण वेगवगळ्या प्रेशरमुळे लहान वयातच स्मोकिंगला सुरूवात करतात. बरेज जण महाविद्यालयीन जीवनात तर काही जण शाळेतच स्मोकिंगला सुरूवात करतात. जर स्मोकिंग करणाऱ्यांना त्यामागचे कराण विचारल्यास तुम्हाला कधीच योग्य कारण मिळणार नाही. 

जर तुम्हाला स्वत:ला स्मोकिंगची सवय असेल, तर तुम्हालाही ही सवय योग्य नाही याची जाणीव होईल. सुरूवातीला तुमच्या काही मित्रांसह काही वेळा स्मोकिंग केली असल, पण आता सिगारेटमधील निकोटीन आणि तंबाखूचे तुम्हाला व्यसन जडले आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा धुम्रपान करता. तुम्हाला हे व्यसन सोडणं आता अवघड बनत चाललं आहे.

सिगारेट ही आरोग्यास हानीकारक असते, हे सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतानाही लोक धुम्रपान का करतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. जी गोष्ट हळूहळू आपल्या फुफ्फूसांना हानी करते. तसेच इतर अवयवांवरही परिणाम करते, असे व्यसन करण्यात काहीही अर्थ नाही. पण तरीही लोक करत असतात.

स्मोकिंगचा तुमच्या फुफ्फूसांवर परिणाम होतो. तसेच तुमचे आयुष्यमानही कमी होते. त्याचप्रमाणे स्मोकिंगचा तुमच्या सेक्स लाईफवरही परिणाम होतो. ही गोष्ट महिला आणि पुरूष दोघांसाठीही लागू होते. स्मोकिंगमुळे तुमच्या धमन्या अरूंद होतात. त्यामुळे तुमच्या गुप्तांगांना होणारा रक्तपुरवठा कमी पडतो.

त्यामुळे स्मोकिंग करणाऱ्यांनात सेक्सची इच्छा खूप कमी होते. तसेच त्यांना उत्तेजित होण्याकरिता अधिक वेळ लागतो. तसेच त्यामुळे सेक्सदरम्यान मिळणारे समाधानही कमी होते. एकंदरीतच स्मोकिंगमुळे तुमची प्रणयक्षमता कमी होते, तसेच जोडीदाराला तुम्ही समाधानीही करू शकत नाही. पण जर तुम्ही वेळीच स्मोकिंगची सवय सोडली, तर पुन्हा तुमची सेक्स लाईफ आनंददायी बनू शकते.

स्मोकिंगमुळे तुमच्या सेक्स लाईफवर कसा परिणाम होतो हे पाहायचे असेल, तर महिला आणि पुरूषांमध्ये थोडे वेगवेगळे बदल होतात. स्मोकिंग आणि योनीमार्गात बॅक्टेरिया निर्माण होण्याचा संबंध असल्याचे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे. ज्या महिला स्मोकिंग करतात त्यांच्या योनीमार्गात जीवाणू संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो.

तर पुरूषांमध्ये स्मोकिंगमुळे लिंगातील ताठरता कमी होते. त्यामुळे जरी तुमची सेक्सची इच्छा असली, तरीही तुम्ही सेक्स करू शकत नाही. तसेच स्मोकिंगमुळे पुरूषांचा स्टॅमिनाही कमी होतो. त्यामुळे ते जास्तवेळ सेक्सचा आनंद घेवू शकत नाहीत.

सोमकिंगमुळे तुमच्यातील शुक्राणुंची संख्याही कमी होते. त्यामुळे जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल, तर ती शक्यता कमी होते. तसेच महिलांनाही गर्भधारणा होण्यास स्मोकिंगमुळे समस्या निर्माण होते.

स्मोकिंगचे व्यसन कसे सोडावे ?

तुमच्यात सुधारणा करण्यासाठी आयुष्यात कधीही उशीर झालेला नसतो. जर तुम्ही मद्यपान, धुम्रपान सोडण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या सभोवती तुम्हाला प्रोत्साहन देणारे लोक असतील, याची काळजी घ्या. जर तुम्ही स्मोकिंग सोडण्याचा विचार करत असाल, आणि तुमच्या सभोवती तुम्हाला त्यासाठी आग्रह करणारे लोक असतील, तर थोडं अवघड होऊ शकतं.

त्यामुळे तुमच्यासोबत स्मोकिंग करणाऱ्यांना तुम्ही स्मोकिंग सोडण्याचा प्रयत्न करत आहात, हे कळू द्या. तसेच तुम्ही त्यांना स्मोकिंग सोडण्यासाठी सांगू नका. त्यांना जेव्हा वाटेल, तेव्हा ते स्मोकिंगची सवय सोडतील . जर तुमचे सहकारही स्मोकिंगची सवय सोडणार असतील, तर तु्हालाही मदत होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या निर्णयावरू ठाम राहणे सोपे जाऊ शकते.

तसेच एकाच वेळी जीवनात खूप सारे बदल करण्याचा प्रयत्न करू नका. जर धुम्रपान किंवा मद्यापान सोडण्याचे तुमचे ध्येय असेल, तर महिनाभर त्यावरच लक्ष केंद्रीत करा. त्यानंतर तुम्ही इतर सवयींवर लक्ष देऊ शकता.       

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon