Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

दालचिनीचे आरोग्यविषयक उपयोग

दालचिनी मसाल्यात वापरण्यात येणार एक घटक असून याचे आरोग्य विषयक काय फायदे आहेत आपण पाहणार आहोत. शास्त्रीय नाव सिनॅमोनम व्हेरम असून, त्याचे जवळजवळ १०० प्रकार आहेत. पण त्यातील दोन प्रकार सर्व जगभर प्रामुख्यानं वापरले जातात. त्यातील ‘सिनॅमोनम झिलॉनीकम’ हा प्रकार ‘सिलोनी दालचिनी’ म्हणून तर ‘सिनॅमोनम अँरमॅटिकम’ हा प्रकार ‘चिनी दालचिनी’ म्हणून ओळखला जातो. सिलोनी दालचिनीला खरीखुरी (शुद्ध) दालचिनी तर चिनी दालचिनीला ‘कॅसिया’ म्हणूनही ओळखलं जातं. 

१. सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी  गरम पाण्यात दालचिनी पावडर आणि मध मिसळा,आहि हे मिश्रण प्या आराम पडतो  

२. पोटदुखी आणि गॅसची समस्या असल्यास दालचिनी आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्याने फायदा होतो. 

३. केस गळती रोखण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये मध आणि दालचिनी पेस्ट बनवून आंघोळीआधी ३० मिनिटे लावून ठेवा.

४.  खूप सर्दी झाली असेल तर दालचिनी पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या आणि त्यात थोडे मध घाला सर्दी कमी होईल 

५.  दालचिनी पाण्यात उकळून गाळून त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो.

६. पित्ताच्या उलट्या, मलावरोध, आम अतिसार, डोकेदुखी अश्या समस्यांवर देखील फायदा होतो.

टीप -दालचिनी उष्ण असते त्यामुळे योग्य परमंतच सेवन करा

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon