Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

चेहऱ्यावर नको असणाऱ्या केसांवर घरगुती उपाय

 

        अनेक स्त्रियांच्या चेहऱ्यावर केस येतात आणि त्याचा स्त्रियांना अनेक वेळा त्रास होतो, बहुतांश वेळा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे हे होतं. यासाठी वॅक्सिंग आणि थ्रेडींग हे उपाय आहेतच पण यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत जे या  समस्यमध्ये उपयुक्त ठरू शकतात. 

    १. संत्र्याची साल आणि दह्याची पेस्ट

संत्र्याची साल त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. याच्या वापरामुळे चेहरा तजेलदार दिसतो. सोबतच चेहऱ्यावर दिसणारे केसही विरळ होत जाता. जर तुम्हाला आणखी परिणामकारक उपाय हवा असेल तर संत्र्याच्या सालांत दही आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून ही पेस्ट दररोज चेहऱ्याला लावा. यामुळे, तुमची पिंपल्सपासूनही सुटका होईल.

२. पपई आणि हळदीची लेप 

पपईत थोडी हळदही मिसळून हा लेप दररोज चेहऱ्याला लावू शकता. हा लेप लावताना चेहऱ्याला मसाज करा आणि त्यानंतर १५-२० मिनिटे हा लेप तसेच राहू द्या. 

३. लिंबूचा रस आणि मध

चेहरा तजेलदार बनवण्यासाठी मध आणि लिंबूचा रस मिसळून चेहऱ्याला लावा. रोज हे मिश्रण कमीत कमी १० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवा. याचा नक्कीच फायदा होईल. 

४. टोमॅटोचा रस

टॉमेटो थोडा कापून किंवा त्याची पेस्ट बनवून त्यानं चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करा. पेस्ट थोड्या वेळ लावून ठेवा. आणि त्यानंतर चेहरा पाण्यानं धुवून घ्या.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon