Link copied!
Sign in / Sign up
59
Shares

चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी हे उपाय करा

'डबल चिन','चब्बी चिक्स' एखाद्याच्या शाररिक रूपात आणि आत्मविश्वासावर विपरीत परिणाम करतात. एका सर्वेक्षणानुसार सत्तर टक्के चेहऱ्यावरील चरबी ही लठ्ठपणातून येते. काही शाररिक व्यायाम आणि धावणे (सीट अप, पुश अप्स) हे व्यायाम प्रकार शरीरातील चरबी बाहेर काढण्यासाठी महत्वाचे ठरतात. तेव्हा चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी लाभदायी आहेत. निरोगी व पौष्टिक आहाराव्यतिरिक्त चेहऱ्याचे खास व्यायाम केल्यास ही चरबी कमी

होते. आज आपण अशा काही व्यायामाचे प्रकार आहे त्याची माहिती घेऊ :

 हनुवटी उचला 

दुहेरी हनुवटी येत असल्यास हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त ठरेल. हनुवटी वर उचलून म्हणजे मानेपासून ते जबड्यापर्यंत घशाजवळील स्नायू व्यवस्थित ताणले जातात. बसलेल्या किंवा उभे असताना व्यायाम करणे सहज शक्य आहे. हनुवटी वरच्या बाजूला वर ओढताना नजर देखील वरती (छताकडे) ठेवा. ओठ घट्ट वरती ओढून घ्या आणि सेल्फीच्या भाषेत पाऊट करा आणि या स्थितीत १० पर्यंत आकडे मोजा. असा व्यायाम दिवसभरात किमान नऊ ते दहा वेळा करावा. तथापि, यामध्ये ओठां खेरीज इतर कोणतेही स्नायू वापरले जाणार नाहीत याची काळजी घ्या.

 जबडा मोकळा करा 

          तुमच्या हनुवटीला जर आकर्षक आकारात आणायचे असेल तर जबडा मोकळा करण्याचा व्यायाम लाभदायी ठरतो. या व्यायाम प्रकारत गळा, ओठ, जबड्या भोवतीचे स्नायू दीर्घकाळ ताणून ठेवा. उभे किंवा बसलेल्या अवस्थेत देखील करू शकता. या प्रकारात ओठ घट्ट बंद करून घ्या आणि जसे आपण च्युइंग गम चघळतो तसे जबड्याची हालचाल करा, याच बरोबर श्वासोच्छवास जोरात करा. दुसरी क्रिया म्हणजे तोंड पूर्ण उघडा आणि जीभ दाताच्या खाली पाच सेकंद दाबून धरा. या पाच सेकंदात आतील श्वास आता बाहेर करावा. ही क्रिया दिवसभरातून किमान दहा वेळा करावी.

चेहवरील स्नायू ताणावेत 

नावा प्रमाणेच सर्व व्यायाम हे चेहर्यावरील स्नायूंचे असून ते ताणण्यासाठी हातांचा वापर करावा. हनुवटी कमी करण्यासाठी छातीला स्पर्श करणे आवश्यक आहे. चेहर्यावरील त्वचा अशा प्रकारे खाली उतरावा म्हणजे गळ्याचे एक टोक हातात धरून खाली ओढा. या स्थितीत "आह" हा शब्द तोंडातून निघतोच. ही स्थिती थोडावेळ स्थिर ठेवा. असे दिवसभरात किमान दहा वेळा करावे.

डोळे घट्ट मिटा 

हा व्यायाम त्रासमुक्त असून गालाच्या स्नायूंनी डोळे घट्ट बंद करावे. हा व्यायाम प्रकार करताना चेहऱ्यावरील स्नायूंचे आकुंचन होईल याची काळजी घ्या. ही क्रिया दहा सेकंदासाठी करा. आता हळूहळू स्नायू मोकळे करा. ही क्रिया दिवसभरातून पाचवेळा करावी.

फिश फेस 

एक साधी गोष्ट आहे जेव्हा मासे एखादे खाद्य खातात तेव्हा ते जसे दिसतात तसा चेहरा करून जबड्याच्या आतील त्वचा कमी होते. या व्यायामाची खासियत म्हणजे आपण कुठेही आणि कोणत्याही वेळी व्यायाम करू शकता. फिश फेसमुळे गाळाचे स्नायू टोन होण्यास मदत होते. या व्यायामामुळे चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावते. फिश फेस करताना गाल आणि ओठ जास्तीतजास्त आतल्या बाजूला ओढा आणि स्मित हास्य करण्याचा प्रयत्न करा. असे केवळ पाच सेकंदासाठी करावे. यामुळे चेहऱ्यावरील चरबी लवकर कमी होते. हा व्यायाम प्रकार सुद्धा दिवसातून दहा वेळा करावा.

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon