Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

चेहरा आणि त्याचे आरोग्य. . .

एक कायमचे ( स्टॅटीक ) व कधी कधी येणाऱ्या ( डायनामिक) जेव्हा वय वाढल्यामुळे किंवा premature aging मुळे त्वचा पातळ होते व ओढली जाते तेव्हा static wrinkles तयार होतात. डायनॅमिक रींकल्स्‌ ( सुरकुत्या) हे सर्व वयात होतात, अगदी लहान मुलांमध्ये सुध्दा. त्यांना ‘Laugh lines’ असं पण म्हणतात.

जेव्हा चेहर्‍यावरचे स्नायु तात्पुरते आकुंचीत होतात तेव्हा त्वचेचा वरचा पदर दुमडत जातो, त्याला डायमॅनिक सुरकुत्या म्हणतात. हसताना, रडताना, बाकी चेहर्‍यावरचे हावभाव बदलताना ह्या सुरकुत्या तात्पुरत्या पडतात.

१) पाश्‍चात्य देशांमध्ये ऊन्हामध्ये tanning करण्याचं फार वेड आहे. ह्या tanning मुळे त्वचा कोरडी पडते व सुरकुत्या पडतात किंवा अगदी त्वचेचा क्षयरोग (skin cancer) सुध्दा होऊ शकतो. हे सर्व सूर्य किरणांमधल्या अल्ट्रा वायोलेट किरणांमुळे मुळे होतो. वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत जवळ जवळ अर्ध्या आयुष्यात होईल एवढं U V exposure होतय असं संशोधकांच म्हणणं आहे.

२) ऑस्ट्रेलीया मध्ये केलेल्या एका पाहणीमध्ये असं दिसून आले की, पचवीशीतच्या लोकांना सुध्दा चेहऱ्यावर व हाताच्या पृष्ठ भागावर photo-aged त्वचा आहे. हेच भाग सतत U V radiation मुळे झालेले असतात. एकुण काय, तर उन्हामुळे किंवा मुद्दाम केलेल्या tanning मुळे जे U V radiation होतं ते त्वचेतल्या DNA cells ना हानीकारक आहे. याहून वाईट गोष्ट म्हणजे पृथ्वी वरचा ओझोनचा थर (Ozone layer) कमी होत चालला असल्या कारणाने हे U V radiationवाढत चाललं आहे. त्यामुळे होणारे त्वचेवरचे सूक्ष्म आघात काही वर्षानंतर एकत्र होऊन सुरकुत्या व इतर त्वचेला अपाय होण्यास कारणीभूत ठरतात.

३) ऊन्हापासून सावधगिरीसाठी सनस्क्रिन lotion/Cream मिळतात. १५ किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात SPF (Skin Protection Factor) असलेलं सनस्क्रिन हे बऱ्याच हानीकारक U V rays filter करतात.

४) तुम्ही तुमच्या लहानपणी किंवा तरूण असताना जरी हे सनस्क्रिन वापरले नसतील तरी ते आता वापरा, अगदी वर्षभर. बाहेराची कुठलीही कामं करीत असताना अगदी बागकाम, खेळणे, फिरायला जाताना, जॉगींगला जाताना, बीच वर जाताना सनस्क्रिन वापरायला विसरू नका. त्याने UV-A, UV-B चे radiation पासुन तुमची त्वचा सुरक्षित राहते. शरीराच्या सर्व उघड्या राहणाऱ्या भागांवर साधारण बाहेर पडण्यापूर्वी अर्धातास तरी सनस्क्रिन लावावं, घाम आल्यावर किंवा पाहून आल्यावर सुध्दा हे मलम दर ३-४ तासांनी परत परत लावावं.

५) हाताची पृष्ठ बाजू विसरू नका व आभाळ आलं असलं तरी फसू नका. UV ची किरणं आभाळालास भेदून तुमच्या त्वचेला हानी पोचवू शकतात. डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा पदर असला तर निश्‍चित फायदा होतोच.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon