Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

जाणून घ्या सिझेरियन प्रसुतीचे प्रमाण का वाढले आहे.

शहरी भागात राहणाऱ्या व्यक्तींना सी सेक्शन प्रसुती किंवा सिझेरियन प्रसुती काही नवी नाही. तर आपल्या ओळखीतील किंवा शेजारपाजारच्या व्यक्तींच्या ओळखीतही एखाद्या गर्भवतीची प्रसुती सिझेरियन किंवा सी सेक्शन पद्धतीने झाली असल्याचे ऐकिवात येते. कारण हल्ली सी सेक्शन प्रसुती होणे हे अगदी सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. किंवा असे म्हणूया की नैसर्गिक प्रसुतीपेक्षा सी सेक्शन प्रसुती करण्याचे प्रमाण अधिक आहे.

सी सेक्शन प्रसुतीचे प्रमाण- आकडेवारीचा विचार करता चीनमध्ये प्रत्येक दोन प्रसुती, थायलंड मध्ये पाच पैकी दोन तर भारतात पाच पैकी एक या दराने सी सेक्शन प्रसुती होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार २००७-२००८ सालामध्ये आशिया खंडात १ लाख १० हजार प्रसुतीपैकी २७ टक्के प्रसुती सी सेक्शन होत्या. तर लॅटिन अमेरिकेत हे प्रमाण ३५ टक्के होते. भारताच्या काही राज्यांमध्ये सी सेक्शन प्रसुतीचे प्रमाण हे ५० टक्क्यांहून अधिक होते.

सी सेक्शनच का ?

या संदर्भात केलेल्या पाहणीनुसार सी सेक्शन प्रसुती ही गरज म्हणून नव्हे तर आर्थिक लाभापोटी केल्या गेल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते अनावश्यक सी सेक्शन मुळे स्त्रियांचे आरोग्य धोक्यात येते. काही वेळा रुग्णालये आर्थिक लाभापोटी तर काही वेळा प्रसुतीकळांना घाबरून स्त्रिया सी सेक्शन प्रसुती करण्यात पसंती देतात.

सी सेक्शन प्रसुतीचे धोके

अनावश्यक सी सेक्शन प्रसुती महागडी तर असतेच परंतू त्यात काही धोकेही संभवतात. काही रुग्णांच्या बाबतीत विकृती निर्माण होण्याचा दर आणि मृत्युदरही अधिक असतो. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मासिकाने केलेल्या अभ्यासानुसार गरज नसताना केलेल्या सी सेक्शन प्रसुतीमध्ये रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्याची शक्यता १० टक्क्यांंनी अधिक असते.

महागडी शस्त्रक्रिया - सिझेरियन किंवा सी सेक्शन प्रसुती ही गर्भवती आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी केली जाणारी आप्तकालीन शस्त्रक्रिया आहे. मात्र भारतात नैसर्गिक प्रसुतीच्या तुलनेत सी सेक्शन प्रसुतीचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. भारतात सी सेक्शन प्रसुतीचे दर नैसर्गिक प्रसुतीपेक्षा वीस हजार रुपयांनी अधिक आहेत. खाजगी रुग्णालयात ५ टक्के ते जवळपास ६५ टक्के खर्चात वाढ होते.

सी सेक्शन प्रसूती करावी लागण्याची कारणे

१. सी सेक्शन प्रसुती होण्यामागे आपल्या जीवनशैलीतील बदल हे ही एक कारण आहे.

जीवनशैलीतील बदल- सध्याचे आयुष्य धावपळीचे झाले आहे.

पुर्वी स्त्रियांना शारिरीक श्रमाची कामे अधिक प्रमाणात करावी लागत. स्वच्छता, भांडी घासणे, कपडे धुणे या सर्व गोष्टी घरीच कराव्या लागत होत्या. आता या गोष्टींसाठी कामवाली बाई किंवा मशीन दिमतीला हजर असते. थोडक्यात शारिरीक श्रम कमी झाले आहेत. कार्यालयीन कामकाजातही बैठ्या कामांचे प्रमाण अधिक असल्याने शारिरीक हालचाल किंवा श्रम यांची कमतरता असल्याने स्थूलपणात वाढ झाली आहे. स्त्रियांचे घरातील श्रमाची कामे कमी झाली असली तरीही त्याला पर्याय म्हणून व्यायाम केला जात नाही. भारतात तब्बल तीन कोटी लोकसंख्या स्थूल आहे. तसेच मधुमेह, हृदयाशी निगडीत समस्या यात वाढ झाली आहे.

जीवनशैलीत बदलातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आहारातील बदल.

फास्ट फूड, वेळी अवेळी जेवणे, तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन करणे आणि मैदायुक्त पदार्थांचे अतिसेवन, सोडायुक्त पेये, अतिरिक्त मीठ, साखर असलेले पदार्थांचे सेवन तसेच हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश नसणे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे वाढते वजन.

नैसर्गिक प्रसुतीसाठी उत्तम आहार आणि शारिरीक श्रम अत्यावश्यक आहेत. थोडक्यात जीवनशैलीतील बदल हे सिझेरियनच्या वाढत्या प्रमाणास कारण ठरताहेत.

वैद्यकीय समस्या

काही वेळा गर्भवती किंवा बाळ यांच्या आरोग्याच्या जटील समस्यांमुळेही सी सेक्शन प्रसुतीचा निर्णय घ्यावा लागतो.

वैद्यकीय परिस्थिती जसे गर्भावस्थेपुर्वी स्थूलता, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी निगडीत समस्या.

गर्भावस्थेतील वैद्यकीय परिस्थिती - उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भजलाचे कमी प्रमाण

प्रसुती दरम्यानची गुंतागुंत - मुदतपूर्व प्रसुतीकळा, गर्भजलाविषयी समस्या, जुळी बाळे आणि गर्भाच्या काही समस्या.

काही वेळा नाळ योग्य ठिकाणी नसते, गर्भाच्या मानेभोवती नाळेचा वेढा पडणे, प्रीक्लाम्पसिया, गर्भाच्या वाढीची समस्या किंवा गर्भाला जंतुसंसर्ग होणे या कारणांनी सी सेक्शन प्रसुती करावी लागते. नाईलाजास्तव प्रसुतीदरम्यानच्या गुंतागुंतीमुळे सी सेक्शन प्रसुती करावी लागते. अर्थात आई आणि बाळासाठी सी सेक्शन प्रसुती नक्कीच योग्य नाही.

उपाय

गर्भधारणेविषयी शिक्षण देणे, गर्भावस्थेच्या काळात घ्यावयाची काळजी आणि आरोग्यदायी जीवनशैली यामुळे सी सेक्शन प्रसुती टाळून नैसर्गिक प्रसुती होण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर गर्भवतीला सी सेक्शन चे धोके आणि दीर्घकालीन त्रास याविषयीही माहिती दिल्यास रुग्णांकडून सी सेक्शनची मागणी घटण्यास मदत होईल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon