Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

चेहऱ्यावर पुरळ आणि टेन्शन ह्यांचे नाते सेम आहे

१) आपण कसे दिसतो याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर कसे चांगले किंवा विपरीत परिणाम करू शकतो हे या अभ्यासातून पुढे आले आहे. चेहऱ्यावर पुरळ आलेल्या लोकांमध्ये पुढील पाच वर्षांत नैराश्याचा धोका बळावत असल्याचे संशोधकांनी सुचविले आहे. चेहऱ्यावर पुरळ आल्याच्या पहिल्या वर्षांत नैराश्याचा धोका सर्वाधिक असल्याचे संशोधकांना आढळून आले.

२) या लोकांमध्ये नैराश्याचा धोका पुरळ नसलेल्या लोकांच्या तुलनेने ६३ टक्के अधिक असल्याचे आढळून आले आहे. डॉक्टरांनी उपचारादरम्यान आपल्या रुग्णांचे मानसिक स्थितीवर लक्ष ठेवण्याचे देखील संशोधकांनी सुचविले आहे. त्याचबरोबर पुरळ आलेल्या रुग्णांना मानसोपचारतज्ज्ञाकडून नैराश्याबाबत सल्ला देण्याची सूचना केली आहे. या अभ्यासातून त्वचा रोग आणि मानसिक आजारामधील महत्त्वाचा दुवा अधोरेखित झाला आहे. असे कॅनडातील कॅल्गरी विद्यापीठाच्या इसाबेल वल्लरँड यांनी सांगितले.

३) चेहऱ्यावर पुरळ आल्याबाबत पहिल्यांदा डॉक्टरकडे उपचार सुरू केल्यापासूनच नैराश्याचा धोका सर्वाधिक असतो यावरून निरोगी त्वचा मानसिक आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे हे आढळून येते, असे वल्लरँड यांनी सांगितले.

४) चेहऱ्यावरील पुरळ हा या रुग्णांसाठी केवळ एक त्वचा दोष नसून यामूळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे वल्लरँड यांनी म्हटले. हा अभ्यास ब्रिटिश जर्नल ऑफ डरमेटोलॉजी या नियकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon