Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

धण्याचे आरोग्यदायी फायदे


 धणे हा एक मसाल्यातील एक पदार्थ असला तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ते कोणते ते आपण पाहणार आहोत

१. अपचनामुळे जर जुलाब होत असतील धण्याचा काढा करून प्यायल्यास जुलाब थांबतात.

२.  एक चमचा धणेपूड व एक चमचा खडीसाखर बारीक करून किंवा पिठी साखर यांचे मिश्रण दिवसातून २ ते ३ वेळा घेतल्यास आम्लपित्ता कमी होण्यास मदत होते. 

३.  उष्णतेमुळे हातापायांची जळजळ होत असेल तर एक चमचा धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी गाळून प्यावे.

४. धणे  बडीशेपमध्ये मिसळून जेवणानंतर खाल्याने मुखदरुगधी दूर होते व पोटातील गॅस कमी होतो.

५. लघवीला आग होत असेल तर अशा वेळी ४ चमचे धणे रात्री ८ ग्लास पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळावे. थंड झाल्यानंतर हे पाणी दिवसभर पीत राहावे. लघवीची जळजळ कमी  होतो 

६. गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलटीचा त्रास होतो. अशा वेळी धणे पूड एक चमचा व १० ग्रॅम खडीसाखर हे पाण्यामध्ये मिसळून ते पाणी थोडय़ा थोडय़ा अंतराने घोट घोट पीत राहावे.


Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon