Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

अश्या प्रकारे घ्या दागिन्यांची काळजी

दागिने कोणत्याही प्रकारचे असो मोती, सोने किंवा फॅशन ज्वेलरी किंवा इतर कोणत्या धातूचे त्यांची योग्य काळजी घेतली तर ते कायम नव्यासारखे राहतात.त्यामुळे त्यांची वेळच्या-वेळी योग्य ती काळजी घ्यावी. ही काळजी कशी घ्यावी याचा काही टिप्स आम्ही देणार आहोत.

१. दागिन्यांचा वापर करताना कोणत्याही प्रकारची क्रीम्स, लोशन्स, रासायनिक प्रसाधने, परफ्युम्स, तेल या गोष्टींपासून दागिने लांब ठेवावेत.

२. साफ करण्याकरिता एखाद्या अतिशय मऊ कपड्याचा वापर करायला हवा. या साठी सुती मलमलचा कपडा उत्तम. या कपड्याने हलक्या हाताने हे दागिने साफ करावेत.

३. दागिन्यांच्या सफाईसाठी . तसेच दागिने वापरून झाल्यानंतर स्वच्छ पुसून एखाद्या सुती पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या ‘ झिप लॉक ‘ पिशवीत ठेवा. सेट नसलेले गळ्यातले दागिने आणि कानातले एकाच बॉक्स मध्ये ठेवू ते एकमेकांत गुंतून तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सेट्स वेगवेगळ्या पिशव्यांमधून भरून ठेवा.

सोन्याच्या दागिन्यांची काळजी 

१. काही सोन्याचे दागिने रोज वापरल्याने या दागिन्यांमध्ये ही शरीरावरील मळ, किंवा घाम साठत असतो. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी या दागिन्यांची सफाई करणे आवश्यक आहे. या करिता कोमट पाण्यामध्ये थोडासा शॅम्पू घालून त्या मिश्रणात हे दागिने काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर हलक्या हाताने, एखाद्या जुन्या टूथब्रशने हे दागिने घासावेत, आणि मग साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. दागिने धुवून झाल्यानंतर लगेच मऊ कपड्याने पुसून कोरडे करावेत.

२. रिठे उकळून त्याच्या गाळलेल्या पाण्यामध्ये दागिने पाच मिनिटं भिजवून ठेवावेत. त्यानंतर चोळून स्वच्छ करावेत. दागिने एकदम स्वच्छ दिसतील. सोन्याचे दागिने चमकविण्याकरिता एका भांड्यामध्ये थोडे पाणी गरम करून घ्यावे त्यामध्ये किंचित हळद घालावी, व या मिश्रणत दागिने काही वेळ बुडवून ठेवावेत. त्यानंतर दागिने हळदीच्या पाण्यातून काढून साध्या पाण्याने धुवून घ्या. बटाटय़ाचे तुकडे किंवा उकडलेल्या बटाटय़ांचं पाणी वापरूनदेखील दागिने स्वच्छ होतात.

चांदीच्या दागिन्याची काळजी 

१. चांदीचे दागिने स्वच्छ करायचे असल्यास, दात घासायच्या पेस्ट ने स्वच्छ करावे. किंवा एका भांड्याच्या तळाशी अॅल्युमिनियम फॉईल लावा, त्यामध्ये पाणी घाला, व त्या पाण्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घाला हे मिश्रण थोडेसे गरम करा. आणि नंतर चांदीचे दागिने काही वेळ या मिश्रणात घाला. थोड्या वेळाने बाहेर काढल्यावर मऊसर तलम कापडाने पुसून घ्या.याने काळे पडलेले चांदीचे दागिने चमकू लागतात.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon