Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

दहीने तुमचे सौन्दर्य उजळून काढा

सर्वच घरात एक पदार्थ मुबलक प्रमाणात असतो. आणि तो म्हणजे दही. आणि त्याचे आरोग्याला लाभणारे फायदे तर आपल्याला माहितीच आहे. पण ह्या दहीच्या वापराने तुमचे सौन्दर्य हे निखारत असते. म्हणून तेव्हा जाणून घ्या दहीचे फायदे जाणून घ्या. आणि दही खूप घरगुती उपायांसाठी प्रसिद्ध आहे. आणि सुंदर दिसण्यासाठी नेहमी क्रीम किंवा कॉस्मेटिक वापरण्यापेक्षा हा स्वस्त आणि नैसर्गिक, घरगुती उपाय नक्कीच करा. 

१) दही घ्या आणि त्यासोबत मध 

तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढावे अशी जर तुम,ची इच्छा असेल तर, अर्धा चमचा मधामध्ये एक चमचा दही मिक्स करा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. मधाचा नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून उपयोग होतो. ह्यामुळे तुमच्या त्वचेला पौष्टिक गोष्टी मिळतात. 

२) दही आणि त्यासोबत हरभऱ्याचे पीठ 

एक चमचा दह्यामध्ये एक चमचा मोठ्या हरभऱ्याचे पीठ मिक्स करा, त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळा आणि मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून २० मिनीटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. ह्या मिश्रणातून त्वचा मुलायम होत असते. 

३) मुलतानी मातीसोबत दही घ्या 

१ चम्मच दह्यामध्ये एक चमचा मुलतानी माती मिक्स करा. या मिश्रणामध्ये थोडे गुलाब पाणी मिक्स करा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. ह्या  पॅकमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे कमी होऊन त्वचा निखळते. 

 ४) केळी, अंडे, दही, आणि हरभरा एकत्र घ्या 

एक केळ कुस्करा त्यामध्ये प्रत्येकी एक चमचा दही, हरभऱ्याचे पीठ आणि अंड्याचा पिवळा भाग मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. एका तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवा. आणि हे मिश्रण योग्य प्रमाणात घ्या. ह्यामुळे त्वचा ही खूप मुलायम व स्वस्थ बनते. 

५) मसाज 

एक चमचा दह्यामध्ये दोन चमचे ओट मिल पावडर मिक्स करा. हे मिश्रण घेऊन चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करा. ३० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. या पॅकमुळे चेहऱ्यावर छान तकाकी येते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon