Link copied!
Sign in / Sign up
58
Shares

चेहरा सुंदर आणि चेहऱ्यावर तेज येण्यासाठी हे स्वस्त घरगुती उपाय करून पहाच

       प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. चेहरा सुंदर होण्यासाठी स्त्रिया तर मेकअप करतातच पण पुरुषसुद्धा मेक अप करत असतात. सुंदर दिसायला हवेच. त्यामुळे आत्मविश्वास येत असतो आणि खूप फ्रेश फ्रेश वाटते. तेव्हा त्यासाठी काय करावे लागेल. तर ह्यासाठी खूप सोप्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि त्याही नैसर्गिक आहेत आणि ह्याचा परिणाम होत असतो. तुमचा चेहरा बदलून जाईल. तेव्हा ती कोणती उपाय आहेत. हृदयामध्ये असलेले सौंदर्यच तुमच्या चेहऱ्यावरील तेजात परावर्तीत होते.

१ बेसन - २ चमचे

२ चंदन पावडर

३ हळद पावडर – अर्धा चमचा

४ कापूर - चिमुटभर

५ पाणी / गुलाबजल / दूध

बेसन, चंदन पावडर, हळद पावडर आणि कापूर यांचे पाणी अथवा गुलाबजल अथवा दूध वापरून थोडे घट्ट मिश्रण बनवा. ते एकसारखे तुमच्या चेहऱ्यावर लावा. २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर पाण्याने धुवून काढा. तुमचा अनुभव आणखी चांगल्या परिणामांसाठी कापसाच्या दोन पट्ट्या गुलाबपाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा.

२) थोडे धावा, थोडे जॉगिंग करा आणि सूर्यनमस्काराच्या काही फेऱ्या जलद गतीने करा म्हणजे तुमचे रक्ताभिसरण सुधारेल. थोडा घाम निघणे तुमच्यासाठी चांगले आहे. काही वेळाने पाण्याने शरीर साफ करा जेणेकरून त्वचा स्वच्छ होईल.

३) चेहऱ्याचा हळुवार मसाज खूपच फायदेशीर असतो. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार नारायण किंवा दुसरे एखादे तेल निवडा. मोहरी, बदाम अथवा खोबरेल तेल त्वचेचे उत्तम पोषण करतात व तिला खुलवतात.

४) आपले शरीर आपण जे खातो यानेच बनलेले असते. साहजिकच ताजे, स्वच्छ आणि रसदार अन्न सेवन केल्याने आपली त्वचा तेजस्वी राखण्यास मदत करतात. प्रथिने, जीवनसत्वे, भरपूर फळे व पालेभाज्यायुक्त असा समतोल आहार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेणे श्रेयस्कर ठरते.

५) तुम्ही उच्च प्रतीचे कपडे, दागिने घातले असतील आणि एक छान बॅगदेखील तुमच्याकडे असेल...तरीदेखील पूर्णता यायला आणखी एका गोष्टीची गरज असतेच. तुमचे स्मित! आपण बराच वेळ, शक्ती, पैसे आपले शरीर आणि दिसणे यांवर खर्च करतो परंतु हृदयातला आनंद कधीच प्रकट करत नाही. तो करणे किती सोपे आहे पहा: तुमचे दोन्हीही ओठ डोळ्यांच्या दिशेने किंचित ताणायचे असतात!

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon