Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

आईचे सिझेरियन झाले असेल तर मुलीचे पण सिझेरियनच होते का ?

गर्भारपणाच्या ९ महिन्यांच्या काळानंतर सुखरूप प्रसुती होणे म्हणजे सुटका झाल्यासारखे वाटते. कारण गर्भारपण हा बाईचा दुसरा जन्मच असतो असे म्हणतात. त्यातही हल्ली नैसर्गिक प्रसुती पेक्षा सिझेरियन होण्याचे प्रमाण वाढले आहे असे ऐकिवात येते. अनेकदा नैसर्गिक प्रसुती होईल असे वाटत असताना, परिस्थिती बदलते आणि सी सेक्शन प्रसुती केली जाते. तर काही वेळा सहज नैसर्गिक प्रसुती होते. प्रसुती होण्याच्या पद्धतीत अनुवांशिकता असते का असा प्रश्नही काही वेळा पडतो.

मुळात अनुवांशिकता म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. अनुवांशिकता म्हणजे मातापित्यांचे गुण मुलांमध्ये येतात. काही मुलांचा तोंडवळा किंवा सवयी थेट पालकांसारख्या असतात. आजारही अनुवांशिकतेने आलेले असतात. त्यामुळे शारिरीक ठेवण ही अनुवांशिक असू शकते. मात्र त्याचा अर्थ एखाद्या स्त्रीची प्रसुती ही अनुवांशिकतेने सी सेक्शन होईल असे मानण्याचे काही वैद्यकीय कारण दिसत नाही.

नैसर्गिक प्रसुती 

गर्भारपणाचे ९ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळ आतून पुढे सरकू लागते आणि गर्भपिशवी फाटून योनीमार्गातून ते बाहेर येते. त्याला नैसर्गिक प्रसुती म्हणतात.

सी सेक्शन प्रसुती

ही प्रसुती जेव्हा नैसर्गिक प्रसुती होणार नसेल तेव्हा शस्रक्रियेद्वारे प्रसुती केली जाते त्याला सी सेक्शन प्रसुती म्हणतात. काही वेळा गुंतागुंत असल्यास पूर्वनियोजित प्रसुती करावी लागते तेव्हा सी सेक्शन प्रसुती केली जाते. त्यासाठी पोटाला उभा किंवा आडवा छेद देऊन ही शस्रक्रिया केली जाते.

सी सेक्शन प्रसुती अनुवांशिकता ?

गर्भधारणा झाल्यानंतर जसे प्रसुतीचा काळ जवळ येतो तशी चर्चा सुरु होते ती प्रसुती कशी होणार याविषयी. प्रसुती नैसर्गिक की सी सेक्शन हे सर्व बाळाची स्थिती, आईची परिस्थिती यावर अवलंबून आहे. अनेकदा सी सेक्शन प्रसुती ही अनुवांशिक असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळतात. पण वैद्यकीय दृष्ट्या असे काहीही सिद्ध झालेले नाही. मुळात अनुवांशिकता ही गुण, ठेवण, आजार याविषयी असते. शरीर अवयवांची ठेवण अनुवांशिक असू शकते उदा. योनीमार्ग लहान असणे इत्यादी. वैद्यकीय कारणांमुळे सी सेक्शन प्रसुती होऊ शकते. पण आईची प्रसुती सी सेक्शन झाली म्हणून मुलीच्या प्रसुतीवेळीही सी सेक्शन प्रसुती होईल असे नाही. वैद्यकीय दृष्ट्या असे काही सिद्ध झालेले नाही.

अनेकदा नैसर्गिक प्रसुती होण्यासाठी आवश्यक परिस्थिती असते म्हणजे आईला कळा येतात. योनीमुख मोठे होते पण पुन्हा काही वैद्यकीय परिस्थिती जसे बाळाची स्थिती बदलणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे उद्भवल्यास तातडीने सी सेक्शन प्रसुती करावी लागते. आई आणि मुलगी यांच्यातील अनुवांशिकता जुळी बाळे असणे, योनीमार्ग लहान असणे याबाबत असू शकते आणि त्यामुळे सी सेक्शन प्रसुती होऊ शकते. मात्र सरसकट सी सेक्शन प्रसुती ही अनुवांशिक आहे असे म्हणता येणार नाही.

अनेकांच्या बाबतीत आईच्या २ ते ४ प्रसुती नैसर्गिक असतात मात्र वैद्यकीय कारणांमुळे मुलीची प्रसुती सी सेक्शन द्वारे होते. काही वेळा परिस्थिती उलटही असते. आईची नैसर्गिक प्रसुती असते तर मुलीची सी सेक्शन प्रसुती असते. त्यामुळे सी सेक्शन प्रसुती अनुवांशिक नाही असे म्हणावे लागेल.

बाळाच्या बाबतीतल्या इतर काही गोष्टी अनुवांशिक जरुर असू शकतात.

बाळाची चण 

आई वडील दोघांची शारिर ठेवण मजबूत आणि मोठी असेल तर बाळही मोठे असते. पण आईवडिलांची चण लहान असेल तर मुलाचीही चण लहानच असणार.

प्रसुतीसाठी दीर्घकाळ

सर्वसाधारणपणे ९ महिने पूर्ण झाल्यावर पुढच्या ९ दिवसांत प्रसुती होते. पण जर त्याही पेक्षा अधिक काळ लागणे हे काहीसे अनुवांशिक असू शकते. म्हणजे गर्भवतीच्या आईच्या प्रसुतीला जास्त काळ थांबावे लागले असेल तर तिच्या मुलीलाही असा अनुभव येऊ शकतो.

मुदतपूर्व प्रसुती

मुदतपुर्व प्रसुतीची अनुवांशिकता असू शकते. शारिरीक अवस्थेमुळेच वेळेपुर्वी प्रसुती कळा येऊन प्रसुती होते. ही स्थिती अनुवांशिक असू शकते.

दीर्घ कळा आणि अवघड प्रसुती

अशा प्रकारची प्रसुती होणे अनुवांशिक असू शकते. योनीमार्गाचा आकार हा अनुवांशिकतेने लहान असेल तर ही परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रसुती कळा अधिक वेळ येतात पण प्रसुती होत नाही पर्यायाने सी सेक्शन प्रसुती करावी लागते.

मधुमेह 

घरामध्ये मधुमेह होण्याचा पुर्वेतिहास असेल तर गर्भावस्थेत मधुमेह होऊ शकतो. जर पालक किंवा सख्ख्या भावंडांपैकी कोणाला मधुमेह असेल तर गर्भावस्थेत मधुमेह जडतो. त्यासाठी योग्य आहार नियोजन, डॉक्टरी सल्ल्याने व्यायाम करावा तसेच साखर आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावे.

वरील काही कारणाने आई आणि मुलगी यांची सी सेक्शन प्रसुती होऊ शकते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon