Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

तुम्हाला चष्मा घालवायचा आहे ? हे करा

डोळ्यांना चष्मा लागणे चांगली गोष्ट नसतेच. पण आपल्याला प्रत्येकालाच चष्माची सवयच झाली आहे. कारण मोबाईल, टी. व्ही, लॅपटॉप, किंवा आपले खानपान ह्या सगळ्याच गोष्टीमुळे आपल्यापैकी खूप व्यक्तींना चष्मा लागत असतो. आणि आतापर्यंत चष्मा लागला नसेल त्यांनी तपासून घ्यावे. कदाचित त्यांनाही चष्मा लागला असेलच. आणि डोळे हे खूप नाजूक असतात. त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या ब्लॉगमधून काही गोष्टी घेतल्याचं तर तुम्हाला डोळ्यांचा आयुष्यभर समस्या येणार नाही. 

     १) एक पेन्सिल डोळ्यासमोर एक हात अंतरावर ठेवावी. तिच्याकडे एकटक पाहावे. हळूहळू नाक पेन्सिलच्या जवळ न्यावे. पेन्सिल जसजशी जवळ येईल तसे नजर केंद्रीत होणे कमी होईल. हा व्यायाम दिवसातून दहा वेळा पुन्हा पुन्हा करावा.

२) दुसरा व्यायाम आहे तो डोळे घड्याळाच्या दिशेने आणि उलट्या दिशेने फिरवावे. असे चार ते पाच वेळा करावे.

३) दिवसातील काही काळ सूर्यप्रकाशात घालवावा. काही वेळ डोळे बंद करून सूर्यप्रकाशाकडे पाहत उभे रहावे. त्यामुळे डोळ्यांना आरामही मिळेल आणि डोळ्यांचे हिलिंगही होईल.

४)  हाताचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासा ते हलके गरम होतील मग तेच हात आपल्या मिटलेल्या डोळ्यांवर ठेवा. हाताने डोळे पूर्ण झाकून घ्या. उजेड नकोच. दिवसातून बरेच वेळा हे केल्यास फायदा होतो.

* रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत.

* गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्याचा ज्युस प्यायल्यास नजर तीक्षण होते.

* रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत.

* रोज रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी

* एक चमचा बडीशेप (सौफ), दोन बदाम आणि अर्धा चमचा साखर एकत्रित करुन वाटून घ्यावं. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे

 

* 3-4 हिरव्या वेलच्या, एक चमचा बडीशेप (सौफ) सोबत वाटून घ्याव्या. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे

* ग्रीन टी दिवसातून रोज 2 ते 3 वेळा प्यावा, यातील अॅन्टीऑक्सिडेंटस डोळ्यांना आरोग्य प्रदान करतात.

* दिवसातून दोनवेळा मोरावळा (आवळ्याचा मुरंबा) खावा, याने नजर चांगली होते.

* रोज एक चमचा ज्येष्ठमध पावडर, मध आणि अर्धा चमचा तूप एकत्रित करुन सकाळ-संध्याकाळ दुधासोबत घ्यावं

* डोळ्याच्या चारही बाजूंनी अक्रोडाच्या तेलाने मालिश करावी, त्यामुळे फायदा होतो

* रोज सकाळी 1 ते 2 किलोमीटर अंतर हिरव्यागार गवतावर अनवाणी चालावे, त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो

* रोज रात्री तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी भरुन ठेवावे आणि सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी अनोशा (रिकाम्या) पोटी प्यावे

*  रोजच्या आहारात हिरव्यागार पालेभाज्या खाव्यात, डोळ्यांना फायदा होतोTinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon