Link copied!
Sign in / Sign up
60
Shares

दाढ दुखण्यावरती रामबाण घरगुती उपाय करून बघा


         बऱ्याच स्त्रियांना दाढ दुखीची समस्या जाणवत असते. आणि ह्या दाढदुखीत काहीच सुचत नाही व सुधरत सुद्धा नाही. नवरा काय सांगतोय हे कळत नाहीत. म्हणजे ह्या वेळी सर्व लक्ष त्या दाढदुखीच्या वेदनेकडे लागले असते. तेव्हा ह्यावर कोणते उपाय करता येतील. ते जाणून घ्या ह्या ब्लॉगमधून.

* ह्यासाठी तुळशीची ६ ते ७ पाने स्वच्छ करून वाटी किंवा उखळीमध्ये घ्या आणि त्यांना कुटून रस करावा. त्यात कापराच्या तीन ते पाच वड्यांची पावडर करून त्यामध्ये मिसळावी. आणि त्यानंतर त्या कापसाचे छोटे तीन-चार बोळे या मिश्रणात भिजवून दुखऱ्या दाढेत ठेवावेत. तुम्हाला आराम मिळेल.

* खूपच दातदुखी असेल तर कमी करण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा आल्याचा तुकडा चघळा. आल्याचा रस दुखणाऱया दाताकडे वळवा. दातातल्या संसर्गापासून आराम मिळतो. दातदुखी कमी न झाल्यास दंतवैद्यांचा सल्ला घ्या.

* दाढ दुखत असल्यास चिमूटभर हिंग मोसंबीच्या रसात मिसळा. या रसात कापूस भिजवून भिजलेला कापूस दुखऱया दाढेवर पकडा. यामुळे दातदुखी कमी होईल.

* ह्या मसाल्याचा, लवंगेत जिवाणू नष्ट करण्याचे गुणधर्म असतात. लवंगाच्या तेलाचे काही थेंब कापसावर घेऊन तो कापूस दुखऱया दाढावर ठेवला की, दाढदुखी थांबते. तेलाऐवजी लवंगाची पावडरही वापरू शकता. लवंग नसल्यास सुंठ पावडर वापरा.

* सुंठ पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट दुखणाऱ्या दाढावर ठेवा. दातांच्या दुखण्यावर कांद्याचे तुकडे चावून खाल्लास आराम मिळेल.

* तुमच्या घरी कच्चा लसूण असेलच, तर त्याच्या २ ते ३ पाकळ्या दाताने चावा. लसूण कापूनही दातावर धरू शकता. लसणातील एलिसीनमुळे दातांतील जिवाणू नष्ट होतात.

ह्या घरगुती उपायांनी तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon