नवरात्राचे उपासाचे नऊ दिवस संपून दसऱ्याचा दिवस उजाडला.महाराष्ट्रात श्रीखंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणावाराला, आनंदाच्या क्षणी जेवणाच्या ताटात श्रीखंड वाढण्याची पद्धत आहे.विशेषतः दसऱ्याला श्रीखंड पुरीचा बेत करण्यात येतो. श्रीखंडाची उत्पत्ती महाभारतापासून झाली असं म्हणतात. आज-काल वेळेच्या अभावापायी सगळेच जण श्रीखंड विकतच आणतात. पण ज्यांना घरी श्रीखंड बनवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ही रेसिपी हे श्रीखंड तुम्ही चक्का विकत आणून देखील करू शकता किंवा घरी चक्का तयार करून देखील करू शकता
९ दिवस उपास केलेल्यांनी या दिवशी सुरवातीला थोडे खावे आणि मग हळू हळू खाण्यास सुरवात कारवी
