Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

या टिप्स तुम्हांला स्वयंपाक करताना उपयुक्त ठरतील.

    स्वयंपाक कराताना अनेक वेळा पदार्थ बिघडतात,काही पदार्थ ठेवून खराब होतात,किंवा काही पिठं ठेऊन-ठेऊन खराब होतात.अश्या चूका सुधारण्यासाठी किंवा पदार्थ खराब होऊ नये यासाठी काही टिप्स देणार आहोत .

१. गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.

२. भाकरीचे पीठ जुने झाल्यास त्याची विरी जाते आणि भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.

३. साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.

४. सुके  खोबरे तूरडाळीत खुपसून ठेवले तर खराब होत नाही.

४. कोणत्याही प्रकारची रस्सा भाजी  खारट झाल्यास वाया जाण्याची शक्यता असते अश्यावेळी त्यात उकडलेला बटाटा घालावा, खारट पणा कमी होतो.

५. बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी.

६. डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा.

७. घट्ट दही हवे असल्यास  विरजण लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी. दही घट्ट होते. 

८. भाजी-करताना मीठ शेवटी घातल्यास भाजीतले  जीवनसत्व टिकून राहतात. 

९. ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे. आंबटपणा कमी होईल.

१०. कोणत्याही प्रकारच्या वड्या व मिश्रण पातळ झाल्यास आणि वड्या पडत नसल्यास तर त्यात भिजवून मिल्क पावडर आणि पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.

११. डोस्याचं पीठ हिवाळयात आंबवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मध्ये पीठ ग्राइंड करताना घालावे.

१२. कोणताही पूलाव किंवा मसाले भात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला असता पुलाव मोकळा छान होतो .

१३. पु-या बराच वेळ फुगलेल्या राहण्यासाठी पु-यांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली

१४. हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, डब्यात घालून ठेवाव्यात.

१५. अनारसे बिघडल्यास म्हणजेच अनारस तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोडी तांदळlची पीठी मिसळावी.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon