Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

दात दुखण्यावर ह्या गोष्टी खाल्ल्याने वेदना कमी होतील

दातांसंबंधीची समस्या साधारणतः बहुतेक स्त्रियांना होत असते अक्‍कलदाढ सर्वात शेवटी येत असल्याने ती पूर्णपणे येण्यासाठी जागाच मिळत नाही. तोंडातले हे शेवटी असलेले मजबूत दात असतात. पण अक्‍कलदाढ येताना का त्रास होतो किंवा वेदना का होतात ?  अक्‍कलदाढ ही सर्वात शेवटी येणारी दाढ असल्यामुळेच या दाढेला तोंडात पूर्ण जागा मिळत नाही. त्यामुळे हे दात येताना इतरही दातांना ढकलतात. त्यामुळे हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळे दातांमध्ये वेदना, हिरड्या सुजणे आणि अस्वस्थता आदी त्रास होतात. तेव्हा ह्या वेदनांना कमी करण्यासाठी खालील गोष्टी तुम्ही करू शकतात. 


 लवंग

दातांच्या दुखण्यावर खूप जालीम  इलाज म्हणून  लवंगेचा वापर केला जातो. अक्‍कलदाढ येत असतानाही लवंगेचा वापर करता येतो. त्यात अ‍ॅनेस्थेटिक आणि अनाल्जेसिक गुण असल्याने वेदना शमण्यास मदत होते. त्याशिवाय त्यातील अँटी सेप्टिक आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांमुळे संसर्ग होत नाही. त्यामुळे अक्कल दाढ येत असताना तोंडात लवंग ठेवू शकता किंवा लवंगेच्या तेलाचा वापर करू शकता.

मीठ 

दातदुखीवर मीठही उपयुक्‍त ठरते. आणि मिठामुळे हिरड्या व दात मजबूत होत असतात.  हिरड्यांची जळजळ कमी करण्यास मदत करते. त्याशिवाय मिठाचा वापर केल्याने संसर्गाचा धोकाही कमी होतो.

लसूण

लसणामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लमेटरी गुण आहेत तसेच इतरही औषधी गुण आहेत. आणि लसूणामुळे दातांचे आरोग्य सुधारते. 

कांदा 

कांद्यामध्ये अँटीसेप्टिक, जीवाणूप्रतिबंधात्मक आणि इतरही काही गुण असतात. त्यामुळे दाताच्या वेदनेत आराम मिळू शकतो. तसेच हिरड्यांच्या संसर्गापासूनही सुरक्षा मिळते.

पेरूची पाने 

दातदुखीमध्ये पेरूची पाने औषधांसारखे काम करतात. त्यात दाह कमी करणारी आणि अँटीमायक्रोबियल गुण असतात त्यामुळे दातदुखी कमी होते. 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon