Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

दातांच्या उपचारबाबत असणारे काही गैरसमज

आपल्याकडे दाताचे दुखणे हे दुय्यम प्रकारचे दुखणे मानण्यात येते. तसेच दाताच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येते. अश्याने दाताच्या समस्या वाढतात. त्यामुळे दात दुखायला लागला कि अनेकजण अनेक गोष्टी सांगत असतात. यामध्ये दाताच्या उपचारबाबत अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज कोणते आणि त्यामागील सत्य काय हे आपण पाहणार आहोत.

    १. दातांची स्वच्छता केल्याने दात सैल आणि पातळ होतात.

दातांची स्वच्छता करताना दातांच्या आणि हिरड्याजवळ जमा झालेला जंतूंचा थर दूर करतात. दात व हिरडय़ांवर जमलेला थर दूर झाला की दातांमधली फट नीट दिसू लागते आणि दात सैल झाल्यासारखे जाणवते. तसेच किटाणूंचा थर कमी झाल्याने दात पातळ झाल्यासारखे वाटतात.

२. दात फिलींग केल्यावर पुन्हा किडत नाही.

दातांची कीड काढून फिलिंग केले असले तरी त्या दाताच्या किंवा दाढेच्या नसा या जिवंत आणि कार्यरत असतात. त्यामुळे दातचे फिलिंग केल्यानंतर दातांची योग्य तीकाळजी घेतली गेली नाही तर तो दात किंवा दाढ पुन्हा किडू शकतो.

३. गरोदर स्त्रीने दातांचे उपचार टाळावेत.

स्त्रीने गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत दात स्वच्छ करून घेणे, फिलिंग करणे असे बेसिक उपचार करून घेण्यास हरकत नसते. एक्स- रे काढणे, दात काढून घेणे असे उपचार आणि गोळ्या- औषधे घेणे शक्यतो टाळावे. गरज असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवावे. गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या तिमाहीत मात्र दातांवरील उपचार आणि औषधे टाळावीत. तरीही उपचारांबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा. 

 

४. ब्रशपेक्षा बोटाने आणि दंतमंजनने दात स्वच्छ होतात.

दातांमध्ये अनेक ठिकाणी अन्न अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे बोटाने आणि दंतमंजन ने दात घासल्यावर हे अन्नाचे कण निघत नाही आणि दात अस्वच्छ राहतात. त्यामुळे मऊसर ब्रशने दात घासावे आणि दंतमंजन ने हिरड्यांना मसाज करावी.

५. लहान मुलांच्या दुधाच्या दाताबद्दल गैरसमज

धाचे निरोगी दात हा पक्क्य़ा दातांचा पाया असतो. त्यामुळे या दातांची काळजी घेणं देखील आवश्यक असते. अगदी दुधाच्या पहिल्या दाताची देखील काळजी घ्यावी. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon