Link copied!
Sign in / Sign up
54
Shares

सी-सेक्शनद्वारे बाळाला बाहेर काढतानाच व्हिडीओ

सी-सेक्शनद्वारे बाळला बाहेर काढतानाच व्हिडिओ, हा व्हिडीओ अति भावनाप्रधान व्यक्तीने बघणे टाळा. 

              तुमच्या शरीराचा कमरेखालचा भाग सुन्न झाला की डॉक्टर तुमच्या प्युबिक बोन म्हणजेच उटीपोटाच्या हाडाच्या थोडे वर २ बोटांच्या लांबी एवढी आडवी चीर पाडतात.

       पोटाच्या त्वचेखालील मांसपेशींना मोकळे केले जाते म्हणजे गर्भाशयापर्यंत पोहोचले जाऊ शकते. या मांस पेशींना चिरण्याऐवजी वेगळे केले जाते. गर्भाशयाच्या खालच्या बाजूस बघण्यासाठी मूत्राशयाला खालच्या बाजूस सरकवले जाते.

यानंतर खालच्या बाजून छोटा चिरा लावला जातो. कात्री किंवा बोटांंच्याच सहाय्याने डॉक्टर या चिर्यास फाकवून मोठे करतात. मोठा चिरा लावण्याच्या तुलनेत असे केल्याने रक्तस्त्राव कमी होतो.

आजकाल गर्भाशयाच्या केवळ खालच्या भागास चिरा लावून उघडले जाते. याचमुळे या शस्त्रक्रियेला अनेकदा लोवर सेग्मेंट सिझेरियन (LSSS) सेक्शन म्हटले जाते.

गर्भाशयाच्या पिशवीला उघडले जाते आणि तुम्हाला अचानक वेगाने एक द्रव पदार्थ वाहत असल्याचा आवाज येईल. यानंतर बाळाला बाहेर काढले जाते. तुम्हाला असे जाणवेल की डॉक्टर किंवा नर्स तुमच्या पोटावर दाब देत आहेत जेणेकरून बाळाला बाहेर काढण्यास मदत होईल. जर तुमचे बाळ ब्रीच स्थितीमध्ये असेल म्हणजे जर त्याचे पाय खाली असतील तर त्याचे पाय आधी बाहेर काढले जातील. यास बाळ पायाळू असणे असे म्हणतात.

शिशूला बाहेर काढण्यासाठी केवळ काही मिनिटे लागतात. बाळाचा जन्म झाल्यावर नर्स बाळाच्या नभीवरील नाळेला चिमटा लावून नाळ काढून टाकेल.

या प्रक्रियेनंतर डॉक्टर चिरेवर टाके घालतील. मांसपेशी व त्वचेच्या प्रत्येक उघड्या बाजूला टाक्याच्या सहाय्याने बंद केले जाईल. गर्भाशयाला कदाचित दुहेरी टाके घातले जातील.

सगळे काम झाल्यावर तुम्हाला तुमच्या खोलीत पाठवले जाईल. बाळाची संपूर्ण तपासणी करून तुमच्याजवळ पाठवले जाईल. यावेळी तुम्ही तुमच्या पतीसोबत बाळाला निवांत भेटू शकता.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon